एकूण 95 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
मंचर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. १) कांद्याचे बाजारभाव कोसळले. प्रति दहा किलोमागे १५० रुपयांनी बाजारभाव घटले आहेत. निर्यातबंदीपूर्वी प्रति दहा किलोचा बाजारभाव ४५० रुपये होता. मंगळवारी दहा किलो कांद्याला ३०० रुपये बाजारभाव मिळाला. कांदा साठा करण्याची मर्यादाही लागू...
सप्टेंबर 25, 2019
राहुरी - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले...
सप्टेंबर 15, 2019
ओतूर (ता. जुन्नर) येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील उपबाजारात उच्च प्रतीच्या कांद्याला किलोला पस्तीस रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली.  दरम्यान, सध्या ओतूर व परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी चाळीत साठवणूक करून ठेवलेला...
सप्टेंबर 12, 2019
शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे...
सप्टेंबर 04, 2019
संकेश्वर - येथील गेल्या शुक्रवारच्या (ता. 30) जनावर बाजारात बैलजोडीला चक्क 7 लाख 21 हजार रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. येथील दानप्पा कोरी व सोनू शंकर बेळवी यांची ही बैलजोडी सातारा येथील सागर शेठ यांनी विकत घेतली. गत महिन्यामध्ये संकेश्वर येथे बेंदूर साजरा करण्यात आला. त्यावेळी दाती बैलजोडी या...
ऑगस्ट 31, 2019
चाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले बाजार आवारात कोथिंबीर, शेपूचे भाव इतके गडगडले, की कोथिंबीर व शेपूच्या जुड्यांचे ढीग टाकून मिळेल तो कवडी भाव शेतकऱ्यांना घ्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.  पावसामुळे शेतात कोथिंबीर व शेपू पीक मोठ्या...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणांहून मुंबईत भाजीपाला घेऊन येणारे ट्रक अडकले आहेत. त्यामुळे मुंबईला होणारी भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. अशा स्थितीत विक्रेत्यांना कल्याण, पालघर, पनवेल आणि पुण्याहून होणाऱ्या भाजीपाला पुरवठ्याचा आधार घ्यावा...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे श्रावण प्रारंभीच भाजीपाल्याच्या दरांनी मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. शुक्रवार (ता. 2)पासून व्रतवैकल्याच्या...
जून 25, 2019
सोलापूर -  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याला चांगला उठाव मिळाला. किंचित चढ-उतार वगळता दर 'जैसे थे' राहिले. कांद्याला सर्वाधिक १६०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात कांद्याची आवकही कमीच होत आहे....
जून 20, 2019
सटाणा : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभावाअभावी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची वस्तुस्थिती राज्य शासनाने मान्य केली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्टीकरण राज्य शासनाने दिले आहे. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान...
एप्रिल 28, 2019
अमरावती - तुरीच्या स्थिर दरात सरासरी दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे. स्थानिक बाजार समितीत तुरीचे कमाल दर ५ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढीव दराचा लाभ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी किती पडेल, हा प्रश्‍न आहे. सरासरी पाच ते सहा हजार रुपये भाव असलेल्या तिळाचे दर कडाडले असून, ते अकरा हजारांवर...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले. मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या...
फेब्रुवारी 13, 2019
खामखेडा (नाशिक) - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, गेल्या आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मक्याला २ हजारांचा दर ओलांडून तो २१००रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असले तरी...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी २८५१, तर मका २०६८ रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - मागील महिन्यात बाजार समितीत बटाटा व लसूण होलसेल मार्केटमध्ये 4 ते 7 रुपये किलो दराने विकला गेला. दुसरीकडे किरकोळ बाजारात विक्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याने चढ्या भावाने विकला गेला होता. आठ दिवसांपासून बटाटा व लसणाचे भाव वधारल्याचे व्यापारी इब्राहिम खान यांनी सांगितले.  जाधववाडी बाजार...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी 2851, तर मका 2068 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.  औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
जानेवारी 27, 2019
जळगाव - बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादनखर्चही निघत नसल्याचा रोष व्यक्त करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार ट्रॅक्‍टर मोफत कांदे वाटून शासनाचा निषेध केला. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार...
जानेवारी 14, 2019
परभणी - सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्त भाव मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी वक्‍तव्‍य केले. राज्यात शेतमालास भाव नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना श्री. पाटील यांनी ‘शेतकऱ्यांचे नेहमीचेच रडगाणे’ असल्याचे म्हटले. विशेषतः सेंद्रिय भाजीपाला बाजाराच्या उद्‌घाटनाच्या...
डिसेंबर 24, 2018
अमरावती : तुरीच्या शासकीय खरेदीसाठीच्या नोंदणीची मुदत संपली असली तरी शासकीय खरेदी केंद्राचा मात्र पत्ता नाही. नवीन तूर बाजारात येत असताना खुल्या बाजारात खरेदीदारांनी भाव पाडले असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका बसत आहे. दुष्काळामुळे घसरलेली उत्पादनाची सरासरी व कमी...
डिसेंबर 10, 2018
पुणे  - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने विविध भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांमध्ये मुळ्याचे दर शेकड्याला २ हजार रुपयांपर्यंत वाढले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये मुळ्याचे उत्पादन घटल्याने...