एकूण 364 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर चित्रकला छान आहे. आवडते आहे. चित्रकलेच्या शालेय जीवनात देण्याच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षाही दिल्या आहेत. अभ्यास आवडतो, पण मार्क फार छान नसतात. अशा सर्वांसाठी पूर्वीची मळलेली वाट होती ती कमर्शियल आर्टिस्टच्या डिप्लोमा किंवा पदवीची. मात्र त्यात...
ऑक्टोबर 19, 2019
चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’  श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष...
ऑक्टोबर 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘लर्निंग होम’ ही शिक्षणाची प्रयोगशाळा असेल. ‘घरानंही शिकवावं, शाळेनं घर व्हावं’ या तत्त्वावर चालणाऱ्या या ‘आनंदघरा’त शिक्षक व पालक दोघांचाही स्वयंस्फूर्त सहभाग असेल.  ‘लर्निंग होम’ची संपूर्ण रचना बालकेंद्री असेल. मुलांना आनंद वाटेल, येथे यावेसे वाटेल...
ऑक्टोबर 19, 2019
वीकएंड हॉटेल - नेहा मुळे श्रावण, गौरी-गणपतीसोबतच आता नवरात्रही संपले आहेत. अनेकांनी या दिवसांमध्ये असलेल्या श्रद्धेमुळे नॉन-व्हेज खाण्यावर नियंत्रण ठेवलेले असते. दिवाळीलाही अजून काही दिवस बाकी आहेत. गोड फराळ करायच्या आधी आपण थोडासा नॉन-व्हेजवर नक्कीच ताव मारू शकतो. आज अगदी हार्डकोर नॉन-व्हेजबद्दल...
ऑक्टोबर 19, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही खूपच प्रेम असेल तेव्हा कोणत्याही गैरसमजाची पूर्ण जबाबदारी घेता. कदाचित तुम्ही क्षणभर वरवरची नाराजी व्यक्त कराल. पण तुम्हाला हृदयातून तसे वाटत नसते तेव्हा तुमच्यात पूर्ण समज आलेली असते. तुम्ही अशा स्थितीला याल जिथे तुमचे सगळे प्रश्‍न...
ऑक्टोबर 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ पित्ताशयातील खडे म्हणजे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका (ती यकृत पित्ताशय, आतड्याला...
ऑक्टोबर 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग काही कर्मे बदलता येतात आणि काही नाही. तुम्ही गोडधोड पदार्थ बनविताना साखर किंवा तूप कमी पडल्यास पुन्हा घालू शकता. दुसरा काही घटक पदार्थही कमी-जास्त करून सुधारता येतो. मात्र एकदा पदार्थ शिजवला, की तो परत पूर्वस्थितीत आणता येत नाही. दुधापासून...
ऑक्टोबर 18, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ आपण कालच्या लेखात लहान मुलांमधील यकृताच्या आजाराची माहिती घेतली. यातील आणखी घटक, कारणे आणि लहान मुलांमधील यकृतांचे आजार कसे टाळता येतील, हे पाहूयात. लहान मुलांमध्ये हिपॅटायटिस ए, ई आणि बी यांबरोबरच व्हायरल हेपॅटायटिसही आढळतो. त्यामुळेच अन्नपाण्याची...
ऑक्टोबर 18, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर एखादा विद्यार्थी जेव्हा कॉमर्सला प्रवेश घेतो तेव्हा त्याला सहजपणे प्रश्‍न विचारला जातो, ‘काय मग सीए करणार का सीएस?’ त्यातही मार्क ऐंशी टक्‍क्‍यांच्या पुढे असतील, तर त्याचे पालकच काय पण विद्यार्थी स्वतःसुद्धा या रस्त्याकडे स्वाभाविकपणे खेचला जातो....
ऑक्टोबर 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक शिक्षणातील नवविचारांवर आधारित अशा अनेक प्रयोगशील शाळा खुद्द शास्त्रज्ञांनीच जगभरात उभ्या केल्या आहेत. आपल्याकडची अशीच एक शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे ग्राममंगलचं ‘लर्निंग होम.’ या ‘आनंदघर’नुसार आता शिक्षणात घर व पालकांची भूमिका अशी आहे -  घर-कुटुंब-...
ऑक्टोबर 17, 2019
 स्लिम फिट - वाणी कपूर, अभिनेत्री `बेफिक्रे’ या चित्रपटामुळे मला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली, मात्र त्या आधीपासून मी मॉडेलिंग करीत होते. या क्षेत्रात येण्यापूर्वी माझे वजन ७५ किलो होते. वजन कमी करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. पंजाबी असल्याने मी खूप फुडी आहे. माझा डाएटवर विश्‍वास नाही. मला जे...
ऑक्टोबर 17, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ लहान मुलांमधील यकृताचे आजार बऱ्याच वेळेस दुर्लक्षित राहतात. भारतात हे प्रमाण पुष्कळ आहे. बरेचदा या आजारांबद्दल असलेली उपेक्षा, योग्य उपचारपद्धतींचा अभाव किंवा आर्थिक दडपणामुळे या मुलांना योग्य उपचारांपासून वंचित राहावे लागते. काही प्रसंगी मृत्यूला...
ऑक्टोबर 17, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक अपेक्षा व वास्तवाच्या लपंडावाबद्दल आपण सध्या माहिती घेत आहोत. इयत्ता नववीला सुरवात केली असली, तरी थेट पदव्युत्तरपर्यंतचा हा लपंडाव कोणाचीही पाठ सोडत नसतो, त्याचा विचार संपेपर्यंत आपण सर्वच क्षेत्रांतील करिअर्सबद्दलचा लपंडाव पाहणार आहोत हे नक्की. ...
ऑक्टोबर 17, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलंड गेल्या काही लेखांमधून आपण विविध देशांतील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षणपद्धतीविषयी माहिती घेतली. आत्तापर्यंत सर्वप्रथम फिनलंड, नंतर जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, एस्टोनिया, युएसए या देशातील शिक्षणपद्धतींचा एक एक करून आढावा घेतला. आता...
ऑक्टोबर 17, 2019
माझे मत - निर्मला महाजन, पुणे  आपण लहान मुलांच्या आहाराकडे पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते की, आया या बाबतीत खूपच जागरूक झाल्या आहेत. मात्र, जेवणाच्या बाबतीत कधीकधी कच खातात. मुलांच्या हट्टापुढे नमतात. मुले जेव्हा पोळी, भाकरी खाऊ लागतात तेव्हाच त्यांना आपण सर्व प्रकारच्या भाज्या, ऊसळी वगैरे देऊ शकतो...
ऑक्टोबर 17, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग संवेदनशील व्यक्ती स्वतःला कमकुवत समजतात. स्वतःला सामर्थ्यवान समजतात, ते नेहमी संवेदनाहीन असतात. काही लोक स्वतःबाबत संवेदनशील असतात, मात्र इतरांबाबत भावनारहित असतात. त्यांना कायम वाटते, की बाकी सर्व लोक वाईट आहेत. स्वतःबद्दल संवेदनशीलता न...
ऑक्टोबर 16, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ कित्येक वेळा यकृताचा आजार असताना गर्भधारणा होते. उदाहरणार्थ, ‘हेपॅटायटिस बी’ आणि ‘सी’ची लागण झालेल्या महिलेस गर्भारधारणा होते किंवा पूर्वीचा क्रोनिक लिव्हरचा आजार असताना गर्भधारणा होते. (उदा. ऑटोइम्मलिन लिव्हर डिसीज) अशा वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि...
ऑक्टोबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘ओझ्याविना शिक्षण’ या गाजलेल्या अहवालात प्रा. यशपाल म्हणतात, ‘शाळेतून मुलांच्या गळतीचं मुख्य कारण म्हणजे शालेय अभ्यासाचा निरर्थकपणा. कुतूहल, चौकस वृत्ती हा जसा जगातल्या सगळ्या मुलांचा नैसर्गिक गुण असतो, तसा शाळेत जाणं हा नसतो! किंबहुना शाळांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
माझे मत - मेघना कुलकर्णी-रानडे पूर्वीच्या मानानं आजकालच्या गोष्टी, नाती सगळं कसं अवघड होऊन बसलंय. कोण, कधी, काय, विचार करेल आणि काय निर्णय घेऊन मोकळं होईल, याचा काही नेमच राहिला नाही. आपल्या आईवडिलांच्या वेळी सगळे कसं चौकटीबद्ध आयुष्य जगत होते. योग्य ते शिक्षण घेतलं की, त्याच क्षेत्रात नोकरी करायची...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...