एकूण 44 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कापसाचे उत्पादन भरघोस येणार आहे. यंदा 20 ते 25 टक्के कापूस उत्पादन अधिक येऊन जिनिंग- प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाबाबत "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कापसाला यंदा पाच हजार 550 चा...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात ऊसलागवडीवर बंदी घालण्याच्या विभागीय आयुक्तांनी शासनाला दिलेल्या अहवालावर ऊसउत्पादक, कारखानदार, तज्ज्ञांनी विविध मते व्यक्त केली आहेत. उसाला पर्यायी पीक द्या, त्यातून उसाइतक्‍या उत्पन्नाची हमी द्या, मग तीही पिके घेऊ, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर पर्यायी पीक नको...
ऑगस्ट 28, 2019
रेवदंडा : काही वर्षांपूर्वी सुपारी पिकावर कोळेरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्या वेळी फळे गळून सुपारी पिकाला उतरती कळा लागली होती. त्यांचा जबरदस्त फटका किनारपट्टी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना बसला होता. या वर्षीही वाढत्या उष्म्यामुळे सुपारीचे उत्पन्न घटण्याची शक्‍यता बागायतदारांनी व्यक्‍त केली....
जुलै 05, 2019
गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणे, जलाशय, विहिरी आटल्या. त्यामुळे हजारो गावांमधील लोकांवर पाण्याच्या टॅंकरची वाट पाहण्याची वेळ आली. हजारो एकरांवरील फळांच्या बागा मृत झाल्या. अशा भीषण दुष्काळाचा अनुभव घेतल्यानंतर तरी आपण काही शिकणार आहोत की नाही? आपल्याला लागणाऱ्या पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे...
जुलै 04, 2019
जयसिंगपूर - ‘विधानसभेसाठी भाजप-शिवसेना सोडून अन्य कोणत्याही पक्षाबरोबर युतीचा पर्याय खुला आहे. राज्यातील ४९ विधानसभा मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याची तयारी केली आहे. लोकसभेची आघाडी गृहीत धरून आहे. जागा वाटपाबाबत मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही तर अन्य पर्यायही खुले करू. यातही जमले नाही तर...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
फेब्रुवारी 02, 2019
कडेगाव -  सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीबद्दल आणि शेतीमालाला हमीभाव देण्याबद्दल चकार शब्दही नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये म्हणजे महिन्याला ५०० रुपये  दिले जाणार आहेत. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न आहे. सुशिक्षित बेरोजगारांना...
जानेवारी 08, 2019
सातारा - राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची थकित एफआरपीची रक्कम चार हजार कोटींवर गेली आहे.  तर जिल्ह्यातील कारखान्यांकडून 15 टक्के व्याजासह ही रक्कम 100 कोटींच्या घरात जात आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. याची पहिली ठिणगी उद्या (सोमवारी)...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 24, 2018
अमरावती : तुरीच्या शासकीय खरेदीसाठीच्या नोंदणीची मुदत संपली असली तरी शासकीय खरेदी केंद्राचा मात्र पत्ता नाही. नवीन तूर बाजारात येत असताना खुल्या बाजारात खरेदीदारांनी भाव पाडले असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका बसत आहे. दुष्काळामुळे घसरलेली उत्पादनाची सरासरी व कमी...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 03, 2018
सोलापूर : यंदा पाऊस कमी पडला आहे, हे वास्तव आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागतात, शासनाकडे भीक मागावे लागतेय अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल रोष असल्याचे मत सोलापूर बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केले...
ऑक्टोबर 20, 2018
सोमेश्‍वरनगर - ‘‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या. ताबडतोब नोकऱ्यांमधल्या अडीच लाख रिक्त जागा भरून बेरोजगारांना न्याय देऊ, सहवीजनिर्मिती प्रकल्पातील विजेला सव्वासहा ते साडेसहा प्रतियुनिट दर देऊ आणि उद्योगधंद्याला पोषक वातावरण करू. सध्याचे नाकर्ते सरकार हे करणार नाही. त्यांनी राज्याला...
ऑक्टोबर 13, 2018
जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले. निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे कारखाना कार्यस्थळावर 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन आज शनिवारी (ता. 13) झाले....
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर येथील इनामतीमळा परिसरातील मंगळवारी (ता. 9) दुपारी अकरा शेतकऱ्यांचा तोडणीस आलेला सतरा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. कारखाना सुरू होताच या उसाची प्राधान्याने तोडणी करून गाळप केला जाईल असे श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष...
सप्टेंबर 27, 2018
हुपरी - केंद्र व राज्य सरकारने साखरेला हमीभाव द्यावा, उसाला जास्त भाव कसा द्यायचा ते आम्ही बघू, असे स्पष्ट करून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारला दणका देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.  येथील जवाहर कारखान्याची २९ वी वार्षिक सभा...
सप्टेंबर 25, 2018
नांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा काढण्याऐवजी तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य मंडळाचे सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी आज दिला. कॉम्रेड राजू देसले,...
सप्टेंबर 17, 2018
गोरेगाव : तालुक्यातील हिरापुर येथील उच्च शिक्षीत शेतकरी सुरेन्द्र (बब्लु) बिसेन यांनी नोकरी सोडुन सन 2000 पासुन पारंपारीक भात शेतीला सुरुवात करुन धान मळणी यंत्र, 1 ट्रॅक्टर विकत घेतला त्यासाठी सुरेंद्र बिसेन यांनी बँकेतुन 25 लाखाचे कर्ज घेतले हा तालुक्यातील पहीला यांत्रीक शेतीचा प्रयोग होता. सन...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी...