एकूण 109 परिणाम
November 28, 2020
पाटण (जि.सातारा) : पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी बिनविरोध झाल्या. नगराध्यक्षपदी अजय कवडे यांची व उपाध्यक्षपदी विजय ऊर्फ बापू टोळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अभिषेक परदेशी...
January 18, 2021
पाटण (सातारा) : सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य (ता. 15) जानेवारीला मतपेटीत बंद...
November 27, 2020
पाटण (जि.सातारा) : पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्यानिमित्ताने राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न पाटण येथे निवडणूक प्रचार मेळाव्यात पाहावयास मिळाला. पारंपरिक राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, येणाऱ्या 107 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी पॅटर्न दिसला...
December 18, 2020
पाटण (जि. सातारा) : तालुक्‍यातील 107 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत हातात हात घालून चाललेले महाआघाडी शासनाचे घटक पक्ष या निवडणुकीत महाआघाडी पॅटर्न स्थानिक पातळीवर राबवतील असे सध्या दिसत नाही. व्यासपीठावर एकत्र...
November 24, 2020
पाटण (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटण तालुक्‍यातील पारंपरिक विरोधक गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर एकाच व्यासपीठावर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. आघाडी धर्म पाळताना एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता...
November 25, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधीस अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील वेणुताई चव्हाण स्मृतिसदनास भेट दिली. तेथे ज्येष्ठ नेते चव्हाण, वेणुताई चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या...
September 19, 2020
तारळे (जि. सातारा) : वीर जवान नाईक सचिन जाधव अमर रहे, भारत माता की जय, जब-तक सूरज चाँद रहेगा सचिन तेरा नाम रहेगा, वंदे मातरम अशा घोषणा देत लेह-लडाख येथे चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या नाईक सचिन जाधव यांच्या पार्थिवावर दुसाळे (ता. पाटण) येथे शासकीय इतमामात आज सकाळी बाराच्या सुमारास शोकाकुल वातावरणात...
September 15, 2020
गुहागर : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यावरणपूरक आणि सीआरझेडची पूर्तता करणाऱ्या बीच शॅक्‍स उभारणीला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ८ किनारपट्टींवर शासकीय जागेत प्रत्येकी १० चौपाटी कुटी (बीच शॅक्‍स) उभारण्यात येणार आहेत. त्यांचे वाटप शासन करणार आहे....
December 16, 2020
गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने कोरोना लढ्यात आता कडक पाऊले उचलली असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शनिवारच्या आठवडा बाजारात 11 व्यक्तींकडून दंडापोटी 5 हजार 500 रुपयांची वसुली करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने येथील शनिवारचा आठवडा...
December 25, 2020
गुहागर (रत्नागिरी) : राजकीय पक्षांना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्‍यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. या वेळीही सात सदस्यांसह सरपंचपदाची निवडणूक उमराठ...
December 28, 2020
गुहागर (रत्नागिरी) : हिवाळा सुरू झाला की, कोकणातील अनेक किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे नोव्हेंबरपासून या हंगामाला सुरवात होते; मात्र यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोन वेळा समुद्राच्या पश्‍चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे...
January 02, 2021
गुहागर (रत्नागिरी) : तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी असलेल्या बामणघळ या पर्यटनस्थळी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना ठाण्यातून आलेली पर्यटक सुचेता माणगावकर (वय 33) तोल गेला. तिला धरण्यासाठी पती अनंत माणगावकर (वय 366) धावले. मात्र दोघेही धोकादायक घळीत पडले. घटनेनंतर अर्ध्या तासात हेदवीतील ग्रामस्थ...
January 17, 2021
गुहागर (रत्नागिरी) : नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातल्याचे आढळले. पहिल्या घरट्यातील १२३ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. निसर्ग वादळ, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्‍चिमेकडील समुद्रात निर्माण झालेली वादळजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे ऑलिव्ह रिडले...
September 18, 2020
गुहागर (जि. रत्नागिरी) : विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक शाखा वेलदूरच्या शाखा व्यवस्थापिका सौ. सुनेत्रा सुनील दुर्गुळे (वय 56, मूळ गाव चिपळूण, सध्या राहणार वेलदूर) यांचा अज्ञाताने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. दाभोळ खाडीत धोपावे व नवानगरच्या दरम्यान त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना गुरूवारी सकाळी आढळून...
October 17, 2020
गुहागर : पर्यटकांची संख्या विचारात घेऊन बांधकामांना परवानगी, अनधिकृत बांधकामांना परवानगीसाठी मुदतवाढ द्यावी, पर्यटन क्षेत्र असलेल्या सीआरझेड 3 मधील गावांना सीआरझेड 2 चे नियम लागू करावेत, अशा तीन मागण्या खासदार सुनील तटकरें यांनी एमसीझेडएमच्या अध्यक्षांसमोर ठेवल्या. या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा...
October 28, 2020
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातील विजयराव भोसले आणि सहदेव बेटकर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावरुन गायब आहेत. अनुक्रमे २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवणारे हे दोन्ही उमेदवार सध्या काय करत आहेत, असा प्रश्न कार्यकर्ते आणि मतदारांना पडला आहे.  १९९९ पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा...
November 22, 2020
गुहागर (रत्नागिरी) : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम गुहागरबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात २००८ पासून सुरू झाली. श्रमदानावर आधारित या मोहिमेतून बंधारे बांधून पाणी अडवण्याचा अभिनव उपक्रम पंचायत समिती गुहागर व कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने गेली ११ वर्षे...
December 07, 2020
गुहागर (रत्नागिरी) :  गेली १० वर्षे भातशेतीबरोबर भाजीपाला, फळबाग लागवड करणाऱ्या तुकाराम तेलगडेंनी यंदा प्रथमच शेततळ्यात मत्स्यशेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. १४० चौरस फुटांच्या शेततळ्यात पॅंगेसीयस (Pangasius) या नव्या संकरीत प्रजातीचे सुमारे दोन हजार मासे आहेत. बी.कॉम.ची पदवी घेतलेला त्यांचा मुलगा...
December 18, 2020
गुहागर : समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येऊ लागला आहे. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई-हिरवाई मधून दिसते. क्षणभर संपूर्ण विजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग वाळूवरही चमचमताना दिसतो. गेले चार दिवस निरीक्षण केले असता ही निळाई दिवसागणिक...
December 26, 2020
गुहागर (रत्नागिरी)  : आजपर्यंत येथील समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरू होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून येथे सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या पिवळ्या लाटेचे प्रमाण खूपच कमी असले तरी याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.  डिसेंबर...