एकूण 112 परिणाम
जुलै 20, 2019
जिल्हा बँकांना हवे सहा हजार कोटी; विकास सोसायट्या अडचणीत  सोलापूर - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या नियोजनानुसार यावर्षी खरीप व रब्बी हंगामात राज्यातील ४३ लाख शेतकऱ्यांना ७४ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना दिले आहे. जुलैमध्ये खरीप पिकांच्या लागवडीसाठी कर्जाची सर्वाधिक मागणी होते. परंतु,...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली :  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पाईपद्वारे गॅस मिळणार आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस...
जुलै 17, 2019
सोलापूर - राज्यात यंदा प्रथमच चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराने शिरकाव केला असून, त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.  दुसरीकडे स्वाइन फ्लूमुळे १९६ आणि डेंगीमुळे तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आता प्राण्यांचे आजार नागरिकांना होत असल्याने...
जुलै 17, 2019
पाच जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस; केवळ नऊ जिल्ह्यांत ओलांडली सरासरी पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा, मॉन्सूनचे उशिराने झालेले आगमन यामुळे राज्यात यंदा पावसाने सरासरी गाठलेली नाही. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र मध्य महाराष्ट्राचा...
जुलै 15, 2019
नाशिक - बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जाताना युवा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) प्रशिक्षण घेण्यास पसंती देत आहेत. कौशल्याधीष्टित शिक्षणातून रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध होत असल्याने तरुणाईकडून या पर्यायास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्यभरातील आयटीआयमध्ये शिक्षकांची रिक्‍...
जुलै 12, 2019
नाशिक - पश्‍चिम पट्ट्यात पावसाची मुसळधार सुरू असली तरी जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत अजून ३० टक्केही पाऊस झालेला नाही. एका बाजूला मुसळधारेने पश्‍चिम तालुक्‍यात दरड कोसळत असताना इतरत्र मात्र खरिपाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. या परस्पर विसंगत स्थितीचे दर्शन घडते आहे. जिल्ह्यात पावसाच्या पश्‍चिम...
जुलै 12, 2019
नाशिक - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर फुटीच्या विविध कारणांचा शोध बाहेर येत आहे. काही कारणे तांत्रिक असली तरी खेकड्यांमुळे धरण फुटल्याच्या कारणाने राज्यभर खेकड्यांना महत्त्व प्राप्त झाले. हा विषय गमतीने घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील मातीच्या धरणांचा पाटबंधारे विभागाकडून...
जुलै 11, 2019
नाशिक - शहराला सध्या कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातही जे पाणी नळांना येते त्यालाही उग्र वास येत असल्याने पाण्यात क्‍लोरिन अधिक वापरले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी शुद्धीकरणासाठी अधिक क्‍लोरिनचा वापर होत असला, तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहराला...
जुलै 11, 2019
पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, अमरावतीचा समावेश सोलापूर - राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, मात्र, याच मार्गांवरील खड्डे अन्‌ वाहनांचा वाढलेला वेग, बेशिस्त वाहतूक आणि शासकीय यंत्रणांचा काणाडोळा आदी कारणांमुळे पुणे, नागपूर, नाशिक, धुळे, पालघर,...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
जुलै 10, 2019
नाशिक - स्थायी समितीसह विषय समिती सदस्यांची नियुक्ती करताना पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी भागाला अधिक झुकते माप दिल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे. स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करताना व त्यातही सभापतिपदाचे दावेदारही पंचवटीचेच असल्याने संतापात अधिक भर पडली आहे. कमलेश बोडके, गणेश गिते व...
जुलै 09, 2019
नाशिक - नाशिकच्या  निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करत असून, त्यामुळे ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी आले आहे. पर्यटनाच्या नकाशावरही नाशिक चमकू लागल्याचे गौरवोद्‌गार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काढले. सर्वाधिक...
जुलै 09, 2019
नाशिक - गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार झाल्याने धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्याचा आधार घेत सोमवारी (ता. ८) विरोधी पक्षांनी महापौर रंजना भानसी यांच्याकडे पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. किमान आठ दिवसांतून एकदा करण्यात आलेले शटडाउन तरी खोलावे, या मागणीवर विरोधक...
जुलै 08, 2019
नाशिक - शहराचा विस्तार वाढत असताना मलजलाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सद्यःस्थितीत चार मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित असली तरी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अद्याप दोन केंद्रे प्रलंबित आहेत. सद्यःस्थितीत ३४२ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया केली जाते. गंगापूर व पिंपळगाव खांब येथील केंद्रे कार्यान्वित...
जुलै 05, 2019
नाशिक - भविष्यातील पाण्याची चिंता डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने रविवार (ता. ३०) पासून एकवेळ पाणीकपात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नाशिककरांचे हाल झाले. एकीकडे पाऊस पडत असताना नळांच्या तोट्या मात्र कोरड्या राहिल्याने राखून ठेवलेल्या पाण्यावरच...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा...
जुलै 04, 2019
नाशिक - गंगापूर धरणातील अत्यल्प साठा व पावसाने अद्याप धरण परिसरात दमदार हजेरी न लावल्याने रविवार(ता. ३०)पासून सुरू झालेल्या पाणीकपातीच्या दुसऱ्या टप्प्यात दर गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्याची अंमलजावणी ४ जुलैपासून होणार आहे. त्यामुळे पावसाचे वातावरण असले तरी शहरवासीयांना...
जुलै 03, 2019
नाशिक - गेले दोन दिवस शहर व परिसरात मुसळधार झाली असली, तरी गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा न झाल्याने अखेरीस पाणीकपातीबरोबरच आता महापालिका प्रशासनाने आठ दिवसांतून एकदा दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे रोजचे ५० ते ६० दशलक्ष लिटर व आठ दिवसांतून एकदा ४६० दशलक्ष...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जुलै 02, 2019
पुणे - उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह मुंबई उपनगराला सोमवारी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३६५ मिलिमीटर पाऊस पडला, तर सहा ठिकाणी ३०० पेक्षा अधिक पाऊस झाल्याचे कृषी...