एकूण 19 परिणाम
November 09, 2020
मुंबईः अभिनेता अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले आहेत. अर्जुन यांना येत्या ११ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.  आज सकाळी  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली....
October 28, 2020
मुंबई,ता.२८ : घाटकोपरमधील असल्फा येथे नाल्यात पडून मृत्यू झालेल्या शितल भानुशाली यांच्या मृत्यूंचे गुढ वाढले आहे. भानुशाली यांना नाल्यात पडताना कोणीही पाहिलेले नसून तसेच त्यांचा मृतदेह माहिम खाडीच्या परीसरात मिळण्याची शक्यता असताना हाजीअलीला मिळणे आश्‍चर्याकारक आहे. त्यामुळे आता पुढील तपास...
October 26, 2020
मुंबई:  सेंटर मॉलला लागलेल्या आगीची सोमवारपासून अग्निशमन दलाकडून चौकशी सुरु होणार आहे. या मॉलमध्ये काही बेकायदा स्टॉल्स तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अंतर्गत प्रतिबंधक यंत्रणाही काम करत नसल्याचाही संशय आहे. नागपाडा येथील सेंटर मॉलला गुरुवारी रात्री आग लागली होती. ही आग शनिवारी विझल्यानंतर...
October 22, 2020
मुंबई : पालघर येथील साधू हत्येप्रकरणी गेल्या दोन दिवसांत 32 संशयीतांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. याप्रकरणी तपासात आरोपींचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमावाच्या मारहाणीत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. गेल्या दोन दिवसांत याप्रकरणी 32...
October 21, 2020
मुंबई, ता. 21 : भाजप सरकार विरहित कोणत्याही राज्यात सीबीआय चौकशीचा वाद सुरू असतानाच आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने अशा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाशिवाय सीबीआय चौकशी करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंग प्रकरण असो अथवा एका खासगी दूरचित्रवाणी बाबतच्या टीआरपी घोटाळ्याची चौकशी...
October 21, 2020
मुंबई, ता. 20 : फेक TRP प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आलेल्या हन्साच्या दोन माजी कर्मचाऱ्यांच्या चौकशीत महामुव्ही आणि न्यूज नेशन या वाहिन्यांसाठीही त्यांनी पैसे घेतल्याचे सांगितले आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. दिनेश विश्वकर्मा ( वय 37 वर्ष ) आणि रामजी वर्मा ( वय 44 वर्षे ) अशी अटक केलेल्या...
October 14, 2020
मुंबई : खोट्या टिआरपी प्रकरणात बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे अँकर निरंजन नारायणस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत याप्रकरणी सुमारे 40 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हंसा कंपनीच्या एका कागदपत्राच्या आधारे पोलिस चुकीची कारवाई करत असल्याचा दावा 10 ऑक्टोबरच्या एका शोमध्ये निरंजन यांनी केला...
October 14, 2020
मुंबई : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे 'जलयुक्त शिवार'. याच जलयुक्त शिवारची आता महाविकास आघाडी सरकारकडून खुली चौकशी केली जाणार आहे. तसा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलाय. त्यामुळे येत्या काळात SIT मार्फत जलयुक्त शिवार योजनेची खुली...
October 09, 2020
मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली होती. त्यासाठी बॉट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती एक लाखाहून अधिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. अभिनेता सुशांत...
October 06, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्सने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा अहवाल CBI ला पाठवलाय. या अहवालात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं बोललं गेलं....
October 06, 2020
मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांने १४ जून २०२० ला आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला जवळपास तीन महिने झाले. मात्र अद्यापही सुशांतच्या मृत्यूवरुन सुरु असलेला वाद अद्याप संपलेला नाही. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांद्वारे सुरु करण्यात आला....
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
October 01, 2020
मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचा (NCB तपास 2019 पर्यंत मर्यादीत झाला आहे. त्यापूर्वीचा कॉल डिटेल्स मिळणे शक्य नसल्यामुळे 2019 पूर्वीच्या चॅटबद्दल पुरावे मिळवणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. एनसीआरबीने याप्रकरणी अभिनेत्री दिपिका पदुकोणच्या...
September 30, 2020
मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपास करणारे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधीत पथकाचे कोरोनाग्रस्त झालेले 20 अधिकारी लवकरच पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी एनसीबीने तपासाची चक्रे हलवित अनेक अमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली...
September 26, 2020
मुंबई : सध्याच्या घडीची बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी संपलीय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमार्फत दीपिकाची चौकशी करण्यात आली. तब्बल पाच ते साडे पाच तास चौकशी केल्यानंतर आता दीपिका पदुकोण NCP कार्यालयातून निघाली आहे. सकाळी माध्यमांना गुंगारा देत ज्या क्रेटा गाडीतून दीपिका...
September 22, 2020
मुंबई, ता.22ः  देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या शापूरजी पालमजी ग्रुपच्या प्रमुखांच्या मुलीच्याच खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 62 वर्षीय लैला रुस्तम जहांगीर यांच्या खासगी बँकेतील खात्यात सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लैला या...
September 20, 2020
मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी स्फोटाप्रकरणी फाशी देण्यात आलेला याकुब अब्दुल्ल रज्जाक मेमन याची कबर विकल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कबर मरीन लाईन्स येथील बडा कब्रिस्तानामध्ये होती. परवेज इस्माईल सरकारे (54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
September 17, 2020
मुंबई- गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ करण जोहरच्या हाऊस पार्टीचा होता. या पार्टीमध्ये दीपिका पदूकोण, अर्जुन कपूर, मलाईका अरोरा, शाहिद कपूर, वरुण धवन अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत अनेक लोक दिसून आले होते. या व्हिडिओ स्वतः करण...
September 16, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तापलेलं पाहायला मिळालं. मुंबईत पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केला नाही. दरम्यान मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलीस असा सामनाही ...