एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
रिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या सवयींपासून, कौटुंबिक व्यवस्थेपर्यंत आणि तांत्रिक गोष्टी बदलण्यापासून ‘डेटा’ची भूक वाढल्यानं होऊ घातलेल्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ घातले आहेत....
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
फेब्रुवारी 03, 2019
राजकीय अर्थव्यवस्थेत चांगले अर्थशास्त्र हे वाईट राजकारणावरच आधारित असण्याची गरज नाही, हे मोदी यांच्या पाच गोष्टींनी सिद्ध केले आहे. मतपेढीवर लक्ष केंद्रित करीत मोदी सरकारने पाच वर्षांच्या काळात आर्थिक क्षेत्रात एक तर अतिशय उत्तम किंवा अतिशय खराब कामगिरी केली केली, असे म्हणता येईल. याबाबत ‘वास्तव...
जानेवारी 24, 2019
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबईत माणसांचे इनकमिंग वर्षागणिक वाढते आहे. या बेटांवरची जमीन टोलेजंग इमारतींनी व्यापली आहे. त्यामुळे आता पाय पसरायला जागा नाही. इमारती आता आकाशाकडे झेपावत आहेत. मुंबईत येणाऱ्यांना त्या इमारतींमध्ये सहजासहजी घर मिळत नाही....
जानेवारी 22, 2019
'दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...' असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
नोव्हेंबर 04, 2018
श्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची औपचारिकताही पुरी न करता विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून केलेली उचलबांगडी ही त्या देशातल्या संसदीय आणि न्यायालयीन लढाईला तोंड फोडणारी आहे. तिथं आता एकाच...
ऑक्टोबर 14, 2018
"रिसर्च ऑफ रिसर्जन्स फाउंडेशन (आरएफआरसी) या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेने मागील आठवड्यात "एज्युकेशन फॉर रिसर्जन्स' (पुनरुत्थानासाठी शिक्षणाचा उपयोग) या परिषदेचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या परिषदेचा उद्देश संवाद, सहयोग आणि सहमतीच्या माध्यमातून आपल्या उच्चशिक्षण...
जून 03, 2018
इंटरनेटच्या वेगाच्या स्पर्धेत "फर्स्ट जनरेशन' ते "फोर्थ जनरेशन'पर्यंत असं एकापाठोपाठ एक तंत्रज्ञान बाजारात आलं. येत्या दोन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत भारत 5G त बदललेला असेल. "पहिल्यापेक्षा दुसरं अधिक वेगवान आणि वापरण्यासाठी सुसह्य' हे एकमेव सूत्र...
मे 10, 2018
वाकाटकांचा राजा हरिषेणाच्या इ. स. 480 च्या सुमारास झालेल्या मृत्यूनंतर अजिंठ्याचे मानवनिर्मित आश्‍चर्य आणि वैभव जणू लुप्तच झाले होते. ते थेट 1819 मध्ये इंग्रज सैन्याधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ या जंगलात शिकारीला आला, तेव्हा त्याच्या नजरेसमोर आले आणि पुन्हा जगप्रसिद्ध झाले. वाघूर नदीपात्रात उतरणाऱ्या...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
एप्रिल 15, 2018
नेपाळचे पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...
फेब्रुवारी 21, 2018
नीरव मोदी, विजय मल्यासारख्या प्रवृत्तींना आपल्या देशात शाही वागणूक मिळते आणि शेतकऱ्यांना मात्र कावळ्यासारखे टोचे मारून हैराण केलं जातं. शेतकरी आस्मानी संकटाने गांजून गेलेला असताना समाजातील एक वर्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात कोल्हेकुई करत आहे. त्यांचा पवित्रा शेखचिल्लीसारखा आहे. शेतकऱ्यांची उपेक्षा...
फेब्रुवारी 15, 2018
राज्यात ग्रामीण विकासाच्या चळवळीने आता चांगलीच गती घेतली आहे. बेघरांसाठी घरकुलांची निर्मिती, रस्ते विकास, जलसंधारण, स्वच्छता अभियान, कौशल्य विकास, महिलांचे सक्षमीकरण अशा विविध योजना युद्धपातळीवर राबविल्या जात आहेत. महाराष्ट्रातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्धार आहे. ...
जानेवारी 28, 2018
वाहतूक या क्षेत्रामध्ये आगामी काळात झपाट्यानं बदल होणार आहेत. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिमपासून ‘हायपरलूप’सारख्या पर्यायापर्यंत अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. हे सगळे बदल कशा प्रकारे होतील, त्यामुळं नक्की काय होईल, इतर परिणाम काय होतील आदी गोष्टींचा ऊहापोह. देशाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं एकक...
जानेवारी 06, 2018
अलीकडील काळात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे स्वागत केले पाहिजेच; पण जेवढ्या प्रमाणात हे बदल होत आहेत आणि ज्या वेगाने विकासाला गवसणी घालण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, त्यासाठी मोठा गृहपाठ करावा लागणार आहे. अलीकडेच मुंबईत घडलेल्या आगीच्या दोन दुर्घटनांनी पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत आपण किती अपरिपक्‍व...
ऑक्टोबर 29, 2017
स  रकारनं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी; तसंच महामार्गबांधणी प्रकल्पासाठी ‘अर्थबळ’ देण्याची घोषणा केली आहे. ‘भारतमाला’ आणि ‘सागरमाला’ प्रकल्पांसाठी पुढच्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे. ‘भारतमाला’ प्रकल्पाअंतर्गत पुढच्या...
सप्टेंबर 18, 2017
पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर होत असलेली टीका हे आपल्या सामूहिक भयगंडाचे उदाहरण ठरू शकते. अशाच प्रकारच्या भयगंडातून आपण अनेक चांगली, गुणकारी औषधे दूर सारतो आणि छान दिसणाऱ्या, चवीला गोड, मात्र परिणामशून्य औषधांना जवळ करतो.   होमिओपॅथी ही वैद्यकशास्त्रातील तुलनेने...