एकूण 23 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
‘आरामको’ कंपनीच्या तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे सौदी अरेबिया व इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे. आता धोक्‍याची घंटा वाजवीत अमेरिका व रशिया शस्त्रास्त्रांचे बक्कळ किमतीचे करार येत्या काळात सौदी अरेबियाच्या गळ्यात मारतील, अशी शक्‍यता आहे....
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 24, 2019
इराणकडून तेल घेऊ नका; नाहीतर निर्बंध लादू, हा अमेरिकेचा पवित्रा भारतासाठी तापदायक आहे. तेलावरील ८० टक्के अवलंबित्वाच्या जोखडातून बाहेर पडण्याची गरज लक्षात आणून देणारी ही घटना आहे. श त्रूचा मित्र तो शत्रूच, या शीतयुद्धकालीन मानसिकतेतून अद्यापही अमेरिका बाहेर पडलेली नसल्याचे इराणच्या ताज्या...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला...
मार्च 24, 2019
जगभरात अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचं आणि डाव्या विचारसरणीचं राजकारण सुरू आहे. त्या-त्या देशांमधले विशिष्ट विचारसरणीचे नेते त्यांच्या चाहत्यांत लोकप्रिय आहेत. त्यामुळं मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय समाजाचं महत्त्व कमी होत चाललं आहे. दुसरीकडं भारतात मात्र मध्यमवर्गाचा प्रभाव मोठा आहे आणि भारतीय...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 22, 2019
सौदीच्या युवराजांनी दहशतवादाचा निषेध करताना पाकिस्तानचा उल्लेख टाळला, हे खटकणारे आहे. भारताला या बाबतीत पाठपुरावा करावा लागेल. मात्र सौदीसह विविध देशांशी स्वतंत्रपणे संबंध स्थापण्याचे धोरण वास्तववादी आणि देशहिताचे आहे. द्विपक्षीय संबंधांचे क्षेत्र अधिक व्यापक-विस्तृत करणे, हा सौदी...
फेब्रुवारी 18, 2019
संकटकाळी प्रत्यक्ष कृतीने जो मदत करतो, तो खरा मित्र, ही लोकोक्ती व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनातही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने विचार केला, तर भारतापुढील राजनैतिक पातळीवरील आव्हानाची नेमकी कल्पना येऊ शकेल. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे संदेश जगाच्या सर्व भागांतून येत आहेत...
फेब्रुवारी 16, 2019
काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "केंद्रीय राखीव पोलिस दला'च्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे, अशी भावना व्यक्त झाली. "किती काळ असे हल्ले सहन करायचे' हा मनात डाचणारा प्रश्‍न जो तो...
नोव्हेंबर 19, 2018
सौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या तपासावरून सुरू असलेले राजकारण आणि टोलवाटोलवी धक्कादायक नि संतापजनक आहे. ही हत्या नेमकी कुणी केली, तिच्या कटाचे सूत्रधार कोण, याच्या मुळाशी जाण्याची...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या...
ऑक्टोबर 16, 2018
सौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका त्यांना परिणामकारक विरोध करण्याची शक्यता खूपच क्षीण आहे. ‘स र्व प्रकारच्या युद्धांत काही ना काही चुका होतातच.’ येमेनमधील हौती बंडखोरांच्या...
ऑगस्ट 26, 2018
केरळवर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं हवालदिल झालेल्या लोकांचं जीवन पूर्वपदावर येण्यासाठी 500 कोटी रुपये हवेत की पाच हजार कोटी रुपये हवेत, हा दुय्यम महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आपली प्रगतीची व्याख्या ही वास्तवात होणाऱ्या बदलांवर आधारित असावी की भावनांना गोंजारणाऱ्या राजकारणावर आधारित असावी, हा खरा मूळ...
जुलै 12, 2018
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे. पा किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ येत्या शुक्रवारी...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 16, 2018
तीन वर्षांपूर्वी बराक ओबामांच्या कार्यकाळात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, रशिया, चीन, युरोपीय समुदाय आणि इराण यांच्यामधील करारामुळे इराणच्या आण्विक आकांक्षांना आवर घातला गेला. या पार्श्‍वभूमीवर "इराण दहशतवाद पोसतो' असा आरोप करीत शेवटी गेल्या आठवड्यात अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा...
फेब्रुवारी 21, 2018
भारतात राष्ट्रीय राजकारणाची धर्माच्या चौकटीत बांधणी करण्याचे प्रयत्न होत असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो पाया कधीच नव्हता. तसे असते तर पहिले व दुसरे महायुद्ध ख्रिस्ती जगत लढले नसते. आणि जगातील दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या 57 मुस्लिम देशांची तोंडे विरुद्ध दिशेला नसती. आंतरराष्ट्रीय राजकारण...
फेब्रुवारी 16, 2018
हिंदी महासागरातील मालदीव या द्वीपसमूहाच्या देशात निर्माण झालेले राजकीय अस्थिरतेचे व अनिश्‍चिततेचे सावट भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे. मालदीव हा बाराशे छोट्या बेटांनी बनलेला, सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला, दक्षिण आशिया सहकार्य (सार्क) समूहातला, आपल्या सागरी क्षेत्रात राजकीय जवळीक असलेला...