एकूण 14 परिणाम
January 12, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतींच्या 186 जागांसाठी 464 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असले तरी आगामी पोटनिवडणूक व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता, तीन साखर कारखान्यांच्या अध्यक्षांसाठी ही निवडणूक रंगीत तालीम ठरणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष निवडणुकांचे असले तरी गुलाल...
January 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात दिले. यामुळे तालुक्‍...
December 30, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तीन महिन्यात होणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार असून, त्यासंदर्भात कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच कारखान्याच्या निवडणुकीची हालचालही सुरू झाली आहे. सहकारातील संस्था कशा...
November 28, 2020
पंढरपूर(सोलापूर) ;  आमदार भारत भालकेंच्या अकाली जाण्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्यांच दुःख आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं मतदारसंघातील कार्य पूर्ण करण्याचं मी शब्द देतो, अशी भावना व्यक्त करतानाच ही...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) ः सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेतेमंडळींच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 28, 2020
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्रीक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.  गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून...
November 20, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पुणे विभागीाय शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर आणि पदवीधरमधून अरुण लाड यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्याचा निर्धार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीने केला आहे. अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असे...
October 26, 2020
श्रीपूर (सोलापूर) : ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील श्री पांडुरंग कारखान्याची ऊस लिफ्टिंग क्रेन कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही; मात्र हंगामाच्या प्रारंभालाच क्रेन कोसळल्याने कारखान्यातील कामाच्या गुणवत्तेवर व सुरक्षिततेवर आता प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.  गेल्या बुधवारी (ता. 14...
October 19, 2020
पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. 17) पंढरपुरात येवून नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर रविवारी (ता. 18) जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत...
October 04, 2020
पंढरपूर(सोलापूर) ः जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपूरमध्ये जरुर उभा करावा. परंतू, त्याआधी पंढरपूर तालुक्‍याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे जनक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचा पुर्णाकृती पुतळा पंढरपुरातील सरगम चौकात उभारण्यात यावा, अशी मागणी कर्मवीर...
September 29, 2020
पंढरपूर (सोलापूर) : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयी सुधाकरपंतांच्या समवेत आपली अनेक वेळा चर्चा व्हायची. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता. सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या पश्‍चात मोठी जबाबदारी...
September 24, 2020
श्रीपूर (सोलापूर) : येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत परिचारक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  कारखान्याचे संस्थापक - अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर आमदार प्रशांत परिचारक यांची आज (...
September 24, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयात मिळत नसलेले बेड लक्षात घेऊन, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी साखर कारखान्यावर 50 बेडचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय कर्मचारी भरतीबाबत प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.  गेल्या...