एकूण 16 परिणाम
डिसेंबर 30, 2019
लखनौ - उत्तर प्रदेशातील नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याने अल्पसंख्याक समुदायाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप हे वक्तव्य करणारे मेरठ शहराचे पोलिस निरीक्षक अखिलेश नारायणसिंह यांच्यावर...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्लीः रामभक्त हनुमानाची जात शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत असून, हनुमानाच्या जाती आणि धर्मावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भगवान हनुमानाला जास्त त्रास देऊ नका, अन्यथा मारुतीराया...
डिसेंबर 21, 2018
लखनौ- रामभक्त हनुमानाची जात शोधण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सुरू झालेला वाद शमणे दूरच, त्यात अजूनही भर घालण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काल उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेतील आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुसलमान असल्याचे सांगितल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार  मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. याबाबतचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी दिला. यामध्ये या सर्व बाबी समोर आल्या आहेत. शिरोडकर समितीचा हा अहवाल...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. खासदार अमरसिंह यांचे आझम खान हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आझम खान यांच्यावर टीका करताना अमरसिंह म्हणाले, 'सध्या #MeToo अभियान सुरू...
जून 28, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संत कबीर नगर दौऱ्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत कबीरनगरच्या मगहरमधील कबीर दर्ग्यात जाऊन तयारीची माहिती घेतली. यादरम्यान दर्ग्याच्या मौलवींनी त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगी...
मार्च 22, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि शामली येथे झालेल्या दंगलीनंतर अनेक हिंदूंवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यवाही सुरु केली आहे. या दंगलीदरम्यान दाखल झालेले 131 खटले...
मार्च 07, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना आदित्यनाथ म्हणाले की, "मी ईद साजरी करत नाही, मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. घरी जानवे...
जानेवारी 15, 2018
बलिया : भारत 2014 पर्यंत हिंदू राष्ट्र होणार असून, हिंदू संस्कृती स्वीकारणारे मुस्लिमच या देशात राहू शकतात, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया येथील आमदार असलेले सुरेंद्रसिंह यांनी म्हटले आहे, ''जे नागरिक हिंदू...
जानेवारी 06, 2018
लखनौ - उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सचिवालयाची इमारत भगव्या रंगात रंगविल्यानंतर आता लखनौमधील हज हाऊसच्या बाहेरील भिंतींना भगवा रंग दिला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला असून, विरोध करण्यात येत आहे. हिरवा आणि पांढरा रंग असलेली हज हाऊस बाहेरित...
डिसेंबर 07, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने तोंडी तलाकसंबंधीच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. मसुद्याला मान्यता देणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी झालेल्या राज्य...
ऑक्टोबर 26, 2017
हैदराबाद : "ताजमहालमध्ये झाडू मारण्यापेक्षा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अगोदर त्यांच्या पक्षातील लोकांची डोकी साफ केली पाहिजेत," अशी टिपण्णी ऑल इंडिया मजलिस-ई-मुस्लिमीन (AMIM) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.  जगातील सात आश्चर्यांपैकी एक...
ऑक्टोबर 18, 2017
लखनौ - अयोध्येत राम मंदिराची उभारणी सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब असून, भगवान श्रीरामचंद्रांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भेट म्हणून आम्ही दहा चांदीचे बाण देणार आहोत, अशी घोषणा उत्तर प्रदेश "शिया केंद्रीय वक्‍फ मंडळा'ने आज केली. उत्तर प्रदेश सरकारने रामाच्या मूर्तीच्या उभारणीचा घेतलेला निर्णय...
सप्टेंबर 11, 2017
बलिया - उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका मुस्लिम महिलेने घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र (पेटिंग) काढल्याने तिला घराबाहेर हकलून दिल्याची घटना घडली आहे. बलिया जिल्ह्यातील बसारीकपूर येथे ही घटना घडली असून, या एका...
ऑगस्ट 23, 2017
लखनौ: मुस्लिम समाजातील तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशच्या सरकारने स्वागत केले आहे. हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणासाठी "मैलाचा दगड' ठरणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. तोंडी तलाक देऊन पत्नीला घटस्फोट देण्याची पद्धत बेकायदा, घटनाबाह्य व निरर्थक...