एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले...
ऑक्टोबर 13, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही तर, चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीची केस जिंकणारा वकीलही मीच आहे परंतु, माझी ही ओळख कुणीही करून देत नसल्याची,'' खंत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : भाजपचे उमेदवार असलेल्या बहुतांश मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "जनादेश यात्रे'द्वारे पोहचले असले, तरी उमेदवारांची मागणी लक्षात घेत तब्बल 50 मतदारसंघांत ते जाहीर सभा घेणार आहेत. आजपासून (ता. 9) त्यांच्या सभांना सुरुवात होणार असून पहिली सभा धुळ्यात होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज (शनिवार) अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. Shri @Chh_Udayanraje joining BJP in the presence of Shri @AmitShah https://t.co/IVvYo8964B — भाजपा...
ऑगस्ट 30, 2019
कोल्हापूर - आज-उद्या करत लांबलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून, ५ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. श्री. महाडिक यांनीच आज या...
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. श्री. महाडिक यांचा भाजप प्रवेश झाल्यास हा राष्ट्रवादीला पश्‍चिम...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे बाहुबली नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे उदयनराजे यांचे म्हणणे असले, तरी ते भाजपमध्येच...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 17, 2019
नाशिक : एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा 26 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी बुधवारी मनसेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या 29 रोजी मतदान होत असल्याने शेवटच्या...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 07, 2019
केडगाव : देशात कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांना बारामतीच्या पवार कुटुबियांवर टीका करावी लागते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले...
एप्रिल 01, 2019
लोकसभा 2019 वर्धा : महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ भाजपने आज वर्ध्यात फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा येथे घेण्यात आली. ही सभा सध्या बऱ्याच कारणांनी गाजत आहे. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांवर डागलेल्या टिकास्त्रामुळे...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
फेब्रुवारी 04, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याला अवघा महिना उरला असताना अद्यापही खासदारकीचा चेहरा कोण, याचे उत्तर देण्यात भारतीय जनता पक्ष अपयशी ठरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. गेली चार वर्षे संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केलेल्या पदाधिकाऱ्यांची झालेली ही कोंडी मुख्यमंत्री फोडणार कधी, असा प्रश्‍...
डिसेंबर 10, 2018
पुणे - ""भारतीय जनता पक्षाकडील सत्ता हिसकावून घेण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी एवढ्या पक्षांची आघाडी होणे शक्‍य नाही. मात्र, प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटपाचे गणित सोडविता येईल. पक्षांचा जनाधार पाहता त्या-त्या राज्यांत त्यांना झुकते माप द्यावे लागेल, अशी...
मे 24, 2018
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या निरंजन डावखरे यांचे पक्षात स्वागत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रांग असून, त्यासाठी थोडावेळ वाट पाहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन...
एप्रिल 09, 2018
वारजे माळवाडी - अच्छे दिन काय बुरे दिन पेक्षा ही अधिक वाईट परिस्थिती नरेंद्र मोदी सरकारमुळे आली आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांना त्यांच्या व्यथा, मानसिकता प्रदर्शित करण्यासाठी एक विश्वासनिय जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली असल्याने हल्लाबोल सभेला मोठी गर्दी जमा होत आहे. असे मत...