एकूण 19 परिणाम
January 13, 2021
पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील एकूण 94 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित 71 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. तालुक्‍यातील जवळपास 75 टक्के ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने संपूर्ण तालुक्‍यात...
January 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात दिले. यामुळे तालुक्‍...
January 04, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या नेत्यांसह मंगळवेढ्यातील नेते सोशल मीडियात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत जणू पोटनिवडणुकीची रंगीत तालीमच सुरू झाली आहे. ...
December 04, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्‍यातील मोठ्या राजकीय भूकंपाची शक्‍यता आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीवर 15 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर...
November 28, 2020
पंढरपूर(सोलापूर) ;  आमदार भारत भालकेंच्या अकाली जाण्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्यांच दुःख आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं मतदारसंघातील कार्य पूर्ण करण्याचं मी शब्द देतो, अशी भावना व्यक्त करतानाच ही...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) ः सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेतेमंडळींच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 28, 2020
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्रीक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.  गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून...
November 20, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पुणे विभागीाय शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर आणि पदवीधरमधून अरुण लाड यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्याचा निर्धार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीने केला आहे. अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असे...
November 07, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच धास्ती घेतली. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या परिचारक कुटुंबीयांनी सुधाकरपंत परिचारक या ज्येष्ठ नेत्याला गमावला. आता या विळख्यातून बाहेर पडत तालुक्‍यातील...
October 27, 2020
पंढरपूर (सोलापूर) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयासाठी अखेर नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, जागेच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी एकाच जागेचे दोन वेळा भूमिपूजन केल्याने राजकीय...
October 19, 2020
पंढरपूर (जि. सोलापूर): मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लर आहेत. सरकार चालवयाला दम लागतो तो त्यांच्यात नाही असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज लगावला.  अतिवृष्टी आणि महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज सोलापूर जिल्ह्यातील...
October 19, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 17) पंढरपुरात येवून नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर रविवारी (ता. 18) जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत...
October 17, 2020
पंढरपूर ः कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा राज्यावर पुराचे आणि अतिवृष्ठीचे अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्ज काढून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे सांगत अतिवृष्ठी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर...
October 08, 2020
पंढरपूर (सोलापूर) : लॉकडाउननंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल खरेदी- विक्रीला गती आली आहे. मंदावलेल्या बाजारात तब्बल सहा महिन्यांनंतर डाळिंब, बेदाणा, केळी, पपई यांसारख्या फळांचे दर वाढू लागले आहेत. बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगवा जातीच्या डाळिंबाला प्रतिकिलो 101...
October 04, 2020
पंढरपूर(सोलापूर) ः जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपूरमध्ये जरुर उभा करावा. परंतू, त्याआधी पंढरपूर तालुक्‍याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपुरातील सरगम चौकात उभारण्यात यावा, अशी मागणी कर्मवीर...
September 30, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जडणघडणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. शरद पवारांच्या आयुष्यातले पहिले पालकमंत्रीपद त्यांना सोलापूर जिल्ह्याचे मिळाले होते. तेव्हापासून सुरु झालेला सोलापूर जिल्हा आणि शरद पवार हा ऋणानुबंध वारंवार जिल्ह्याने अनुभवला...
September 29, 2020
पंढरपूर (सोलापूर) : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयी सुधाकरपंतांच्या समवेत आपली अनेक वेळा चर्चा व्हायची. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता. सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या पश्‍चात मोठी जबाबदारी...
September 25, 2020
पंढरपूर (सोलापूर) : आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात आणि तालुक्‍यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज आणि संत गजानन महाराज मठ यांशिवाय अलीकडेच भीमा नदीच्या पैलतीरावर उभारलेले इस्कॉनचे राधा पंढरीनाथ मंदिर आणि...