एकूण 28 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला तालुक्‍यात पुन्हा एकदा उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक श्री. सत्तार व समर्थकांच्या वतीने शनिवारी (ता.24) शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आल्यामुळे...
जुलै 10, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी आणि नव्याने समोर आलेली आव्हाने यांचा सविस्तर विचार करण्यासाठी भाजपने चिंतन सुरू केले आहे.  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणत्या मतदारसंघात काय केले यापेक्षाही काय करायचे राहिले यावर भर देत एकेका मताची बेगमी करण्यासाठी बैठका सुरू झाल्या...
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची भीती भाजपला...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - "आई अंबाबाई केंद्रात युतीची सत्ता येऊ दे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ देत.' अशी प्रार्थना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवीच्या चरणी केली. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह अंबाबाईचे दर्शन घेतले.  विधानसभा...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. २४) येथे फुटणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी सहाला होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली. सभेच्या निमित्ताने युती जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्षांनी...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - दानवे-खोतकर यांच्यातील राजकीय वादावर आजअखेर पडदा पडला. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधातील बंड मागे घेतले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १७) झालेल्या बैठकीत खोतकरांनी...
मार्च 17, 2019
औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बाण खाली ठेवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.  खोतकर म्हणाले, की शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे. आता युतीच्या कामासाठी लागायचे आहे. त्यामुळे मी आता युतीसाठी काम करणार...
मार्च 17, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालन्याची जागा भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर करण्याच्या आड शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर शड्डू ठोकून उभे आहेत. जालना लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे घ्यावी अन्यथा रावसाहेब दानवे...
मार्च 16, 2019
सोलापूर - ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची...
मार्च 16, 2019
अमरावती - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली भाजप-शिवसेनेची युती भविष्यातही अभेद्य राहील. युती झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी पडले असून, विरोधकांनी रिंगणातून माघार घेणे सुरू केले आहे. ही युती सत्तेसाठी नसून हिंदुत्व व राष्ट्रीयत्वासाठी आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात...
मार्च 13, 2019
मुंबई - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे मंत्री, पदाधिकारी तसेच विखे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे यांच्या भाजपप्रवेशाने नगर जिल्ह्यातील राजकारणाला...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र...
मार्च 09, 2019
कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारी भाजप कार्यकर्त्यांनी ठेवली आहे. तेथे कोणत्याही परिस्थितीत विनायक राऊत नकोत, अशीही एकमुखी मागणी कार्यकर्त्यांची आहे. ही भावना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोचविणार...
मार्च 07, 2019
मुंबई - सध्या ‘मातोश्री’वर दररोज उमेदवार निश्‍चितीसाठी विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या वेळी गटबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना ‘मी देईन त्याच उमेदवाराचे काम करा, नाहीतर मी तो मतदारसंघ भाजपला सोडेन,’ असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीसाठी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 18, 2019
मोखाडा-  स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली असतांना, युतीची मात्र अधिकृत घोषणा झालेली नसताना, पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. जिल्हयातील भाजप पदाधिकारी आक्रमक झाले. मनोर...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई- आगामी निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी कंबर कसली असताना ‘मातोश्री’ने मात्र ‘एकला चलो रे’ची तयारी सुरू केली आहे. सध्या धनुष्यातून प्रचाराचे बाण सुटले असून, प्रत्यक्षात युतीचे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्याच मतदारसंघांत ‘निर्धार मेळावे’ घेऊन सत्ताधाऱ्यांची...