एकूण 13 परिणाम
March 17, 2021
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील कृष्णा नदीवर नवीन पूल उभारणीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे 45 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेला हा पुलाचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. नव्या पुलाच्या निर्मितीनंतर गावच्या सौंदर्यात भर पडून...
March 16, 2021
दुधोंडी : सध्या विविध क्षेत्रात बांबूचा वापर जागतिक स्तरावर वाढत आहे. पर्यावरण संरक्षण जागतिक तापमान वाढीसह स्वच्छ वातावरण इथून पुढे राखायचे असल्यास शेतकऱ्यांनी इतर पिकाबरोबर बांबू लागवड करून स्वतःच्या विकासाबरोबर पर्यावरणाचेही रक्षण करावे, असे आवाहन निवृत्त वनाधिकारी अजित भोसले यांनी केले.  ते...
March 09, 2021
सांगली ः गवा हा माणसासारखाच... त्याला समूहाने रहायला आवडते. तो सुरक्षितता शोधत असतो. माणसासारखाच त्यांच्यातही संघर्ष असतो, त्यातून कळप फुटतो आणि मग फुटलेल्या कळपापासून एखादा गवा भरकटतो... कधी कधी तो शहरात घुसतो... तो जितक्‍या वेगाने माणसांच्या वस्तीत येतो तितकाच वेगाने बाहेर पडून नवा अधिवास शोधतो....
March 08, 2021
सांगली : हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गव्हर्मेंट कॉलनीनजीकच्या गजराज कॉलनीत आज रात्री महाकाय गवा दिसला आणि नागरिकांची तारांबळ उडाली. काही वेळातच तेथील रस्त्यावरची वर्दळ गायब झाली. त्यानंतर बराचवेळ गवा एकटाच त्या रस्त्यावर वावरत होता. बावरलेल्या गव्याला नेमके कोणत्या दिशेला जायचे, हे उमगत...
March 03, 2021
सांगली : सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांची अधिकृत संख्या 43 असल्याचे वन्यजीव संशोधन संस्था (डेहराडून) यांनी जाहीर केले आहे. त्यात 17 नर, तर 26 मादी आहेत. जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून आलेली ही माहिती आहे. सह्याद्री...
January 31, 2021
नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्ग बिबट्यासाठी कर्दनकाळ बनला आहे. वाळवा तालुक्‍यातच मागील सात महिन्यांत महामार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेने केदारवाडी व इटकरे येथे दोन बिबट्यांचा बळी घेतला. याबाबत वन विभागाची भूमिका उदासीन आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होते. एकीकडे...
January 27, 2021
सांगली :  "आली अंगावर, घेतली शिंगावर"असंच काहीसं सांगलीच्या साटपेवाडीत एका अजस्त्र मगरी बाबत घडले आहे.गावात कृष्णाकाठी मगरी आली आणि ग्रामस्थांनी तिला जेरबंद करत थेट खांद्यावरून उचलून नेऊन वन विभागाकडे सुपूर्द केल्याचा प्रकार घडला आहे,मगरीमुळे गावात अनुचित प्रकार घडू नये ,यासाठी ग्रामस्थांनी हे धाडस...
January 25, 2021
अंकलखोप (सांगली) : अंकलखोप (ता. पलूस) परिसरात रविवारी रात्री गव्याचा कळप दिसल्याने खळबळ उडाली. हलगी परिसरातील वैभवनगर ते रामरावनगर या परिसरातील सुमारे दोन किमी रस्त्यावर तीन गवे दिसल्यानंतर काही ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच अनिल विभुते व सहकाऱ्यांनी गव्याचा पाठलाग...
December 12, 2020
सांगली : पुण्यात गवा घुसला आणि पुणेकरांच्या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धावता-धावता तो मेला. त्याला पकडण्यात अपयश आले, कारण तशी यंत्रणाच पुण्यातील वन विभागाकडे नव्हती. आता पुणेकरांनी शहाणपण घेतले आहे आणि असे वन्यप्राणी शहरात घुसले, तर त्यांना पकडण्यासाठी तज्ज्ञांचे पथक तयार करण्याचे ठरले आहे. असे...
December 04, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण करण्यास सुरवात केली आहे. निमित्त माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच होतं. त्यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. मदनभाऊ गटाचेही नेतृत्व स्वत:कडे घेण्याचे त्यांचे प्रयत्न...
November 03, 2020
अंकलखोप (जि. सांगली)-  भिलवडी (ता. पलूस) अंकलखोप दरम्यानच्या पुलाजवळ आज (ता. 2) शांत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या डोहात मगरीचा विहार अनेकांनी अनुभवला. दररोज मासेमारी साठी पुलावर, पुलाखाली हौशी व व्यावसायिक मच्छीमार वावरत असतात. त्याना मगरीचे नित्य दर्शन होते. औदुंबर ते भिलवडी, अंकलखोप दरम्यान नदीत...
October 31, 2020
मिरज : दहा दिवसांपासून येथील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुंब भरला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले. एवढे विदारक चित्र असूनही शहराचे कारभारी मात्र आपापल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ सुरू असूनही कारभाऱ्यांचे वर्तन...
October 15, 2020
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख धरणातून पाणी साेडण्यात आले आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रात्रीपासून काही भागांतील...