एकूण 50 परिणाम
November 28, 2020
हैदराबाद - तेलंगणानमध्ये एसआर नगर पोलिस ठाण्यात एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्याविरोधात हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ग्रेटर हैदराबादद म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणूक प्रचारावेळी दोन्ही नेत्यांना भावना भडकावणारे भाषण केले होते.  एसआर नगरचे...
November 22, 2020
हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल, असं ओवैसी म्हणाले आहेत....
December 16, 2020
कोलकाता- ओवैसीला पैशाने विकत घेऊ शकेल असा कोणी जन्माला आला नाही, असं म्हणत एआयएमआयएम प्रमुखांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. बंगालमधील मुस्लीमांची मतं विभागण्यासाठी भाजप प्रचंड पैसे खर्च करुन हैदराबादमधील एक पक्ष येथे आणू पाहात आहे, असा आरोप बंगालच्या...
November 02, 2020
नवी दिल्ली- प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या कार्टुनवरुन फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये दहशतवादी घटना घडल्या आहेत. जगभरातील काही मुस्लीम देशांनी फ्रान्समधील हत्त्यांचे समर्थन केले आहे, तर काहींनी याचा निषेध केला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (...
November 29, 2020
हैदराबाद- ‘‘हैदराबादला आम्हाला आधुनिक शहर बनवायचे आहे. निजामाच्या संस्कृतीतून या शहराला मुक्त करू,’’ असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी आज दिले. बृहद हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून अमित शहा यांनी आज रोड शो केला. त्यापूर्वी चार मिनार जवळील भाग्यलक्ष्मी...
December 04, 2020
हैद्राबाद : ओवैसी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हैद्राबादमध्ये भाजपाने आघाडी घेतलेली दिसून येत आहे. ग्रेटर हैद्राबाद नगर निगम निवडणुकीच्या 150 जागांवर सध्या मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीतील आकडेवारीनुसार, सुरूवातीला आलेल्या कलांमध्ये भाजपानं 87 जागांवर आघाडी घेतली होती. परंतु आता भाजपा पिछाडीवर...
November 13, 2020
पाटणा - बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांनी बैठकही बोलावली आहे. दुसऱ्या बाजुला राज्यात सर्वाधिक जागा मिळवलेल्या राष्ट्रीय जनता दलानेसुद्धा सत्तेसाठी हालचाली सुरु केल्या असल्याचं म्हटलं...
December 05, 2020
हैद्राबाद : हैद्राबादमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षासाठी धक्कादायक लागले आहेत. कारण या निवडणुकीत भाजप पक्षाने MIM पक्षाला मागे खेचत सरशी घेतली आहे. अवघ्या चार जागांवरुन भाजपाने 48 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कुणाही एका पक्षाला स्पष्ट...
January 02, 2021
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठानमध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन करताना गांधींना सर्वांत मोठा हिंदू देशभक्त म्हटलं होतं. तसेच माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. या महात्मा गांधींच्या वाक्याचा हवाला देत पुढे त्यांनी म्हटलं की...
December 05, 2020
हैदराबाद- एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष ग्रेटर हैदराबादच्या नगर निगमच्या (GHMC) निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे. त्यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने 44 जागा जिंकल्या आहेत. ओवैसी यांनी आपल्या पक्षातर्फे 5 हिंदू...
October 28, 2020
पाटणा Bihar Election 2020 -  बिहारमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान झाले. राज्याच्या एकूण २४३ पैकी ७१ मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे ४२, संयुक्त जनता दलाचे ३५ आणि भाजपचे २९ उमेदवार रिंगणात आहेत. कोरोना संसर्ग...
October 22, 2020
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जमुई विधानसभा मतदार संघातील एका प्रचारसभेदरम्यान बुधवारी (ता.२१) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे माजी...
December 05, 2020
हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला आहे. भाजपने जबरदस्त मुसंडी घेत तब्बल 48 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट करुन भाग्यनगरच्या भाग्योदयास प्रारंभ होत असल्याचे म्हटले आहे. गत...
November 10, 2020
नवी दिल्ली Bihar Election 2020 -  बिहार विधानसभा निवडणुकीचा मतमोजणी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक मतांची मोजणी झालेली आहे. पोलिंग बुथची संख्या यावेळी 63 टक्क्यांहून अधिक होती, असे...
November 29, 2020
रायपूर : केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट ऍक्शन (CoBRA) चे असिस्टंट कमांडो एका हल्ल्याला बळी पडले आहेत. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर इतर 10 जण जबर जखमी झाले आहेत. माओवादी नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात हे जवान जखमी झाल्यामी माहिती आहे. शनिवारी रात्री छत्तिसगढमधील...
December 05, 2020
नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या (जीएचएमसी) निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) सर्वाधिक 56 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, त्यांना बहुमत मिळू शकलेले नाही. भाजपने जबरदस्त मुसंडी मारत दुसऱ्या...
February 12, 2021
औरंगाबाद : सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे अशी मागणी शिवसेना, भाजपसह इतर राजकीय पक्षांकडून केली जात आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेकडून यावर राजकारण करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमध्ये सर्वसामान्य औरंगाबादकरांना काय वाटते, त्यांच्यासाठी कोणते मुद्दे जिव्हाळ्याचे आहेत, त्यांना...
November 29, 2020
नवी दिल्ली- ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन (GHMC) च्या 150 जागांसाठी 1 डिसेंबरला निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजप जीव तोड प्रयत्न करत आहे. अनेक खासदार, मंत्री यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...
November 18, 2020
नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलंय की काँग्रेसचा ग्राऊंड लेव्हलला संघटनात्मक प्रभाव नाही किंवा तो खूप कमकूवत झाला आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केलं आहे. काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी उघडपणे पक्षावर केलेल्या टीकेमुळे पक्षांतर्गत गोंधळ समोर येत असताना...