एकूण 36 परिणाम
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्याची टाकी हाकेच्या अंतरावर, डोळ्यांदेखत दिवसभर टॅंकर भरून जातात; मात्र एन-सात पाण्याच्या टाकीजवळच्या आंबेडकरनगरात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. घरात पाण्याच थेंब नाही, असे म्हणत घोषणाबाजी करीत शनिवारी (ता. ११) संतप्त महिलांनी...
मे 11, 2019
नांदुरा : संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दिवसागणिक पाणी समस्या गंभीर होत असल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरले आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० गावात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने या दोनशे गावासाठी २०७ टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागल्याचे चित्र असून १७४ विहीर अधिग्रहणासोबतच नविन २८३ विंधन...
मे 06, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसामुळे भूजलपातळी दिवसेंदिवस घटत आहे. विहिरींची पातळीही खालावत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून जेथे विहिरी अधिग्रहित केल्या आहेत, त्यांचीही जलपातळी खालावत आहे. यामुळे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांना आपापल्या तालुक्‍यात नवीन जलस्रोत शोधून ते त्वरित जिल्हा...
मे 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये जलसंधारणाच्या चळवळीला ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मोलाची साथ मिळाली आहे. आज ‘सकाळ माध्यम समुहा’च्या तनिष्का गटाच्या माध्यमातून वरखेडे, कळमडू, कुंझर, धामणगाव व रांजणगाव या पाच गावांमध्ये नाला खोलीकरण कामांचा प्रारंभ करण्यात आला. या कामांमुळे...
एप्रिल 29, 2019
जळगाव - गेल्या चार वर्षांपासून कमी- अधिक प्रमाणात सातत्याने पडणारा दुष्काळ, जलसंधारण अथवा पुनर्भरण योजनांचा अभाव, तुलनेने दिवसागणिक वाढत जाणारा पाण्याचा अतिउपसा यांमुळे जळगाव जिल्ह्यातील १५ पैकी ७ तालुक्‍यांचा पाण्याचा ‘अतिउपसा’ करणाऱ्या संवर्गात समावेश झाला आहे. कडक उन्हाळा व अतिपाण्याच्या...
एप्रिल 28, 2019
जळगाव - एकीकडे पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या जळगाव शहरात पाण्याचा अधिक वापर वाढला आहे. शहराची दररोज १०० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) एवढी पाणीपुरठ्याची मागणी आहे. परंतु गेल्या पंचवीस दिवसांपासून वाढलेले ऊन, तीन दिवसांआड पाणीपुरवठा झाल्याने सुमारे ५ एमएलडी पाण्याचा वापर वाढल्याची विश्‍वसनीय माहिती समोर...
एप्रिल 19, 2019
जळगाव  - जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ९७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर ४२ कामे...
एप्रिल 12, 2019
जळगाव  - शहरात पंधरा ते वीस दिवसांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. त्यात वाघूर धरणातील जलसाठा २० टक्‍क्‍यांवर आल्याने महापालिकेने पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसांआड केल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकरने पाणी विकत...
एप्रिल 09, 2019
पुणे - दुष्काळामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे राज्यावर जलजन्य आजारांचे संकट आले आहे. अतिसार, जुलाब, काविळ अशा आजारांचा उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर...
मार्च 22, 2019
मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दिव्यांग पती- पत्नीने अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या कार्याने प्रेरित होऊन आपल्या घराच्या अंगणात सिमेंट काँक्रीटचा रस्ता केवळ छिनी हातोड्याचा वापर करत तोडून शोषखड्डा तयार केला. पाणी फाउंडेशनच्या कामला हातभार लावताना आपणही कोणापेक्षा कमी...
मार्च 09, 2019
मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद    जळगाव ः मुक्ताईनगर परिसरात "ओडीए' योजनेंतर्गत 50 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, अशी तक्रार माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना केली. तोच...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पाणी योजनांसाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याचे बिल ग्रामपंचायतींकडून थकीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे महावितरणकडून योजनेचे कनेक्‍शन कापण्याचे काम केले जाते. दुष्काळी स्थिती असल्याने शासनाकडून बिल अदा केले जाणार आहे. मात्र वीज बिलासाठी...
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाईची बिकट स्थिती असताना पाणी पुरवठा विभागाकडे गत वर्षाचा शिल्लक असलेल्या दोन कोटी रुपये इतक्‍या निधी खर्च रोखून ठेवण्यात आला होता. हा निधी खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी हा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात...
फेब्रुवारी 01, 2019
नांदगाव - रस्त्याच्या कामामुळे माणिकपुंज धरणातून  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या वारंवार उतू लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नेतृत्वखाली आज सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  या...
जानेवारी 29, 2019
..दहा एमएलडी पाण्याची  उचल होईल कमी  जळगावः शहराला वाघूर धरणातून महापालिकेतर्फे दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. परंतु, यंदा दुष्काळाचे सावट, तसेच धरणातील साठा कमी असल्याने चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेस पत्र दिले होते. त्यानुसार फेब्रुवारीपासून तीन...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर तहान भागवणारे...
जानेवारी 08, 2019
जळगाव - डोंगराच्या पायथ्याला, निसर्गाच्या कुशीत वसलेली ती गावे.. गाव तरी कसे म्हणावे, जेमतेम पन्नासएक कुडा मातीची घरं असलेले ते वनवासी पाडेच. ‘जीवन’ ज्याचे दुसरे नाव पाणीही केवळ पावसापुरते उरले.. कधी- काळी डोंगरावरून खळखळत येणारे झरेही संपून गेले.. कळशीभर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू झाली......
जानेवारी 04, 2019
नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी काही वर्षांपासून दुष्काळाशी लढत आहेत. येथील देविदास रामहरी इंगळे यांनी या दुष्काळापुढे हार न जाता आपल्या २६ एकर शेतीचे यशस्वी नियोजन केले आहे. केळी, सीताफळ, जांभूळ ही फळपिके, जोडीला कलिंगड, भाजीपाला ही हंगामी पिके व आधार म्हणून ऊस अशी पीकपद्धतीची घडी...
डिसेंबर 09, 2018
उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  ...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...