एकूण 60 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता पसरली आहे. ...
ऑक्टोबर 13, 2019
मंठा (जि. जालना) - सणासुदीचे दिवस, त्यातच शेतमजुरांची काढणीसाठीची मजुरी देण्यासाठी शेतकरी सध्या मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करीत आहेत. ओलसरपणाचे कारण देत सोयाबीनला भावही कमी मिळत आहे, शिवाय सोयाबीन वाळत घालण्यासह स्वच्छ करण्यासाठीही व्यापाऱ्यांना कष्ट घ्यावे लागत आहेत.  ग्रामीण भागात सोयाबीन...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 26, 2019
जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कापसाचे उत्पादन भरघोस येणार आहे. यंदा 20 ते 25 टक्के कापूस उत्पादन अधिक येऊन जिनिंग- प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाबाबत "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कापसाला यंदा पाच हजार 550 चा...
सप्टेंबर 12, 2019
शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे...
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव ः शाळेत जाणाऱ्या मुलांना आहार देवून तंदुरुस्त बनविण्याऐवजी ठेकेदारांचे पोषण करणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत यंदा शिक्षण संचालकांकडून पुन्हा एकदा दरांमध्ये फेरफारीचा प्रताप केला आहे. राज्यातील ठेकेदारांकडून शासन बाजारपेठेत सध्या असलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने डाळी, तेल आणि मसाले खरेदीचे दर...
फेब्रुवारी 13, 2019
खामखेडा (नाशिक) - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, गेल्या आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मक्याला २ हजारांचा दर ओलांडून तो २१००रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असले तरी...
डिसेंबर 24, 2018
भडगाव : शासनाने मोठा गाजावाजा करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. मात्र, खरेदीची सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर हमीभावाचा नुसता पोरखेळ सुरू असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात 16 पैकी 11 खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातून मका 4...
डिसेंबर 12, 2018
बारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे दर किमान आधारभूत किमतीखाली आहेत. मात्र हाच शेतीमाल किरकोळ विक्रीत मात्र गगनाला भिडणारा ‘भाव’ खात आहे...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 30, 2018
औरंगाबाद - शेतीमालाला हमीभाव नाही. कर्जमाफीत केवळ आकड्यांचे खेळ सुरू आहेत. कर्जासाठी शेती गहाण, पीककर्ज मिळत नाही. यामुळे पाच वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यात यंदा दुष्काळाचा कहर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा सवाल किसान क्रांती दुष्काळ परिषदेचे...
ऑक्टोबर 29, 2018
भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे. पुणे, सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सिमारेषावर...
ऑक्टोबर 14, 2018
येवला : सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर करून त्याचा गवगवा केला. पण अजूनही हमीभावाने खरेदी होत नसून शेतकरी झळ खाऊन शेतमाल विक्री करत आहेत. या भावाचा सर्वांना लाभ देण्यासाठी खरेदी केंद्रे वाढवून खरेदी करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी आज...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकु नये. तसेच हमी भावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करु नये. तसे केल्यास त्या व्यापारी व आडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. येथे गुरुवारी...
ऑक्टोबर 08, 2018
जळगाव ः शेतकऱ्याचा कैवार घेणारे सरकार असा आव आणत भाजप सरकारने हमीभाव जाहीर केले खरे, पण तो भाव देणार कसा याचे गणित काही केल्या सरकारकडून सुटताना दिसत नाही. हमीभावासाठी सरकार खरेदी केंद्रांची घोषणा करते, पण दरवर्षी या केंद्रांचे घोडे वरातीमागूनच निघते. शेतकऱ्यांचा माल कमी दरात...
सप्टेंबर 25, 2018
मंगळवेढा  : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सभापती प्रदीप खांडेकर...
सप्टेंबर 06, 2018
पुणे - हमीभावाने शेतमालाची खरेदी न केल्यास कैद आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केल्यानंतरदेखील राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवला आहे. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सने बंद मागे घेतल्याचे जाहीर करून दोन दिवस झाले...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव ः बाजार समितीमध्ये एफ.ए.क्‍यू. माल (चांगला दर्जाचा) हा हमी भावाप्रमाणेच खरेदी करावा. जो माल नॉन एफ.ए.क्‍यू. (कमी प्रतीचा) आहे त्याची खरेदी कमी भावाने केली तरी चालेल. मात्र तो माल कमी प्रतिचा असल्याचे समितीने पत्र दिले पाहिजे, असा निर्णय आज जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिला. गेल्या काही...
सप्टेंबर 04, 2018
लातूर - कर्नाटकामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी सुरु आहे. तेथे शेतमाल स्वस्त मिळतो मग महाराष्ट्रातच हमीभावाची सक्ती का? असा प्रश्न खरेदीदारांनी उपस्थितीत केला आहे. मंगळवारी (ता. 4) येथे झालेल्या बैठकीत खरेदीदारांनी शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे दहाव्या दिवशीही लातूर...