एकूण 8 परिणाम
January 28, 2021
सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, महापालिकेत तिन्ही पक्षांचे सूत अद्याप जुळलेले दिसत नाही. परिवहन सभापती निवड, विषय समित्या निवडीतील मतभेदानंतर आता दलित वस्ती सुधार योजना आणि नगरोत्थान योजनेतील विकासकामांची यादी तयार...
January 06, 2021
सोलापूर : शहरातील राजकारणात "एमआयएम'च्या माध्यमातून फारूक शाब्दी यांनी प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शाब्दी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळविली. पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे नाराज झालेले तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट...
January 02, 2021
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांपैकी भाजपने चार समित्या मिळविल्या. संख्याबळ पुरेसे असतानाही महाविकास आघाडीला विषय समित्या निवडीत अपयश आल्याचा ठपका आता शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांवर ठेवला जात आहे. मात्र, बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर पक्षाकडून (गटनेत्यांकडून) काहीच कारवाई झालेली नाही. महेश...
December 22, 2020
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांवर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याचा संकल्प करीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीने वंचित बहूजन आघाडी आणि एमआयएमला सोबत घेतले. त्याचवेळी शिवसेनेतील नाराज असलेल्या दोन सदस्यांच्या समित्या एमआयएमला देण्यात आल्या. सभापती निवडीत 'एमआयएम'च्या...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
November 03, 2020
सोलापूर : कॉंग्रेसमध्ये राहून तुमचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता आपण शिवसेनेत जाऊ म्हणून नगरसेवक चेतन नरोटे यांनीच सर्वप्रथम सेनाप्रवेशाचा पर्याय काढला. याबाबत त्यांनी वडील विष्णूपंत कोठे व पुतण्या देवेंद्र कोठे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते शिवसेनेत जाण्याचा...
October 20, 2020
सोलापूर : कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांची कोरोना टेस्ट करून सभा घेण्याची मागणी केली. मात्र, महापौरांनी पोलिस बळाचा वापर करून त्यांच्या दालनात सभा उरकून 37 कोटी रुपयांचे विषय मंजूर करून घेतल्याचा आरोप या गटनेत्यांनी केला आहे.  कोरोनाच्या...
October 08, 2020
सोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा...