एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
मे 29, 2019
भारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि उद्योग भवन! या तीनही ठिकाणी वावर असणे आणि त्यातही प्रभावी वावर असणे, ही प्रत्येकाला जमणारी गोष्टच नव्हे.. हे साध्य करून दाखवलं होतं अरुण जेटली यांनी.. 'दरबारी राजकारणी' अशा हेटाळणीयुक्त कुजबुजीकडे सपशेल दुर्लक्ष करत...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
जानेवारी 13, 2019
यवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची "निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही...
ऑक्टोबर 29, 2018
आतापर्यंतच्या विविध सत्ताधीशांनी सीबीआयचा गैरवापर जरूर केला, परंतु तिचे अस्तित्वच संकटात येईल, असे प्रकार केले नव्हते. वर्तमान राजवटीने सत्तेत आल्यापासून संसदीय लोकशाहीतील विविध संस्थांची मोडतोड करण्याचा जो खेळ सुरू केला आहे, तो आता सीबीआयपर्यंत पोचला आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तेथेच...
ऑगस्ट 16, 2018
भारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे आज येथे वयाच्या 94 वर्षी निधन झाले. भारतीय राजकारणातील एक प्रगल्भ व सर्वमान्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या सक्रीय राजकीय जीवनाच्या अर्धशतकाकडे पाहिल्यास संसदीय कामकाजात त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी केवळ...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
एप्रिल 15, 2018
"जगणं अनमोल असतं, त्याच्यासाठी कुणीतरी किंमत मोजतंय, ते जपून वापरा' हा विचार आणि हा संस्कार मनावर ठसवणारा आणि त्याचा प्रत्यय देणारा चित्रपट म्हणजे "सेव्हिंग प्रायव्हेट रायन' हा चित्रपट. दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा हा चित्रपट प्रत्येक संवेदनशील व्यक्तीनं पाहायलाच हवा. तो चुकवून चालणार नाही....
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
ऑक्टोबर 30, 2017
राजकीय इतिहास आणि उत्क्रांती, संविधानातील बारकावे आणि राज्यशकट हाकण्याच्या कलेतील ‘शिरस्ता’ याबाबतचे प्रणव मुखर्जी यांचे ज्ञान असामान्यच आहे. त्याला जोड मिळाली आहे, ती इतक्‍या दशकांत त्यांनी विणलेल्या संपर्क जाळ्याची आणि सद्‌भावनांची. ‘द कोॲलेशन इयर्स’ या प्रणव मुखर्जी यांच्या ताज्या ग्रंथाबाबत...
सप्टेंबर 06, 2017
"ब्रिक्‍स" संघटनेच्या चीनमधील जियामेन येथे होणाऱ्या शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा खातेपालट व विस्तार करून सरकारचे "प्रतिमावर्धन" केले. "प्रतिमावर्धन" हा शब्द वापरण्याचे कारण, गेल्या काही दिवसात सरकारला चिंतेत टाकणाऱ्या छापून आलेल्या तथ्यपूर्ण...
जून 04, 2017
सप्तरंग बाबरी मशीद पाडण्याचं कटकारस्थान केल्याबद्दल भाजपचे मूळ पोलादी पुरुष मानले गेलेले लालकृष्ण अडवानी यांच्यावर आता तब्बल २५ वर्षांनंतर आरोपपत्र दाखल झालं आहे. खरंतर न्यायप्रक्रियेतल्या दिरंगाईचा हा उत्तम नमुना म्हणता येईल; मात्र त्यातल्या त्यात दिलासा हा, की हे प्रकरण...