एकूण 9554 परिणाम
January 18, 2021
चंदगड : तालुक्‍यातील 33 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज येथे जाहीर करण्यात आला. 41 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 33 ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन आज निकाल लागला. दोन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडले तर उर्वरित 31 ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाड्यांना...
January 18, 2021
नंदुरबार : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींपैकी कोपर्ली, भालेर व वैंदाणे ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. तर कार्ली, भादवड, हाटमोहीदा, कंढरे या चार ग्रामपंचायतीवर शिवसेनेने दावा केला आहे.  इश्‍वर चिठ्ठीने योगेश राजपूत विजयी  भादवड येथील प्रभाग एकमधील योगेश राजपूत व संजय राजपूत या उमेदवारांना २२२...
January 18, 2021
जत  : तालुक्‍यात शेगाव, उटगी, अंकले या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवत भाजपने नऊ ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण केले असून 11 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे. मात्र, महत्वाच्या ग्रामपंचायती हातून गेल्या. नऊ ठिकाणी स्थानिक विकास आघाड्यांना यश मिळवता आले आहे. टोणेवाडी ग्रामपंचायत...
January 18, 2021
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान केला. रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात कमी केलेले आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे, यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने...
January 18, 2021
राज्यातील ग्रामपंचातय निवडणुकांची मतमोजणी आज झाली. यात काही प्रस्थापितांना धक्का बसला तर काही दिग्गज गड राखण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात तांडव वेबसिरीजविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर दिग्दर्शकाने माफीनामा सादर केला आहे. तर देशाच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने अख्खं गाव वसवल्याचा...
January 18, 2021
धुळे : सर्वसामान्य नागरिकांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारण्याचे प्रकार थांबत नसतांना खुद्द पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातूनही चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना धुळ्यात घडली. ही घटना विस्मृतीत जात नाही; तोच थेट प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात चोरटे शिरल्याने खळबळ उडाली....
January 18, 2021
वाई (जि. सातारा) : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बावधन ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्तारूढ भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने 9 जागा जिंकून सत्ता कायम राखली. भाजप व शिवसेनेच्या बावधन विकास पॅनेलने 8 जागांवर विजय मिळवित जोरदार लढत दिली.   या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या 17...
January 18, 2021
लोहारा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील  २१ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाले आहेत. वर्षानुवर्ष गावांवर ठाणमांडून बसलेल्या गाव पुढाऱ्यांना मतदारांनी अस्मान दाखवत बहुतांश गावांत सत्तांतर घडवून आणले असून गावची सूत्रे तरूणाईच्या हातात दिली आहेत. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या...
January 18, 2021
उंब्रज (जि. सातारा) : पाल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव करत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. 15 जागेसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा, तर राष्ट्रवादीच्या म्हाळसाकांत सह्याद्री पॅनेलला अवघ्या सहा जागांवर...
January 18, 2021
सारंगखेडा (नंदुरबार) : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल रावल यांनी पुन्हा एकदा एक हाती सत्ता प्राप्त केली. त्यांचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. गत ७५ वर्षांपासून ग्रामपंचायतीवर रावल परिवाराची सत्ता अबाधित राहिली आहे. गावासह परिसराचे सत्ता व राजकारण...
January 18, 2021
आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१  ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांच्या नेतृत्वाखालील...
January 18, 2021
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला धक्का देत अनेक ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायातींसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या...
January 18, 2021
श्रीवर्धन  : तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले; तर पाच जागा शेकापने जिंकून या पक्षाचा लाल बावटा फडकला.  शिवसेनेने तालुक्‍यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतानाच संपूर्ण...
January 18, 2021
जळगाव : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे जिल्हयातील बोदवड तालुक्यातील नाडगाव हे गाव आहे. या ठिकाणी त्यांच्या भाचेसून ईश्‍वरचिठ्ठीने पराभूत झाल्या आहेत.  नाडगाव (ता. बोदवड) येथे कॉंग्रेसची सत्ता होती. या ग्रामपंचायतीत माजी राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे...
January 18, 2021
परभणी ः जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता.18) हाती आले. या निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षे प्रमाणे तर काही ठिकाणी अपेक्षा भंग करणारे निकाल लागले. काही गावात नवख्या नेत्यांच्या हातात सत्ता गेली तर काही ठिकाणी जुन्याच्या अनुभवावर लोकांनी विश्वास दाखवत परत त्यांच्याच हाती सत्ता...
January 18, 2021
कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील नागद येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा अनेक अर्थाने चांगलीच गाजली. येथे १५ जागांपैकी ८ जागा जिंकून माजी आमदार नितीन पाटील यांच्या पॅनलची सरशी झाली असून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळवता आला. दोन अपक्ष उमेदवार निवडून...
January 18, 2021
कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशी पारंपरिक लढत झाली. त्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली असली, तरी काठावरील सत्ता आहे. कॉंग्रेसच्या वॉर्ड क्रमांक तीनमधील अनिता यादव यांचा केवळ एक मताने पराभव झाला. त्यांच्या...
January 18, 2021
माहूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतसाठी १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत परिवर्तन केले असून हडसणी, आष्टा, असनमाळ अपवाद वगळता सात ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. प्रामुख्याने सिंदखेड, असोली व सेलू ही गावे शिवसेनेचा बालेकिल्ला असे राजकीय...
January 18, 2021
अलिबाग : म्हसळा तालुक्‍यातील कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ग्रामपंचायत केल्टे बिनविरोध अगोदरच झाली होती. तर पाभरे आणि लिपणी वावे या ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.  पाभरे आणि लिपणी वावे दोन...
January 18, 2021
दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकाला मारहाण केल्याची घटना वलखेड फाट्यावर घडली. या घटनेत एकावर तलवारीने वार करण्यात आले आहे.  अशी आहे घटना वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाला. विनायक शिंदे...