एकूण 55 परिणाम
मे 31, 2019
जळगाव ः जळगाव शहर महानगरपालिकेतील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून या पदांची भरती करणे तसेच आकृतिबंध संदर्भात शासनाने अतिरिक्त माहिती मागवली आहे. लवकरात लवकर आकृती बंध मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून आता महापालिकेकडून शासनाने रिक्त पदे, मंजूर पदे आणि आवश्‍यक पदांची अतिरिक्त...
मे 28, 2019
जळगाव ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा जळगाव जिल्ह्याच्या निकालाची टक्‍केवारी वाढली असून, उत्तर महाराष्ट्र अर्थात नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल 86.61 टक्‍के लागून...
मे 13, 2019
जळगाव ः शहरातील अतिक्रमित बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे; परंतु महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम अतिक्रमित झाल्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कोणत्या आधारावर कारवाई केली, असा प्रश्‍न आता उपस्थित...
मे 04, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या स्वमालकीचा छापखाना सुरू करण्यासाठी गती देण्यात आली होती. यासाठीची छापखाना समिती सांगली, सातारा दौऱ्यावर जाऊन आली. परंतु, सध्या विषय बारगळला आहे. छापखाना सुरू करण्यासाठी 75 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून यंदाच्या अर्थसंकल्पात याकरिता केवळ पाच लाखाची तरतूद करण्यात आली आहे....
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज...
एप्रिल 12, 2019
जळगाव: शहरात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी शरिरासाठी घातक असलेल्या कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात. याकडे अन्न व औषध...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी सुटी आणि सप्तशृंगी यात्रोत्सवानिमित्त जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियोजन असून, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्ह्यात 23 एप्रिलला असल्याने दोन दिवसांसाठी विभागातील 435 बसची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जादा बसचे नियोजन यंदा...
मार्च 31, 2019
जळगाव ः महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार आजपर्यंत महापालिकेची 70 टक्के वसुली झाली असून, उद्या (31 मार्च) मालमत्ता कर भरणा करण्याची शेवटची मुदत असल्याने महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये कर भरण्यासाठी उघडी राहणार आहेत.  जळगाव शहरात महापालिका हद्दीत...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी...
मार्च 09, 2019
मुक्ताईनगर येथे "ओडीए'अंतर्गत  22 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद    जळगाव ः मुक्ताईनगर परिसरात "ओडीए' योजनेंतर्गत 50 गावांचा पाणीपुरवठा गेल्या 22 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, अशी तक्रार माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना केली. तोच...
मार्च 09, 2019
  जळगाव ः भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) कार्यालयांकडे "महावितरण'कडून देण्यात येणाऱ्या सेवेची गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी होती. यासंदर्भात वारंवार नोटीस देऊनही "बीएसएनएल' थकीत रकमेचा भरणा करत नव्हते. अखेर आज "महावितरण'च्या पथकाकडून "बीएसएनएल'च्या पाच विभागीय कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित करण्यात...
मार्च 07, 2019
विमान प्राधिकरण तयार करणार "फ्लाइंग झोन प्लॅन'  जळगावः जळगाव विमानतळाच्या धावपट्टीपासून 20 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातील "फ्लाइंग झोन'मध्ये कोणत्या टप्प्यात किती उंचीच्या इमारतींना परवानगी द्यावी, याबाबतचा आराखडा विमान प्राधिकरण तयार करून देणार आहे. इमारत बांधण्यासाठी विमान प्राधिकरणाचा नाहरकत...
मार्च 07, 2019
जळगाव  : दिव्यांग बांधवांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीटदरात सवलत दिली जात होती. मात्र आता शिवशाहीच्या आसन बसमध्ये दिव्यांग बांधवांना तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे आता दिव्यांगांनाही शिवशाहीतून शाही प्रवास करता येणार आहे.  राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसमधून दिव्यांगसह...
मार्च 05, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.  जिल्ह्यात रविवारी...
मार्च 01, 2019
औरंगाबाद : करचुकेगिरी केल्याच्या संशयावरुन सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्टच्या केंब्रिज स्कूल, सेंट लॉरेन्स मराठी व इंग्रजी शाळांसह जळगाव तसेच बंगळुरु येथील शाळेवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी(ता.28) कारवाई करत महत्वाचे दस्तवेज जप्त केले आहे. अधिकाऱ्यासह 45 कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत एकाच वेळी हि...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : राज्यात सर्वत्र बारावीचे पेपर सुरू आहेत. औरंगाबाद विभागातून सध्या सर्रास कॉपीचे एकामागून एक प्रकरण समोर येत आहेत. सोमवारी (ता. 25) भौतिकशास्त्रचा पेपर राज्यभर सुरु असताना औरंगाबाद जिल्ह्यातील बोकुड जळगाव (ता.पैठण) येथील अनुसयादेवी विद्यालयापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एका झेरॉक्‍स...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पाणी योजनांसाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याचे बिल ग्रामपंचायतींकडून थकीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे महावितरणकडून योजनेचे कनेक्‍शन कापण्याचे काम केले जाते. दुष्काळी स्थिती असल्याने शासनाकडून बिल अदा केले जाणार आहे. मात्र वीज बिलासाठी...
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाईची बिकट स्थिती असताना पाणी पुरवठा विभागाकडे गत वर्षाचा शिल्लक असलेल्या दोन कोटी रुपये इतक्‍या निधी खर्च रोखून ठेवण्यात आला होता. हा निधी खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे. टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी हा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात...
फेब्रुवारी 08, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील या दोघांना जनतेसमोर येऊन त्यांनी केलेल्या कामांचा खुलासा करण्याचे खुले आव्हान पुन्हा एकदा दिल्याने निवडणुकांचा धुरळा जास्तच गडद झाला आहे. मंत्री महाजन...
फेब्रुवारी 02, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची शनिवारी (ता. 2) घोषणा करण्यात आली. 2015 आणि 2016 सालच्या या पुरस्कारांमध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कारणाऱ्या विदर्भातील 16 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच राज्यस्तरीय पीक स्पर्धेच्या विजेत्यांची नावेही कृषी...