एकूण 12 परिणाम
जुलै 29, 2018
श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...
जून 17, 2018
आईसलंडच्या भारतातल्या दूतावासात काही वस्तू अभिमानानं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे कोलंबीच्या कवचापासून केलेलं मलम. ते लावल्यानं जखम लवकर बरी होते. जॉर्डनमध्ये दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांपर्यंत कोणत्याही विषयावर परिषद असेल तर पाहुण्यांना मात्र भेट म्हणून ‘डेड सी’ इथलं विविध...
मार्च 25, 2018
एकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं स्वप्न नक्कीच आहे. जेव्हा बहुसंख्य नागरिकांना व नेत्यांना असं स्वप्न प्रेरित करेल तेव्हा भारताची नवनिर्मिती होईल, याची मला खात्री आहे.  अलीकडं...
मार्च 11, 2018
आपली आई, आत्या, मैत्रिणी इत्यादींनी आपल्याला घडवण्यासाठी जे काही योगदान दिलं असेल, त्याचा आदर करा. आपण सगळ्यांनी वैयक्तिक जीवनातल्या व राष्ट्रीय जीवनातल्या महिलांविषयी आदरभाव ठेवला तर भारत एक सुसंस्कृत देश म्हणून नक्कीच ओळखला जाईल.  दरवर्षी ता. आठ मार्चला 'आंतरराष्ट्रीय महिलादिन' साजरा केला जातो,...
फेब्रुवारी 25, 2018
राजकीय विनोदाचा खरा उद्देश हलक्‍याफुलक्‍या शब्दांनी दुसऱ्या पक्षावर टीका करायची व गरज पडेल तेव्हा स्वत:ची थट्टा-मस्करी करून विरोधी नेत्यांशी संवाद साधायचा हा असतो. आता राजकीय विनोद हे विरोधी पक्षाच्या नेत्यावर व विचारसरणीवर टीका करण्याचं साधन झालं आहे. राजकीय विनोदाच्या रूपानं आपल्या नावडत्या...
जानेवारी 28, 2018
जगद्विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो याला त्याच्या अखेरच्या दिवसांत एक पत्रकार भेटायला गेला होता. पिकासोनं त्याला काही सेकंदांत एक चित्र काढून दिलं. तो पत्रकार म्हणाला : ‘‘तुम्ही हे चित्र किती पटकन काढलंत...मी ते विकलं तर मला लाखो डॉलर्स मिळतील.’’ त्यावर पिकासो त्याला म्हणाला : ‘‘अरे! मी हे चित्र...
नोव्हेंबर 05, 2017
‘ऑ क्‍टोबर क्रांती’ या जागतिक इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनेची शताब्दी नुकतीच झाली; परंतु कुणीही ती साजरी केली नाही. जगभरातल्या सगळ्या माध्यमांना या घटनेचा विसर पडला. ऑक्‍टोबर १९१७ मध्ये लेनिननं रशियात क्रांती करून झार राजाला पदच्युत केलं व पहिल्या कम्युनिस्ट राज्यपद्धतीची स्थापना केली. सुमारे ७०...
ऑक्टोबर 22, 2017
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या साल्क इन्स्टिट्यूट या संशोधन-संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी मनुष्य व डुक्कर यांच्या पेशींचा संकर करून एक नवीन जीव निर्माण केला. २८ दिवसांनंतर त्याला पूर्ण आकार येण्याआधी तो नष्ट करण्यात आला. मानव व प्राणी यांच्या पेशींचा संकर करून नवीन प्रकारचे जीव निर्माण करण्याचा हा...
ऑक्टोबर 08, 2017
बोस्निया-हर्झेगोविना या देशाची सारायेव्हो ही राजधानी. याच ठिकाणी पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि इथंच काही वर्षांपूर्वी सर्ब राष्ट्रीयत्वाच्या अतिरेकातून बोसन्याक लोकांवर हल्ले करण्यात आले. अनेक वेदना भोगलेल्या या शहरानं आता कात टाकली आहे. इथल्या लोकांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा सूड न...
सप्टेंबर 24, 2017
तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल इथं एका बैठकीसाठी एकदा मी गेलो होतो. इस्तंबूलमधला तक्‍सीम चौक प्रसिद्ध आहे. तिथं पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. आमची बैठक सुरू असताना तक्‍सीम चौकात दहशतवादी हल्ला झाला. इस्राईलहून आलेल्या पर्यटकांचा बळींमध्ये समावेश होता. हल्ला झाल्यावर तीन-चार तासांच्या आत इस्रायली...
जुलै 30, 2017
ख्यातनाम व्यवस्थापनतज्ज्ञ अरुण मैरा यांनी केंद्र सरकारचा नियोजन आयोग, टाटा समूहाचं व्यवस्थापन मंडळ, उत्तर भारतातलं एक विद्यापीठ अशा तीन क्षेत्रांत उच्च पदी काम केलं आहे. आता ते निवृत्त झाले आहेत व ‘उत्तम उद्योग, उत्तम आयुष्य व उत्तम समाज’ यांची सांगड कशी घालायची याचं मार्गदर्शन ते नवउद्योजकांना ‘...
जुलै 16, 2017
स्वित्झर्लंडचे परराष्ट्रमंत्री व सहराष्ट्राध्यक्ष दिदीर बुर्खाल्तर यांनी यशाच्या शिखरावर असतानाच अचानक पत्रकार परिषद घेतली व ‘येत्या ऑक्‍टोबर महिन्यापासून आपण राजकारणातून निवृत्त होत आहोत,’ अशी घोषणा जून महिन्यात केली. स्वित्झर्लंडची राज्यघटना आगळीवेगळी आहे. तिथं सात जणांचं मंत्रिमंडळ असतं....