एकूण 71 परिणाम
जून 07, 2019
औरंगाबाद -  आत्महत्या करीत असल्याच्या स्वतःच चिठ्ठ्या लिहिल्या. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने एका महिलेचा खून करीत अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सोडून तेथून पलायन केले. दुसरीकडे ती मृत असल्याचे समजून पोलिसांनी पतीला अटक केली; पण पोलिसांनी सखोल तपास केल्यावर पत्नीच त्या दुसऱ्या महिलेची मारेकरी...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचार...
जून 03, 2019
औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर...
मे 27, 2019
औरंगाबाद - दुचाकीस्वार तीन माथेफिरू बन्सीलालनगर भागात आले. एकापाठोपाठ पाच चारचाकी वाहनांना लक्ष्य करून ती फोडली. त्यानंतर दुचाकीवरून निघून गेले. ही गंभीर घटना रविवारी (ता. २६) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, महानुभाव आश्रम...
मे 16, 2019
औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय १२, रा....
मे 14, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा परिसरात असलेल्या मोटार गॅरेजमध्ये सोमवारी (ता. १३) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये वीस ते पंचवीस वाहने जळून खाक झाल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी वर्तविला आहे. दरम्यान, सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. रात्री दीडनंतरही आग विझविण्याचे काम सुरू होते. ...
मे 06, 2019
औरंगाबाद - खरेदी केलेल्या घरावरील ताबा सोडत नाही आणि पैसेही परत करीत नसल्याच्या रागातून पुतण्याने काकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी (ता. पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास देवळाई चौकात घडली. खून करून पुतण्या फरार झाला असून, संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके मागावर पाठवण्यात आली आहेत....
मे 03, 2019
औरंगाबाद - कंपनी मालकीच्या वादातून शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात सुरक्षारक्षकाला चाकूने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. याच घटनेत दोन्ही गटांतील चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. एक) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात चौघांना पोलिसांनी अटक केली.  पोलिसांकडून...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपाशी असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला अखेर न्याय मिळाला. ‘सकाळ’मध्ये बातमी प्रकाशित होताच एमजीएम संस्थेने दखल घेतली. सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजता रुग्णवाहिकेमधून त्या व्यक्तीला थेट एमजीएम रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले...
एप्रिल 29, 2019
औरंगाबाद - आजारी पत्नीचे निधन झाल्यानंतर तिच्या विरहात पतीनेही तिच्याच साडीने घराजवळच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही खळबळजनक घटना मुकुंदवाडीतील रामनगर येथे रविवारी (ता. २८) पहाटे तीननंतर उघडकीस आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भाऊसाहेब हिरामन गोसावी (वय ६५, रा. रामनगर,...
एप्रिल 28, 2019
बिडकीन : चितेगाव (ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथील व्हिडिओकाॅन कंपनीच्या व्हॅल्यू इंडस्ट्रीज ( रेफ्रीजरेटर प्लांन्टच्या - स्टोन-15) मधील खुल्या जागेतील भंगार व कच्च्यामालाला रविवारी (ता.२८) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते....
एप्रिल 26, 2019
औरंगाबाद - देशी दारूच्या दुकानाजवळून जाताना दारुड्याने बाटली अर्धवट फोडून तरुणाच्या गळ्यावर दोन वार केले. यात तरुणाचा गळा चिरून तो गंभीर जखमी झाला. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ही घटना रेल्वेस्थानक परिसरात गुरुवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास घडली.  नातेवाइकांकडून प्राप्त...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद - बेफाम कारने दुचाकीला चिरडल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. यानंतर तिचा मंगळवारी (ता.२४) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास आमखास मैदानासमोरील शासकीय कर्करोग रुग्णालयाजवळ घडला. चिरडणारी कार एका पोलिसाची असल्याचा नातेवाइकांचा आरोप...
एप्रिल 22, 2019
औरंगाबाद - सुसाट चारचाकी कारने रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी ठेवलेल्या माठावरच आपली सुसाट चारचाकी वाहन घातल्याची घटना शनिवारी (ता.२०) रात्री बाराच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ घडली. विशेष म्हणजे तेथे झोपलेल्या दोन मुलांच्या अंगावर माठाचे तुकडे फेकल्या गेले; मात्र दैव बलवत्तर म्हणून दोघेही...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद - बारावीची परीक्षा दिलेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. दोन) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यात जगण्याची इच्छा नसल्याचे तिने नमूद केले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पूजा संजय चाथे (वय...
मार्च 20, 2019
शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20) पहाटे 4...
मार्च 19, 2019
माजलगाव : माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगा व भाच्ची गेले होते मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यास वाचवण्यासाठी गेलेल्या आई व भाचीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अकरा वाजता घडली. माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे...
मार्च 06, 2019
औरंगाबाद : लग्न लागले पण संसार फुलण्याआधीच दुसऱ्याच दिवशी डाव मोडल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. हळदीच्या अंगाने बुधवारी (ता. सहा) सकाळी उठून नवरदेवाने मुकुंदवाडी रेल्वेस्थानक गाठले. त्यानंतर समोरुन आलेल्या रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. ही गंभीर व हृदयद्रावक घटनेनंतर हळहळ...
मार्च 06, 2019
औरंगाबाद : शहरातील अंगुरीबाग येथे एका कुलर दुकानला आग लागल्याची घटना बुधवारी (ता. 6) दुपारी सव्वाबारा वाजता घडली. शॉटसर्कीटमुळे आग लागली असुन सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्नीशामक दलाकडून देण्यात आली. अंगुरीबाग येथे शेख अब्बास यांचे रॉयल कुलर दुकान आहे. उन्हाळ्याच्या हंगामामुळे...
मार्च 05, 2019
दौलताबाद :  औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील जांभळा (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) गावाजवळ ट्रक (पीबी13 एएल 7471) व कार (एमएच 20 डीएफ  295) यांची समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील दोन ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 5) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात मोठा...