एकूण 42 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 08, 2019
ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - केंद्रात भाजप मोठा भाऊ असला, तरी महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याच्या गर्जना शिवसेना करीत होती. मात्र, आता शिवसेना महाराष्ट्रातही लहान भावाची भूमिका मान्य करण्यास तयार असल्याचे सूतोवाच होत आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच युतीचा फॉर्म्युलाही निश्‍चित झाला असून,...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई - ‘भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली, त्यानुसार फॉर्म्युलाही  ठरला आहे,’’ असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. मात्र तो भाजपलाच मान्य नसेल, तर मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई - महाजनादेश यात्रेची नाशिक येथे सांगता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप- शिवसेना युती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. यामुळे भाजप- शिवसेना युतीची वाट बिकट असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर शिवसेनेकडे दुर्लक्ष करून जागावाटपात कमी महत्त्व...
सप्टेंबर 17, 2019
१४५ - १२५ - १८ जागांचा फॉर्म्युला; भाजपच्या सहमतीची शक्यता मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सिंहाचा वाटा मागणाऱ्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १४५ - १२५ - १८ जागांच्या फॉर्म्युलावर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे....
सप्टेंबर 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे...
सप्टेंबर 11, 2019
समसमान जागावाटपाचे सूत्र भाजपला अमान्य मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपदरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या सात फेऱ्यांत कोणताही समाधानकारक फॉर्म्युला निघाला नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट हाच जागावाटपाचा मार्ग असेल, असे उच्च...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे....
जुलै 28, 2019
नवी मुंबई : मोदी लाटेतही नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्याला अखेर पक्षांतराची झळ लागली आहे. गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांच्यासह आता राष्ट्रवादीचे तब्बल 52 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शहरात...
जुलै 27, 2019
मुंबई : महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज येथे केले. राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे ‘लोकशाही पुरस्कार’ उपराष्ट्रपती एम...
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची भीती भाजपला...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रशांत किशोर यांनी...
मार्च 18, 2019
मुंबई - लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. मात्र, कॉंग्रेस आघाडीतील जागावाटप, मतदारसंघांची अदलाबदल आणि उमेदवारांच्या नावाबाबत अद्यापपर्यंत घोळ सुरूच आहे. शिवसेना- भाजपने अद्याप उमेदवार घोषित केले नसले, तरी त्यांची यादी तयार आहे. मुख्यमंत्री...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
मार्च 11, 2019
मुंबई - राज ठाकरे म्हणजे बारामतीचा पोपटच असून, त्यांच्या भाषणांच्या स्क्रिप्ट या बारामतीहूनच येतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज केला. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मुंबई विभागीय भाजपच्या महिला...