एकूण 289 परिणाम
जुलै 14, 2019
फ्रेदरिकचे आई-वडील, स्वीडनमधला मित्र, डोंबिवलीतला रंजन ही मंडली माझ्या मित्रपरिवारातली आहेत, याचा मला खूप आनंद वाटतो. ज्यांना प्रेमाची व वात्सल्याची गरज आहे त्यांना ते देण्यात ही माणसं आयुष्य खर्च करतात. अशा माणसांना प्रसिद्धी आवडत नाही. मात्र, समर्पित भावनेनं व आनंदी जीवनाचा अनुभव घेण्यासाठी अशीच...
जुलै 14, 2019
विरोधी पक्ष भक्कम झाला तर सत्ताधारी पक्षही भक्कम होण्याचा प्रयत्न करेल अन्‌ मग खरी निकोप स्पर्धा होईल. जगात सर्वत्र - काही अपवाद वगळता, विशेषतः आशियाई देश सोडून - द्विपक्षीय रचनाच आहे. छोटे पक्ष, अपक्ष हा प्रकारच तिकडं नाही. भारतही हा मार्ग निश्‍चितच स्वीकारू शकतो. भक्कम दोन पक्ष असतील तर सर्वात...
जुलै 14, 2019
मला "वेंधळी' म्हणण्यात मिस्टरांना, मुलाला आनंद व्हायला लागला. आपल्या "वेंधळे'पणात सगळ्यांनाच आनंद वाटतोय हे लक्षात आल्यावर मलाही माझा "वेंधळे'पणा आवडायला लागला! माझा "वेंधळे'पणा मी मान्य केल्यावर मग सगळंच सुरळीत सुरू झालं... सुलभा...सुलभाच होती ती. "ह्यां'ची बदली झाल्यामुळं आम्ही नुकतेच पुण्यात आलो...
जुलै 14, 2019
अंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : "घरला चला, खैदान आलंया, खैदान...' आभाळाकडं बघत बघतच त्यांची पावलं घराच्या दिशेनं पडू लागली. चालता चालता वाऱ्यावरती लपक लपक करणारी लुगडी-धोतरं सावरू लागली. त्या हडबडीत कधी...
जुलै 07, 2019
सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-...
जुलै 07, 2019
देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. प्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट...
जुलै 07, 2019
अरुणाचल प्रदेश. ईशान्येकडचं महत्त्वाचं राज्य. या भागातल्या अन्य राज्यांप्रमाणेच इथली खाद्यसंस्कृतीही वेगळी आहे. "बांबू शूट्‌स'चा वापर इथल्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या राज्यातल्या अशाच काही हट के पाककृतींविषयी.... अरुणाचल प्रदेश हा पूर्वी "नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी' (नेफा) या...
जुलै 07, 2019
'भारतात गेल्यावर त्या "विदूषका'ला भेटायचंही नाही. तू त्याला भेटलीस तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील,' अशी तंबीच जस्सीला आईकडून मिळाली होती. त्यावर जस्सी म्हणाली ः 'ममा, तू कशाला यात पडतेस? माझं मला पाहू दे ना...'' वाचकमित्र हो, गेल्या जानेवारीपासून गुन्हेगारी जगताविषयीचे माझे काही अनुभव...
जून 23, 2019
आषाढ महिना लागला, की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते वारीचे. पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोहळ्यामध्ये किती तरी वारकरी अतिशय समरसून सहभागी होतात. विठुमाउलीच्या भेटीची ओढ लागते, पावलं पडत जातात आणि मनात आनंदसरींचा वर्षाव होत राहतो. उत्साह कमी होत नाही, की त्यातलं भारलेपण कमी होत नाही. उद्या (२४) आणि...
जून 23, 2019
पश्‍चिम दिशेला क्षितिजावर लाली पसरली. सूर्यास्ताची चाहूल लागली. बाली हे बेट असल्यानं क्षितिजावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं अवर्णनीय असतं. सूर्याची स्वारी निरोप घेत होती आणि दुसऱ्या बाजूनं पायऱ्या चढून नृत्यकलाकार रंगमंचावर अवतरत होते. कलाकार रंगमंचावर चक्‌चक्‌ आवाज करू लागले. कसलंही वाद्य नव्हतं...
जून 16, 2019
"सिक्‍सर किंग' अशी ओळख असलेल्या युवराजसिंगनं नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली. यश आणि अपयशाचे हिंदोळे अनेक वेळा अनुभवलेला युवराज अनेक अर्थांनी एक विरळा क्रिकेटपटू. लहानपणीच्या कष्टप्रद सरावापासून ते विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या अप्रतिम कामगिरीपर्यंत आणि कर्करोगासारख्या आजारावर मात...
जून 16, 2019
"इंटरनॅशनल बॅकॅलॉरिएट' म्हणजे "आयबी' डिप्लोमा अभ्यासक्रमाची सुविधा ज्या शाळांमध्ये असते त्या शाळेतल्या अभ्यासक्रमात आपल्या देशाची व जगाची ओळख करून देणारे विषय असतात. "समाजसेवा' व "ज्ञानाचा सिद्धान्त' हे विषय सक्तीचे असतात. समाजसेवा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांना खूप महत्त्व दिलं जातं....
जून 16, 2019
वटपौर्णिमा आणि सत्यवान-सावित्रीची आख्यायिका हे एकजीव झालेलं "सूत्र'. या आख्यायिकेचा अर्थ आजवर अनेकांनी आपापल्या परीनं लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी एक वेगळा अर्थ गवसलेला हा लेख आजच्या (16 जून) वटपौर्णिमेनिमित्त... नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यासंगे मला सावित्रीची कहाणी कोडं घालत येते. वटवृक्षाला...
जून 16, 2019
थोर झालेली माणसे आत्मचरित्र लिहितात असे आम्ही ऐकून होतो; परंतु थोर होण्याची प्रक्रिया फारच किचकट असल्याने, आत्मचरित्रे लिहूनच अनेक माणसे थोर होतात असे आम्हाला समजले. आपणही हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही, असे आम्हास वाटून गेले. आम्ही एका प्रकाशकाशी याबाबतीत चर्चा केली. 'आयुष्याच्या कुठल्या...
जून 09, 2019
आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...
जून 09, 2019
"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे! सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन...
जून 09, 2019
जेव्हा त्यांच्या बोलण्यात रुदरपूरचा उल्लेख आला, तेव्हा या खुनाच्या संदर्भात या गावाचं नाव ऐकल्यासारखं वाटल्यानं मी माझी डायरी काढली. काउंटी पोलिसांचे अधिकारी बॉयर आणि लेकर यांच्या बोलण्यात रुदरपूरचं नाव आल्याचं माझ्याकडं नोंदलेलं होतं. त्यामुळे ते नाव ओळखीचं वाटत होतं. कधी ना कधी खुनाला वाचा ही...
जून 09, 2019
आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे ते मिळालं नाही, तर आपण नाराज होतो. त्यामुळं आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
जून 02, 2019
ज्या ज्या कामगारांना मी भेटलो, त्या त्या कामगारांची कामं वेगवेगळी; पण अमानुष कष्टांचा, उन्हात भाजण्याचा आणि कमी मजुरीचा सर्व कामांतला दुवा मात्र समानच. भर उन्हात भाजणारी ही माणसं बघितली की "यांच्या वाट्याला येणारी दुःखं ही माणसांची दु:खं नाहीत' असंच वाटत राहतं... ऐन मे महिना. तापमान 42 च्या आसपास....