एकूण 21 परिणाम
January 16, 2021
मुंबई,ता. 16 : मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू हा 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एच 5 एन 1 ने बाधित स्थलांतरीत पक्षांच्या संपर्कात आल्याने कावळ्यांना संसर्ग झाला असल्याची शक्यता पशु संवर्धन...
January 15, 2021
मुंबई, 15: मुंबईसह राज्यात कुठेही बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने मृत पक्षी  आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करा असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार...
January 04, 2021
मुंबई  : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण 26 टक्‍क्‍यांनी कमी झाले; मात्र अपघाती मृत्यूची संख्या कमी होऊ शकली नाही. लॉकडाऊनच्या नऊ महिन्यांत रस्त्यावर वाहनांची विशेष वर्दळ नव्हती; मात्र या कालावधीत रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 10 हजारांच्या आसपास आहे. गेल्या पाच...
December 28, 2020
सोलापूर : राज्यात दरवर्षी सरासरी तीन हजार शेतकरी आत्महत्या होतात. मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दोन हजार 532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर यंदा त्याचे प्रमाण घटले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात राज्यात दोन हजार 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा कोकणात एकही आत्महत्या...
December 27, 2020
नाशिक : औरंगाबादस्थित सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र अर्थात एसपीआय या संस्थेने २०२१ पासून आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. त्यानुसार प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा आता राज्‍यात चारऐवजी आठ केंद्रांवर घेतली जाणार आहे. यात नाशिकचाही समावेश असून, यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर...
December 22, 2020
मुंबई: मुंबई, ठाण्यातील किमान तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज मुंबई प्रदेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  मुंबईतील आणि उपनगरातील किमान तापमानात 18 अंश सेल्सियस इतकी नोंद झाली आहे.  पुढील दोन दिवस हे वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात एकेरी आकड्यावर...
December 21, 2020
मुंबई: आज सकाळपासून मुंबईत निरभ्र आकाश दिसत आहे. निळ्याशार रंगांची चादर ओढून घेतल्याचे मनमोहक दृश्य अनुभवास मिळत आहे. हे विहंगम दृश्य पुढील 48 तासांसाठी कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई आणि उपनगरातील किमान तापमानात किंचित घट झाली आहे. 18 अंश सेल्सियस...
December 17, 2020
यवतमाळ : राज्यभरात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी सर्व बाबींची पडताळणी करून राज्यातील तब्बल ४९५ सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंती बदलीवर फुली मारली आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. विहित...
December 12, 2020
मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते नागपूर दरम्यान उत्सवासाठी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 02047 ही विशेष ट्रेन वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या...
December 06, 2020
सोलापूर : राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु झाले असून, दीड लाख शिक्षकांमध्ये दोन हजार 212 शिक्षक, तर 56 हजार 34 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये 682 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आणखी 76 हजार शिक्षकांची आणि 36 हजार कर्मचाऱ्यांची टेस्ट झालेली नाही. कोरोनामुळे जळगाव, ठाणे...
December 02, 2020
मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. याबाबत...
November 24, 2020
सोलापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. शाळेत विद्यार्थी पाठवण्यापूर्वी संबंधित पालकांची संमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतिपोटी राज्यातील...
November 16, 2020
भडगाव (जळगाव) : राज्याच्या जलसंपदा विभागाने राज्यातील नद्याजोडचा अभ्यास करण्यासाठी आठ सदस्यीय अभ्यासगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.  उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृद्ध झाल्यास जलक्रांती, हरितक्रांती व औद्योगिक क्रांती घडून येईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या तज्ज्ञ टीमने नदीजोड...
November 14, 2020
चोपडा (जळगाव) : निसर्गाशी असलेली कटीबद्धता निश्चित करण्यासाठी, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवणे यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग म्हणून ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील 667 स्थानिक...
November 07, 2020
नाशिक : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नाशिक हे परीक्षा केंद्र असले तरी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी मात्र नाशिक येथे केंद्र नाही. त्यामुळे अभियांत्रिकी परीक्षेसाठी नाशिक केंद्रासाठी काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या...
October 20, 2020
नाशिक रोड / भुसावळ : आगामी सण, उत्सवादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उत्सव विशेष आरक्षित गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  सणासुदीसाठी नऊ उत्सव विशेष एक्स्प्रेस  यात लोकमान्य तिलक टर्मिनस- गोरखपूर सुपर फास्ट विशेष गाडी (डाउन क्रमांक - ०२१६५) २२ ऑक्टोबर पासून ते...
October 01, 2020
सोलापूर : राज्यात साडेबारा हजारांपर्यंत खासगी सावकार असून त्यांच्याकडून दरवर्षी तीन ते पाच हजार कोटींपर्यंत कर्जवाटप केले जाते. खासगी सावकारकी अधिनियमानुसार कर्जवाटप केल्याचे रेकॉर्ड सावकारांनी कागदोपत्री ठेवले. मात्र, काहींनी बळीराजाच्या जमिनी खरेदी करुन घेतल्या असून व्याजदारावर नियंत्रण नसल्याने...
September 24, 2020
नाशिक : रेल्वे प्रशासनाने मालवाहतुकीसाठी सुरू केलेल्या विशेष पार्सल गाड्यांची सेवा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  शालिमार पार्सल विशेष गाडी (००११३ डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ३१ डिसेंबरपर्यंत रोज रात्री साडेबाराला सुटून तिसऱ्‍या दिवशी साडेअकराला शालिमार येथे पोचेल.  हे आहेत...
September 19, 2020
मुंबई : कोरोना संकटात सध्या शाळाही ऑनलाईन झाल्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन त्रास देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशा 30 तक्रारी सायबर विभागाला प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय मुले ऑनलाईन असताना त्यांची ऑनलाईन फसणूक आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीची भीतीही निर्माण झाली आहे. सायबर विभागाने त्यासाठी ‘ऑपरेशन...
September 17, 2020
मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला सुरुवातीपासून अल्प प्रतिसाद मिळत होता. पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या 1 लाख 926 विद्यार्थ्यांपैकी फक्त निम्म्याच 64 हजार 855 विद्यार्थ्यांनीच शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश घेतला. गतवर्षीच्या तुलनेत...