एकूण 241 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण लढणार, असा प्रश्‍न सध्या उपस्थित केला जात आहे. अनेकांनी आधीच लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उमेदवाराबाबतचे गूढ आणखीच वाढले आहे. असे असले तरी येथून देवेंद्र फडणवीस यांना सरप्राइज देणार असल्याचे संकेत कॉंग्रेसच्या...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी सुरू आहे. पुण्यात भाजपसोबत युती होणार की नाही, हे कळत नसल्याने शिवसेनेकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. मनसेचे ‘इंजिन’ यार्डातच अडकणार की निवडणुकीत...
सप्टेंबर 21, 2019
भाजप, शिवसेना आणि मनसेचा बैठकांचा सिलसिला मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तासांचाच अवधी शिल्लक असताना राज्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्ताधारी भाजपच्या निवडणुक समितीचा बैठक पार पडली असून, या बैठकीत राज्यातील...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 20, 2019
नाशिक - महाराष्ट्रातील ‘सोशल इंजिनिअरिंग’मध्ये न बसणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदी यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा झेंडा रोवून विजयोत्सवासाठी नाशिकच्या रामनगरीत येईन. मोदींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनीच मला राज्यावरील...
सप्टेंबर 19, 2019
मोठ्या पटलावर राजकीय पक्षाची उभारणी करताना विविध विचारांच्या लोकांची साथ लाभावी लागते, त्यांच्या विचारांचा आदरही करावा लागतो. सांघिक नेतृत्व मान्य करावे लागते. प्रकाश आंबेडकरांना ही फूटपट्टी लावली तर ते कुठे बसतील? लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होत होते, त्याचवेळी दुपारच्या सुमारास...
सप्टेंबर 17, 2019
कणकवली - मासेमारीच्या संदर्भात होणारे परप्रांतियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा करण्याचे काम केंद्रात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. कणकवली येथील जनादेश यात्रेत मुख्यमंत्री तीन तासाहून अधिक काळ उशीराने दाखल झाले. त्यामुळे जनतेला ताटकळत बसावे लागले. जनादेश यात्रेत...
सप्टेंबर 17, 2019
वैयक्‍तिक हित जपताना दलित समूहाचे संघटन झाले असते, आरपीआयची राजकीय ताकद बनून दबाव गट तयार झाला असता; तर आरपीआयची अवस्था आजच्यासारखी झाली नसती. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या आलेल्या अनुभवातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. पण १९६५...
सप्टेंबर 17, 2019
१४५ - १२५ - १८ जागांचा फॉर्म्युला; भाजपच्या सहमतीची शक्यता मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सिंहाचा वाटा मागणाऱ्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १४५ - १२५ - १८ जागांच्या फॉर्म्युलावर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे....
सप्टेंबर 16, 2019
जयसिंगपूर - महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात येईल. येत्या पाच - सहा वर्षात हे काम मार्गी लागल्यानंतर पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. आजपर्यंत काँग्रेस - राष्ट्रवादीने नैसर्गिक आपत्तीच्या काळात तुटपुंजी मदत केली. भाजपने मात्र पाचपटीने अधिक मदत दिली आहे....
सप्टेंबर 15, 2019
शिराळा - काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजीत देशमुख यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. सत्यजीत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादीने नेहमीच आम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस आपला माणूस सोडून...
सप्टेंबर 15, 2019
विधानसभा 2019 यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र पक्षातील ‘बडे मासे’ भाजपच्या गळाला लागल्याने अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रचार सभांमुळे ‘लाइम लाइट’मध्ये असणाऱ्या राज ठाकरे यांचा मनसे...
सप्टेंबर 14, 2019
शिराळा - भाजपच्या महाभरतीत जिल्ह्यातील एक महत्त्वाचे काँग्रेस नेते गळाला लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिराळा काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचं ठरलंय, ते रविवारी जनतेला कौल मागणार आहेत. ‘मला तुमच्याशी बोलायचंय’,  असे म्हणत त्यांनी जनसंवाद मेळावा आयोजित केला आहे. रेड...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 11, 2019
पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा भाजपप्रवेश मुंबईत झाल्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवनात असलेला त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी तातडीने हटवला. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर अखेर...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 06, 2019
उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या बलबुत्यावर आणि विशेषत: दिल्लीतून आलेल्या ‘मोगली फौजां’च्या विरोधात लढून हे यश मिळवलं होतं! काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांना या निवडणुकीत अर्धशतकही गाठता आलं नव्हतं... महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक ही सर्वार्थाने अभूतपूर्व ठरली; कारण या निवडणुकीत...
सप्टेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण हळुहळू तापू लागले आहे. निवडणुका हा संसदीय लोकशाहीतील एक महत्त्वाचा उत्सव. सत्तेसाठी विविध राजकीय पक्षांत स्पर्धा व्हावी आणि त्यांनी सर्वसामान्य मतदाराला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करायचा, हे या लोकशाहीचे एक वैशिष्ट्य असते. त्यामुळेच मतदाराला, म्हणजेच...
सप्टेंबर 05, 2019
इंदापूर - इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दगाबाजी व काँग्रेस नेत्यांच्या हतबलतेमुळे व्यथित झालेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज (ता. ४) जुन्या इंदापूर बाजार समितीच्या पटांगणात विराट सभेस कौल मागितला आणि सभेने त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला. त्यांनीही हा...
सप्टेंबर 03, 2019
विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...