एकूण 209 परिणाम
मार्च 22, 2019
मुंबई - स्वतःच्याच प्रभागात बेकायदा फलक लावल्याच्या प्रकरणात अंधेरीतील भाजपचे नगरसेवक मुरारी पटेल यांनी  मुंबई महापालिकेला २४ लाखांची नुकसानभरपाई दोन महिन्यांत द्यावी, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. बेकायदा फलकबाजीबद्दल नगरसेवकालाच दंड होण्याची ही पहिलीच घटना आहे.  याबाबतची तक्रार गेल्या...
मार्च 19, 2019
बदलापूर : मुंबई मध्ये रेल्वेचा पादचारी पूल कोसळला की, बदलापूरमधील रेल्वेच्या पादचारी पुलाच्या डागडुजीचे काम सुरु होते असा अनुभव बदलापूरच्या नागरिकांना येत आहे. रेल्वे प्रशासन बदलापूरच्या प्रवाशांचंकडे तेव्हाच लक्ष देईल. ज्यावेळी मुंबई मध्ये एखादी दुर्घटना घडेल. अन्यथा लक्ष देणार नाही का असा सवाल...
मार्च 14, 2019
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पादचारी पुलांच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सुमारे 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सीएसटीजवळचा पादचारी पूल कोसळला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, सुमारे 23 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अजून...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या सुप्रीम कंपनीच्या दोघांची गुरुवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. दरम्यान, दुर्घटनेत जखमी झालेल्या दत्तू किसन नरवडे याचा रुग्णालयात आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 10 वर पोचली आहे. कामगार रुग्णालयात तीन...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात कंत्राटदार, पर्यवेक्षक आणि एसी तंत्रज्ञाचा समावेश आहे. हलगर्जी आणि सुरक्षेची जबाबदारी न घेतल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे; मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार राज्य विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या आठ जणांच्या मृत्यूला रुग्णालयाचे प्रशासन आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) जबाबदार असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी (ता. 18) रुग्णालयाच्या...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार राज्य विमा योजना रुग्णालयाला लागलेल्या आगीला केंद्र व राज्य सरकार आणि महामंडळाची बेफिकिरी जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केला आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे. मुंबईतील गांधी हॉस्पिटलसह अन्य सहा...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - अंधेरीतील कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात मृत्यूचे अग्नितांडव सुरू असतानाच एक नवा जीव या जगात आला. रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवतीने अग्निशमन दलाच्या शिडीवरून बाहेर येऊन एका बाळाला जन्म दिला. दोघांनाही अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे ही गर्भवती सोमवारी...
डिसेंबर 17, 2018
मुंबईः अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज (सोमवार) दुपारच्या सुमारास आग लागली आहे. या आगीमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले असून, 108 जण जखमी झाले आहेत. सायंकाळी 6च्या सुमारास आग आटोक्यात आली. ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर आज दुपारी चारच्या सुमारास आग लागली....
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यात एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.  अंधेरीच्या उड्डाणपुलाजवळ काही परदेशी...
नोव्हेंबर 16, 2018
गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या गडबडीत राजकारण आणि समाजकारणाकडे अंमळ दुर्लक्ष झाले; परंतु या पुढे आम्ही यथास्थित लक्ष देऊ. गेले काही महिने सदर मंगलकार्याचे आम्हाला प्रचंड टेन्शन होते....
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई - दिवाळीनंतर पश्‍चिम उपनगरातील हवेचा दर्जा खालावू लागला आहे. शनिवारी अंधेरीत सर्वाधिक प्रदूषण नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल मालाड परिसरातील हवा खराब असल्याचे नोंद झाले. या दोन्ही भागांतील हवा अतिधोकादायक श्रेणीत येत असून, रविवारीही अशीच परिस्थिती राहणार आहे.  अंधेरीत आज तरंगत्या धूलिकणाचे...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई - अंधेरी मेट्रो स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेप्रकरणी योगेंद्रप्रसाद रामेश्‍वर चौरसिया आणि शबीनाथ बसावंत विश्‍वकर्मा यांना अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (ता. १५) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  अंधेरीतील चांदिवली...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई - "अवनी' वाघीण मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. नरभक्षक झालेल्या अवनी वाघिणीला गेल्या शनिवारी (ता. 3) ठार मारण्यात आले होते. त्यानंतर त्याबाबत उलटसुलट...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढू लागली आहे. शहरातील वायुप्रदूषण बुधवारी (ता. 7) धोकादायक पातळीपर्यंत गेले असून, गुरुवारपर्यंत (ता. 8) ते अतिधोकादायक होईल, असा अंदाज "सफर' (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी ऍण्ड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) या संस्थेने व्यक्त केला. ...
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - वाहतूक कोंडी, बांधकामे, मुंबई पोर्ट ट्रस्टची सिमेंटची गोदामे आणि उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे मुंबईतील चार प्रमुख ठिकाणची हवा विषारी होऊ लागली आहे. कुलाबा, माझगाव आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) शहरातील सर्वात प्रदूषित ठिकाणे ठरली असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. वाहनांचे...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई : लेखिका विनता नंदा यांनी बुधवारी (ता. 17) बाबूजी अर्थात आलोकनाथ यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे आलोकनाथ यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.  अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडसह कॉर्पोरेट जगतातही "मी टू'...
ऑक्टोबर 03, 2018
गोरेगाव - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत चालणाऱ्या सध्याच्या लोकल फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे. सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत चालणाऱ्या लोकलच्या फेऱ्या आता गोरेगावपर्यंत जाणार आहेत. अंधेरीपर्यंत चालणाऱ्या 42 लोकल फेऱ्यांचा लाभ आता गोरेगावपर्यंतच्या प्रवाशांना होणार आहे. 1...
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई - प्रसिद्ध विनोदी अभिनेते संतोष मयेकर (वय 52) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे. संतोष मयेकर यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 3) अंधेरीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांची अंत्ययात्रा अंधेरीतील घरातून...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - मोबाईल व डी2एच रिचार्ज करणाऱ्या ऍप्लिकेशनमधील त्रुटींचा फायदा उचलून कंपनी मालकाला 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांना सायबर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. महेशभाई जाधव (28) व महेश सोलंकी (30) अशी त्यांची नावे असून ते भावनगर-गुजरात येथील रहिवासी आहेत. त्यांनी 20 हजार बेकायदा व्यवहार...