एकूण 40 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती ही शंभर टक्के होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात असणार असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली. जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या...
सप्टेंबर 15, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी...
सप्टेंबर 14, 2019
श्रीनगर : युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी अद्दल घडवली आहे. प्रत्यक्ष ताबा झालेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले आहे. लष्कराकडून या घठनेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी नेत्यांकडून...
डिसेंबर 29, 2018
बुलंदशहर : येथील कथित गोहत्या प्रकरणातील हिंसेला बळी पडलेले पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांनी नैराश्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे. लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
ऑगस्ट 17, 2018
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्लीः विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला होता. वाजपेयी यांनी एका वृत्तसंस्थेला 2002 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना अविवाहीत राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर...
जुलै 26, 2018
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे कारगिल विजय दिवस! पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी जवळपास तीन महिने चाललेल्या 'ऑपरेशन विजय'ची आठवण म्हणून 26 जुलै हा 'कारगिल विजय दिवस' म्हणून ओळखला जातो.  या दिवसाचे निमित्त साधून सोशल मीडियावर भारतीय जवानांबद्दल भावना...
एप्रिल 06, 2018
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक जण एकत्र येत आहेत. पण त्यांनी चहावाल्याच्या नादी लागू नये. तुम्ही त्यांच्याविरोधात औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना भरला. राज्यात परिवर्तन व्हायला सुरवात झाली आहे. हे राज्य म्हणजे हे...
मार्च 20, 2018
मुंबई - साखरेच्या उत्पादनाने पुन्हा एकदा विक्रमी आकडे गाठले असल्याने संकटात सापडलेल्यांना हात दया अशी मागणी महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील बडया साखर उत्पादकांची स्थिती शोचनीय झाली असून आयात बंद करून निर्यातीला परवानगी दया असेही गाऱ्हाणे आहे. साखर महासंघाचे...
फेब्रुवारी 25, 2018
नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलीवूडसह इतर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी यावर शोक व्यक्त...
फेब्रुवारी 19, 2018
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातून अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिवादन केले. देशभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.  Chhatrapati Shivaji, an icon of bravery and nationalism, was...
फेब्रुवारी 17, 2018
सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) - ‘‘अभिजात दर्जा मिळावा, यासाठी माझ्यासह विनोद तावडेंनी खूप प्रयत्न केले. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रियाही वेळोवेळी पूर्ण केली. आता लवकरच साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि अभिजात दर्जासाठी आग्रह धरणार,’’ अशी घोषणा...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांसंबंधीत अनेक तरतूदी मांडण्यात आल्या. राष्ट्रीय आरोग्य विमासुरक्षा योजनेअंतर्गत महिलांसाठी प्रसूतीरजा ही 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली आहे. 'आयुषमान भारत' या नव्या आरोग्य सुरक्षाविषयक योजनेमध्ये भारतातील 40 टक्के...
फेब्रुवारी 01, 2018
#Budget2018  बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध!  बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...
जानेवारी 23, 2018
दावोस - येथे सोमवारपासून 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या 48व्या वार्षिक सभेला सुरुवात झाली. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोसमध्ये आहेत. यावेळी मोदींनी जगभरातील विविध कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोदींनी भारताचा विकास...
जानेवारी 23, 2018
दावोस (स्वित्झर्लंड) - ""आमची अर्थव्यवस्था भक्कम आहे. आम्हाला काही अडचणी जरूर आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्वितीय आहेत,'' असे मत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. दावोस येथे "जागतिक आर्थिक मंचा'च्या 48व्या वार्षिक परिषदेसाठी ते येथे आले आहेत. या प्रसंगी...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली : 'गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे मान्यच आहे; पण आम्हाला मिळालेल्या एकूण टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली आहे. मतांमधील आठ टक्‍क्‍यांहून जास्त फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. गुजरात...