एकूण 150 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काही तासांनी थंडावणार आहे. प्रचार सभा संपण्यास आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन दिवसांनी मतदान होणार असताना राज्यभरात सोशल मीडियावर एक गाणे धुमाकूळ घालत आहे. - Vidhan Sabha 2019 : बारामतीतील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवा : पडळकर सोशल मीडियावरील हे रॅप साँग...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी, खरे प्रेम करणारा हवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच नाशिकचा विकास छगन भुजबळ यांनी केला. पण या सरकारने नाशिककडे साफ दुर्लक्ष केले, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस...
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मातोश्रीच्या घिरट्या घालणाऱ्या सुनील तटकरे यांना घरी बसवा. भरत गोगावले यांच्यासारखी सोंगाडी माणसे विधानसभेत नको. अशा सौम्य टीकेपासून सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी घसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : महायुतीच्या जागा वाटपात नाराज असलो तरी मी भाजप सोबत आहे, त्याला कारण म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोणालाही मोठं होऊ न देता सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. भाजप सरकारच्या काळात सर्वचं सकारात्मक झाले असे मी म्हणतं नाही, निदान प्रयत्न तरी झाले यावर माझा विश्‍वास असल्याचे मत महायुतीतील...
ऑक्टोबर 15, 2019
इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा)...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019  घनसावंगी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार तेल लावून उभेत समोर पैलवानच नाहीत, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पैलवान आणि कुस्ती यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : नारायण राणे हे बेधडक व्यक्तिमत्व आहेत. राणेंचा स्वाभिमान आम्ही विलीन करत नाही, त्यांचा स्वाभिमान सांभाळून आम्ही त्यांचा पक्ष आमच्यात विलीन करत आहोत. ते भाजपचेच खासदार आहेत. नारायणराव आणि नितेशला मी एक सल्ला दिला, की तुम्ही शिवसेनेविरुद्ध वक्तव्य करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : सत्तेचा वापर करून मक्ता तयार करणे हे त्यांचे राजकारण होते. त्यामुळे आता ते चालत नाही. शरद पवारांचे राजकारण या पिढीला मंजूर नाही. मोदीजी जे करतात ते या पिढीला हवे आहे. मी कधीही शरद पवारांना फोन केला नाही की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. ते खोटे बोलत आहेत. काही फोन मला आले, त्याबद्दल मी...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना युतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी शरद पवारांना शतायुषी व्हावं लागेल, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. ही मुलाखत आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 13, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही तर, चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीची केस जिंकणारा वकीलही मीच आहे परंतु, माझी ही ओळख कुणीही करून देत नसल्याची,'' खंत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
बार्शी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, पण कुस्ती खेळायला कोणच नाही या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुस्ती पैलवानांशी होते, 'अशांशी' नाही, असे म्हणत हातवारे केले. फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवारच होते : शिवसेना...
ऑक्टोबर 10, 2019
जत : महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी काय केले हे सांगावे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे घराणेशाहीत अडकले. पण, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रला स्थिर सरकार दिले आहे. दिवस-रात्र काम करणाऱ्या फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सतत फोन करत असतात,...