एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
नागपूर - पश्‍चिम विदर्भाने कडकडीत बंद ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. तर पूर्व विदर्भातील विविध संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही तुरळक घटना वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या वतीने आज, गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक...
ऑगस्ट 10, 2018
कोल्हापूर - राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन कोल्हापूरची वाटचाल सुरू आहे. राज्यासमोर आदर्श ठेवताना सनदशीर मार्गाने सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला बंद यशस्वी केला. शाहूंच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली. दसरा चौकातील मुख्य आंदोलनास सर्व...
ऑगस्ट 09, 2018
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आरक्षणासाठी उद्या (ता. 9) क्रांतीदिनी महाराष्ट्र "बंद'ची एसटीला धास्ती लागली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत. आंदोलनाची सर्वाधिक झळ एसटीला बसल्यामुळे "बंद'च्या दिवशी सेवा सुरू ठेवायची की बंद या संभ्रमावस्थेत व्यवस्थापन...
ऑगस्ट 09, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह पिंपरी-चिंचवडसाठी गुरुवारी (ता. ९) सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले...
ऑगस्ट 08, 2018
खामगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात आंदोलन अधिक आक्रमक झाले असून आज 8 ऑगस्ट ला खामगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी एक हजारांवर समाज बांधवांनी मुंडन करुन शासनाचे वेधले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलनादरम्यान...
ऑगस्ट 08, 2018
धुळे - नंदुरबार मतदारसंघातील भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी त्यांच्यावरील हल्लाप्रकरणी येथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर केलेले आरोप व गुन्हा सिद्ध करून दाखवावा. तसे झाल्यास संबंधित क्रांती मोर्चासह आपापल्या राजकीय पक्ष, संघटनांना सोडचिठ्ठी देतील, असे आव्हान क्रांती मोर्चाचे...
ऑगस्ट 02, 2018
जुन्नर - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १) सरकार विरुद्ध असहकार आंदोलन पुकारले होते. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले, तर व्यावसायिकांनी कडकडीत ‘बंद’ पाळून आंदोलनास पाठिंबा दिला. रस्त्यावर शुकशुकाट होता. एसटी बस स्थानके ओस पडली होती. प्रशासनाने तालुक्‍यातील शाळा...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...
जुलै 29, 2018
सोलापूर : आरक्षणासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी ग्रामदेवी रुपाभवानी मंदिर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जागरण गोंधळ करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार भारत भालके यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरण गोंधळास भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला...
जुलै 28, 2018
मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात एसटीला लक्ष्य केल्याने आठ दिवस ही सेवा विस्कळित झाली होती; पण आता आंदोलकांनीच एसटी सुरू ठेवण्याची विनंती केल्याने बससेवा हळूहळू मार्गावर आली आहे. असे असले तरी पुन्हा कधीही भडका उडण्याच्या शक्‍यतेने महामंडळ धास्तावलेले आहे. या आंदोलनाच्या काळात सर्वाधिक झळ...