एकूण 12 परिणाम
January 13, 2021
पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील एकूण 94 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित 71 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. तालुक्‍यातील जवळपास 75 टक्के ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने संपूर्ण तालुक्‍यात...
January 12, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतींच्या 186 जागांसाठी 464 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असले तरी आगामी पोटनिवडणूक व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता, तीन साखर कारखान्यांच्या अध्यक्षांसाठी ही निवडणूक रंगीत तालीम ठरणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष निवडणुकांचे असले तरी गुलाल...
January 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात दिले. यामुळे तालुक्‍...
January 04, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या नेत्यांसह मंगळवेढ्यातील नेते सोशल मीडियात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत जणू पोटनिवडणुकीची रंगीत तालीमच सुरू झाली आहे. ...
December 10, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून संचालक भगीरथ भालके यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असताना, विरोधी गटाच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.  तालुक्‍याचे नेतृत्व करणाऱ्या पूर्वीच्या...
November 28, 2020
पंढरपूर(सोलापूर) ;  आमदार भारत भालकेंच्या अकाली जाण्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्यांच दुःख आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं मतदारसंघातील कार्य पूर्ण करण्याचं मी शब्द देतो, अशी भावना व्यक्त करतानाच ही...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) ः सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेतेमंडळींच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 28, 2020
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्रीक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.  गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून...
October 27, 2020
पंढरपूर (सोलापूर) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नियोजित पुतळयासाठी अखेर नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, जागेच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी एकाच जागेचे दोन वेळा भूमिपूजन केल्याने राजकीय...
October 04, 2020
पंढरपूर(सोलापूर) ः जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपूरमध्ये जरुर उभा करावा. परंतू, त्याआधी पंढरपूर तालुक्‍याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपुरातील सरगम चौकात उभारण्यात यावा, अशी मागणी कर्मवीर...
September 29, 2020
पंढरपूर (सोलापूर) : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयी सुधाकरपंतांच्या समवेत आपली अनेक वेळा चर्चा व्हायची. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता. सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या पश्‍चात मोठी जबाबदारी...