एकूण 108 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज पुरोहित यांना...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
सप्टेंबर 21, 2019
औरंगाबाद : विधानसभेची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष यात्रा, जाहीर सभा आणि मेळावे यांचे आयोजन करत आहेत.  अनेक मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात गेल्याने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सगळी सूत्रे स्वत:च्या हाती घेतली. सध्या ते महाराष्ट्र दौऱ्यावर...
सप्टेंबर 19, 2019
महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला. - पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे...  काय आहे नेमके...
सप्टेंबर 19, 2019
बीड - ‘विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना संधी दिली जाईल,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जिल्ह्यातील आष्टी वगळता पाच मतदारसंघांतील उमेदवारांची नावे बुधवारी जाहीर केली. त्यातही जुन्या-नव्यांची सांगड घातली गेली आहे. परळीतून धनंजय मुंडे,...
सप्टेंबर 06, 2019
उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या बलबुत्यावर आणि विशेषत: दिल्लीतून आलेल्या ‘मोगली फौजां’च्या विरोधात लढून हे यश मिळवलं होतं! काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांना या निवडणुकीत अर्धशतकही गाठता आलं नव्हतं... महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक ही सर्वार्थाने अभूतपूर्व ठरली; कारण या निवडणुकीत...
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता दुहेरी वादात सापडले आहे. 64 कोटी रुपयांची निविदा असताना शासनाने 10 कोटींत हे काम करण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे, तर दुसरीकडे स्मारकासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी निविदा...
ऑगस्ट 08, 2019
शिरूर (पुणे) : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा आणि 370 वे कलम रद्द करण्याचा सुतराम संबंध नाही. राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेचे प्रश्‍न वेगळे असताना देखील भाजप-शिवसेनावाले हे कलम रद्द केल्याच्या नावाखाली मते मिळविण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी सामान्य जनतेने जागृत व सावध राहावे, असे...
ऑगस्ट 06, 2019
औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन व स्मारक विकसित करण्यासाठी महापालिकेमार्फत 64 कोटी 40 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती; मात्र युती शासनानेच महापालिकेला पत्र देऊन हे स्मारक 10 कोटी रुपयांमध्येच करण्याच्या सूचना...
जुलै 02, 2019
मुंबई : कितीही पाऊस आला तरी मुंबई तुंबणार नाही अशा वल्गना सत्ताधारी भाजप-शिवसेना करत होते. मात्र पाऊस पडला आणि मुंबापुरीची तुंबापुरी झाली. खरंतर यांनी 'करून' दाखवले, मुंबईला 'भरून' दाखवले, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. मुंबई शहर व उपनगराला सोमवारी...
जून 20, 2019
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला मैत्रीचा हात...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये त्यांनी...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 22, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.  भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा चंद्रकांत खैरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट झाल्यामुळे शिवसेना तयारीला लागली आहे. गुरुवारी (ता. 14) कार्यालयात कलश पूजन करताना त्यांनी युतीच्या नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करत अभिवादन केले.  निरालाबाजार येथे खासदार चंद्रकांत खैरे...
जानेवारी 23, 2019
राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. भाजप हा शिवसेनेच्या मागे राहून राजकारण करणारा पक्ष अशी ओळख होती. शिवसेनेवर एकही शब्द बोलण्याची हिंमत भाजपचे नेते करत नव्हते. मुंडे, महाजन असताना युतीत कितीही वाद झाले, तरी ते विकोपाला जाऊ दिले जात नव्हते. बाळासाहेबांच्या...
जानेवारी 16, 2019
अंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारला पडला हे सत्य आहे. त्यांनी देशातील नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना आता घरी पाठवायचे आहे, असा...
जानेवारी 06, 2019
लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्तानी स्वबळावर सज्ज रहावे, युती होईल की नाही या द्विधामनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे) असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.   लातूर येथे भाजपच्या लोकसभा क्लस्टरमधील कार्यकर्त्यांच्या बुथ मेळावा...
जून 27, 2018
शिवसेनेचा कडवा विरोध असतानाही नाणारजवळील तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करून मोदी सरकारने आपला इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध केवळ राजकारणापुरताच आहे, हे जनता ओळखून आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या तीव्र विरोधाला न जुमानता...