एकूण 10 परिणाम
February 25, 2021
सोलापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आणि एक शहरप्रमुख असून, प्रत्येक तालुक्‍यासाठी एक तालुकाप्रमुख आहे. राज्याच्या सत्तेची दोरी पक्षाच्या अध्यक्षांकडे असतानाही संघटितपणे लोकांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा श्रेयवाद आणि गटबाजी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत...
February 11, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतीची सरपंच निवड आज शांततेत पार पडली. तालुक्‍यातील साडे, देवळाली, सावडी, पांडे, झरे, उमरड, पोथरे, आळजापूर, शेटफळ महत्त्वाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीने विशेष लक्ष वेधले होते.  सरपंच, उपसरपंच निवडीत फोडाफोडीच्या राजकारणाच्या भितीने...
January 26, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंतप्रधान आवास योजनेतून पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या 892 घरांची लॉटरी सोडत आज (ता. 26) काढण्यात येणार होती. परंतु या कामास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिलेली असल्याने ही सोडत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. ...
January 18, 2021
करमाळा (सोलापूर) : झरे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास पाटील यांनी वयाच्या नव्वदीतही प्रचार प्रमुख युवा नेते प्रशांत पाटील यांचा प्रचार केला, तरीही प्रशांत पाटील यांचा निसटता पराभव झाला; मात्र पाटील गटाने सत्तेची हॅट्ट्रिक केली आहे. झरे ग्रामपंचायत निवडणुकीत 11 पैकी 6...
January 12, 2021
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. आदिनाथ कारखान्यावरील राज्य मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज असल्याने या बॅंकेने हा...
December 28, 2020
केत्तूर (सोलापूर) : एकीकडे थंडीचा कडाका वरचेवर वाढत असतानाच करमाळा तालुक्‍यात होत असलेल्या 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आखाडाही तापू लागला आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने पॅनेलप्रमुखांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे, तर अनेक ठिकाणी बहुतांश जणांना आरक्षणाआधीच...
December 26, 2020
नातेपुते (सोलापूर) : समाजाच्या संघटनेसाठी व एकीसाठी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक - अध्यक्ष रामदास आठवले यांनी खूप प्रवास केला आहे, मात्र आजही समाजात एकी नाही. गटातटाचे राजकारण चुकीचे आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेने रामदास आठवले यांचा प्रवास सुरू आहे. सत्ता आणि प्रशासनात जा, हा...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 18, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा मतदारसंघात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण आणि कुरघोड्या होत असल्या, तरी आजपर्यंतचा इतिहास आणि येणारे भविष्य जर पाहिले तर नक्कीच येथील राजकारण वेगळेच आहे. विधानसभेची निवडणूक आली की सर्व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष करमाळा विधानसभा निवडणुकीवर लागलेले असते. येथील विधानसभेच्या...
October 13, 2020
सांगोला,(सोलापूर): राजकारण व इतर क्षेत्रासह महिला आर्थिकदृष्ट्याही सक्षम झाल्या पाहिजेत. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी जवळा परिसर व संपूर्ण सांगोला तालुक्‍यात केलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी...