एकूण 20 परिणाम
जून 12, 2019
सांगली - गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने यंदा पाण्याची पातळी अवघी आठ टीएमसीवर आली. ही पाणीपातळी मृतसाठा सोडून आहे. पाऊस लांबला तर कृष्णाकाठी जलसंकट येऊ शकते.  पाच टीएमसी इतके पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. अजून तीन टीएमसी...
मे 17, 2019
सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना वापरून जत...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 12, 2019
सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याकाठी पाणी संघर्ष जुंपला आहे. सलग पाच महिने ही योजना सुरू होती, त्यानंतर एक महिना खंड पडला. या काळात पाणीपातळी तळाला गेली असून, शेतकरी अडचणीत आल्यामुळे आधी आपल्या गावातील शिवाराला पाणी मिळावे, यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान...
एप्रिल 01, 2019
सांगली लोकसभेच्या आखाड्यात यावेळी वेगळीच रंगत येणार आहे. एकीकडे खासदार संजय पाटील यांच्यासारखा आक्रमक राजकीय नेता, दुसरीकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांची स्वाभिमानीकडून उमेदवारी आणि गोपीचंद पडळकरांच्या बंडाची शक्‍यता, या स्थितीत बॉयलर पेटणार आणि धूर निघणार हे नक्की! संजयकाका विरुद्ध विशाल हा...
मार्च 15, 2019
सलगर बुद्रूक - शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देने हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणीप्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे मत शैला गोडसे यांनी व्यक्त केले. लवंगी ता मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरवर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या...
मार्च 15, 2019
सांगली - सन २०१९ हे निवडणूक वर्ष म्हणून चर्चेत असले तरी सोबतीला दुष्काळाचा दाह तितकाच तीव्र आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या चार उपसा सिंचन योजना सध्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे.  सुदैवाने कोयना आणि चांदोली धरणांतील पाणीसाठा चांगला आहे....
मार्च 06, 2019
सांगली -  जिल्ह्याच्या दुष्काळी भागात दुष्काळाच्या झळांनी लोकांचे जगणे असह्य होत आहे. जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना ऐन उन्हाळ्यात सध्या बंद आहेत. योजनांच्या थकबाकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुष्काळी भागासाठी सिंचन योजना वरदान आहेत. राज्य सरकारने...
फेब्रुवारी 07, 2019
शिराळा - चांदोली धरण परिसरात गतवर्षाच्या तुलनेत सध्या 5.38 टीएमसी कमी पाणीसाठा शिल्लक असला तरी रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सातत्याने कृष्णा नदीवरील म्हैशाळ योजनेसाठी वारणा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. आज अखेर पर्यंत 4.50 टीएमसी एवढे पाणी सोडण्यात आले आहे. म्हैसाळला गत वर्षाच्या तुलनेत...
जानेवारी 22, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे. प्रशासनानेच याबाबत अडकावल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दुष्काळाच्या दाहकेवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पाणीच न मिळाल्यामुळे या भागातील...
नोव्हेंबर 22, 2018
मंगळवेढा - तालुक्यांमध्ये दुष्काळी तिव्रता जाणवू लागली असुन, शासकीय उपाययोजना अजुन कागदावर आहेत. अशा परिस्थितीत जलसंपदामंत्र्याच्या बैठकीत व पालकमंत्री व लोकप्रतिनिधीच्या दौऱ्यात पाणी लवकरच पाणी येणार असल्याचा दावा करण्यात आला. परंतु, ऐन दुष्काळात पाणी येण्यास विलंब होत. असल्याने जि.प. सदस्या शैला...
ऑक्टोबर 26, 2018
मंगळवेढा - दक्षिण भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी 1983 मध्ये आराखडा केलेल्या म्हैसाळच्या कामात आता पर्यंत आठ आमदार वेगवेगळ्या पक्षाची आठ सरकार स्थापन झाली. 180 कोटीची योजना आज तीन हजार कोटी खर्चूनही तालुक्याला पाणी मिळाले नाही. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिल्याने डिसेंबर अखेर या...
ऑक्टोबर 09, 2018
सांगली - म्हैसाळ योजनेचे पाणी आज झपाट्याने पुढे सरकले. उपसा करणाऱ्या पंपांची संख्या वाढवल्याने कालव्यातील पातळीही वाढली आहे. आज सकाळी बेडग येथे तिसऱ्या पंपगृहात पोहोचले होते; शिवाय कालवा अर्धाअधिक भरुन वाहत होता. काल सकाळी अकरा वाजता पहिल्या पंपगृहातील पाच पंप सुरु करण्यात आले. पैसे...
सप्टेंबर 24, 2018
मंगळवेढा : बहुचर्चित मंगळवेढा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवणार नसाल तर तालुक्यातील वंचीत गावे कर्नाटकाशी जोडण्यची सहमती द्यावी असा इशारा शिवसेना तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी दिला.  राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या वतीने मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न व अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत...
सप्टेंबर 20, 2018
कुडित्रे - स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पाणीपुरवठा संस्थांचे बीज सहकारातून रोवले गेले. पाणीपुरवठा संस्थांमुळे जमीन सिंचनाखाली येऊन पश्‍चिम महाराष्ट्रात हरितक्रांती झाली. मात्र, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे वीज बिल व सरकारी पाणीपट्टी दरवाढीमुळे तसेच त्या पट्टीत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर...
सप्टेंबर 19, 2018
मंगळवेढा : तालुक्यातील 35 गाव पाणी प्रश्नावर गंडवा गंडवीची योजना म्हणून टर उडविणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीच या योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची भुमिका विधानसभेच्या निवडणूकीला एक वर्षाचा अवधी असतानाच केल्यामुळे या योजनेवरून जनतेची चार वर्षे गंडवा गंडवी केल्याचे उघड होऊ...
ऑगस्ट 28, 2018
सांगली - लिंगनूर (ता. मिरज) येथील एमआय तलावातून होत असलेल्या बेकायदेशीर पाणी लुटीला पाटबंधारे विभागाने दणका दिला आहे. तलावातून पाणी उपशासाठी बसवण्यात आलेल्या विद्युत पंपांची चौकशी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंतराव गुणाले यांनी दिले आहेत. तलावाच्या कालव्यावरील सामान्यांनी...
ऑगस्ट 16, 2018
मंगळवेढा - ऐन पावसाळ्याचे अडीच महिने संपले तरी  तालूक्यात पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या खरीप पिकानी माना केव्हाच टाकल्या आहेत. उजनी कालव्यातून पाणी सूटल्यामूळे छत्तीस गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. परंतु, मंगळवेढा तालूक्यातील म्हैसाळ प्रकल्पांतर्गत गावासाठी  ऑगस्टअखेर शिरनांदगी...
जुलै 20, 2018
सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्‍याचा पूर्व भाग द्राक्ष, तर काही प्रमाणात उसासाठी प्रसिद्ध आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाल्याने हा परिसर सिंचनाबाबत तसा समृद्ध झाला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आर्वतन वेळेवर सुरू न झाल्यास परिसरात पाणीटंचाई सातत्याने भेडसावते. अशा...