एकूण 103 परिणाम
April 04, 2021
ब्रह्मपुरी (सोलापूर) : पंढरपुर - मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षानी चंग बांधला असून निवडणुकीचे वारे आतापासूनच तापू लागले आहे. प्रथमच या पोट निवडणुकीत आवताडे गटाच्या दोन्ही भावामध्ये लढत पाहावयास मिळत असून कुठल्या उमेदवारास फटका बसणार ? कोण तारणार ? कोण बाजी मारणार ? मतदानरुपी...
April 01, 2021
सांगोला (सोलापूर) : माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू व सध्या पश्‍चिम बंगालमध्ये शिक्षण घेत असलेले डॉ. बाबासाहेब देशमुख सांगोल्यात आल्यावर दोन दिवस त्यांना भेटण्यासाठी गावोगावच्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी डॉ. देशमुख यांनी जरी मी अजून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला...
March 14, 2021
सोलापूर ः संगेवाडी येथे लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या महिला शेतकरी मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.  श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाने हे आयोजन केले होते.  या...
March 11, 2021
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे असून पर्यावरण मंत्री म्हणून युवासेनेचे आदित्य ठाकरे हे काम पाहत आहेत. दोघेही मंत्री असल्याने त्यांना मुंबई सोडून राज्यभर दौरे करणे मुश्‍किल होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे....
March 09, 2021
वाळूज (सोलापूर) : अलीकडे महिलांवरील अत्याचार, मुलगी नको मुलगा हवा म्हणून होणारी स्त्री-भ्रूणहत्या अशा विकृत घटनांच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन जगभरात साजरा करण्यात आला. मात्र भोयरे (ता. मोहोळ) या गावात, यापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्‍स...
March 05, 2021
सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात महसूल विभागातर्फे अवैध वाळू उपसा, वाहतुकीसाठी दंड केलेल्या परंतु दंडाची रक्कम न भरलेल्या 187 थकबाकी असणाऱ्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्यात आला आहे. महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरूच असून, नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व नूतन सदस्यांची...
March 03, 2021
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ - पंढरपूर पालखी मार्गाचे पोखरापूर (ता. मोहोळ) येथे काम सुरू असून, या मार्गात जिल्हा परिषद शाळा व तिची संरक्षक भिंत येत आहे. संबंधित ठेकेदाराने सोमवारी मध्यरात्री संपादित जागेतील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीस कोणतीही पूर्वसूचना न...
March 02, 2021
सांगोला (सोलापूर) : सांगोला पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगोला शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातही मोठे फलक लावून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस पाटील, पत्रकार, ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य व इतर संघटनांच्या...
February 27, 2021
मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील उपळे (दु) ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पोस्टल मते घेऊन विजयी झालेल्या उमेदवार पल्लवी महानवर यांचं नशीब जोरात आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत नितीन बुरगुटे यांनी 9 मते घेऊन मनीषा वैभव पासले यांचा...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : खेड्याकडे चला, या महात्मा गांधींच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत आयआयटी, मुंबईमध्ये एअरोस्पेस या विषयात डॉक्‍टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणाऱ्या...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती....
February 25, 2021
महूद (सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असतानाही, नागरिकांमध्ये याचे अजूनही गांभीर्य दिसून येत नाही. यासाठी सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी स्वतः महूदला भेट देऊन विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या वेळी सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात...
February 25, 2021
सोलापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आणि एक शहरप्रमुख असून, प्रत्येक तालुक्‍यासाठी एक तालुकाप्रमुख आहे. राज्याच्या सत्तेची दोरी पक्षाच्या अध्यक्षांकडे असतानाही संघटितपणे लोकांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा श्रेयवाद आणि गटबाजी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत...
February 24, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील हुन्नूर येथील शिरनांदगी रस्त्यालगतच्या गट क्रमांक सहामधील 1681.4 ब्रास मुरुमाचे अवैधरीत्या उत्खनन केल्याप्रकरणी एक कोटी 74 लाख 82 हजार 816 रुपये दंड भरण्याचा आदेश तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी संबंधितांना दिला आहे.  सरपंच मनीषा खताळ व त्यांचे पती मच्छिंद्र खताळ,...
February 24, 2021
माढा (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध झाली आहे. या दोन्ही पदांवर उच्च शिक्षितांची वर्णी लागली असून, सरपंचपदी एमए एमएड्‌ पीएचडी झालेल्या डॉ. रजनी मगन सुरवसे तर उपसरपंचपदी ऍड. पांडुरंग खोत यांची बिनविरोध निवड झाली आहे. उच्च शिक्षितांच्या...
February 23, 2021
नातेपुते (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांचन लांडगे तर उपसरपंचपदी अतुल पाटील यांच्या निवडी निश्‍चित झाल्या आहेत. नातेपुते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वचे सर्व 17 सदस्य सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे...
February 20, 2021
सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील सरपंच आरक्षणाची फेर सोडत होणार असल्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मात्र, मेथवडे गावचे अनुसूचित जमातीचे सरपंचपदाचे आरक्षण कायम राहणार आहे. आपल्याच गटाचा सरपंच होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून डावपेच आखत असलेले गाव पुढारी व...
February 19, 2021
सोलापूर : ग्रामीण भागातील वंशपरांगत शेतजमीन किंवा मालकी हक्क ज्याच्या नावावर आहे ती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर त्याच्या वारसदारांना त्या जमिनीवर वारसदार म्हणून नोंदणी कशी करायची, याबाबत अनभिज्ञता दिसून येते. प्रसंगी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र शेतजमीन ज्याच्या नावावर आहे...
February 16, 2021
पोथरे (सोलापूर) : पन्नास वर्षांपासून रखडलेल्या लिंबेवाडी येथील बांगर ओढ्यावरील पुलाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या पुलामुळे आता करमाळा तालुक्‍यातील पाच व नगर जिल्ह्यातील चार गावांमध्ये दळणवळण सुरू होऊन ही गावे एकमेकांशी जोडली जाणार आहेत.  या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष...
February 12, 2021
उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जितेंद्र साठे तर उपसरपंचपदी अनिल माळी यांची बिनविरोध निवड झाली. वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हनुमंत गाडे व उपसरपंचपदी आबासाहेब आवताडे यांची निवड करण्यात आली. वडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वडील बळिराम साठे यांच्यानंतर...