एकूण 450 परिणाम
मे 18, 2019
कास - सदाहरीत व अतिवृष्टीच्या कास पठाराच्या कुशीत वसलेल्या मौजे कुसुंबीमुरा येथील आखाडे वस्तीवर गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करून डोंगरदऱ्यातील झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.  कुसुंबीमुरा हे कास पठाराच्या पश्‍चिमेला वसलेले गाव...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
एप्रिल 08, 2019
जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका हा ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखला जातो. दक्षिणेला तापी नदी आणि हतनूर धरण, तसेच उत्तरेला असलेल्या सातपुड्यात गंगापुरी, सुकी, मंगरूळ, मात्राण, अभोरा हे मध्यम आणि लघु प्रकल्प, किमान दोन डझन पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सुमारे २५ हजार हेक्टर केळी लागवडीमुळे हा...
एप्रिल 03, 2019
सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार'  जळगाव : ग्रामीण भागातील रहिवासी.. घरची परिस्थिती जेमतेम.. अशात शिक्षणाला पुरते पैसे नाही, तर कलेची आवड कशी जोपासणार, हा प्रश्‍नच.. अशा स्थितीतही जिद्दीने पंधरा वर्षे कलेची जोपासना करणारा सोनारी (ता. जामनेर) गावचा तरुण अपार मेहनत घेतो.. आणि कालांतराने...
मार्च 29, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्यांची डागडुजी 7 फेब्रुवारी ते 30 मार्च या काळात करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विमानांची उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत. या काळात दिवसाला किमान 200 विमाने रद्द करण्यात येत आहेत. ...
मार्च 11, 2019
देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे वारे जोराने वाहू लागले असताना जनतेचे मूलभूत प्रश्‍न काहीसे बाजूला पडले आहेत. वास्तविक बेरोजगारी, मंदावलेली, पावसाबाबतची अनिश्‍चितता, अशा अनेक गंभीर समस्या समोर आहेत. या अस्वस्थ पार्श्‍वभूमीवर होऊ पाहणारी आगामी लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण राहील! ...
फेब्रुवारी 25, 2019
गेली काही वर्षे कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा पावसाळा यामुळे होणारी नापिकी यामुळे बळिराजा व्यथित झाला आहे. काही गाव सोडून पोटापाण्यासाठी शहराकडे वळले आहेत, तर काहींनी स्वतःला संपवलं आहे. ही समस्या जटिल आहे. त्यासाठी शेततळी, "पाणी अडवा, पाणी जिरवा' अशा योजनांमधून सरकारचेही प्रयत्न सुरू...
जानेवारी 25, 2019
पाटण - योग्य नियोजन व संभाव्य दुष्काळाची पार्श्वभूमी असताना सिंचन व वीजनिर्मितीसाठी काटेकोर अंमलबजावणी केली असल्याने कोयना जलाशयात ७८.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा आजच्या तारखेला ८.०४ टीएमसी कमी असून, एक जूनपर्यंत वीजनिर्मिती व सिंचनासाठी जलवर्ष पार पाडताना...
जानेवारी 15, 2019
बेळगाव - जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही दोन वर्षात बेळगाव जिल्ह्यात विविध फळांच्या उत्पादनात 28 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. एक वर्षात 3 लाख 67 हजार मेट्रिक टन फळांचे उत्पादन झाले आहे. फळ उत्पादन शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असून बाजारातही फळांना मागणी...
जानेवारी 11, 2019
पुणे : मुंबईकरांना प्रत्येक पंधरा मिनिटाला हवामानात झालेले बदल मोबाईलवर मिळणार आहेत. त्यासाठी हवामान विभागाने "वेदर लाइव्ह' हे ऍप विकसित केले आहे. त्यातून प्रत्येक पंधरा मिनिटांनी एक किलोमीटरच्या आतील हवामानाचा अंदाज मिळेल. मुंबईमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर चेन्नई, कोलकता अशा मोठ्या...
डिसेंबर 29, 2018
ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे संस्थेचे माजी अध्यक्ष पां. के. उर्फ पांडुरंग केशव दातार (वय 84) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने रहात्या घरी निधन झाले. शनिवारी सांयकाळी त्यांच्यावर ठाण्यात अंतिम संस्कार करण्यात आले. पांडूरंग दातार यांचा जन्म पनवेल येथील असून शालेय शिक्षणही पनवेलमध्येच झाले. 1950...
डिसेंबर 22, 2018
सोलापूर - राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील 94 लाख 64 हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्...
डिसेंबर 22, 2018
पुणे - राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या कर्जमाफी योजनेत एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) करण्यास अनेक शेतकरी नाखूश आहेत. विशेष म्हणजे काही बॅंकांमध्ये ओटीएसच्या रकमा भरूनही शेतकऱ्यांना माफीच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आगीतून फुपाट्यात गेल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज...
डिसेंबर 20, 2018
सातारा - घरी होणाऱ्या प्रसूती थांबविणे, दुर्गम भागातील महिलांना सुरक्षित प्रसूती सेवा देऊन माता मृत्यूदर, नवजात मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘माहेरवाशीन’ आरोग्य केंद्राची’ ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रसूतीसाठी साधारणपणे सहा हजार ६००...
डिसेंबर 15, 2018
अकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला जात आहे. त्यातूनच नोव्हेंबरमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्हा मिळून एकूण १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  दुष्काळ, नापिकी, यामुळे...
डिसेंबर 08, 2018
रावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये झालेल्या जास्त तापमानामुळे करपलेल्या केळीचे आणि अन्य फळपिकांचे 265 कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई आणि मागील वर्षी अतिपावसाने झालेल्या कपाशी आणि...
डिसेंबर 02, 2018
मराठवाडा :  संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. विभागातील ४२१ पैकी ३४० मंडळांत दुष्काळ घोषित केला आहे. मात्र, ८१ मंडळांत अद्यापही दुष्काळ घोषित केलेला...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ८ हजार ५८२ हेक्‍टरमधील ११ हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानच्या मदतीसाठी ९ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला.  ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेली शेती, शेतजमिनीवरील गाळ वाहून गेलेल्या परंतु,...
नोव्हेंबर 22, 2018
पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस जलवर्षात पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा आजच्या तारखेला १३.७६ टीएमसी कमी आहे. त्यामुळे जुनपर्यंत वीज निर्मीतीसह सिंचनासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. यंदाचे जलवर्ष पार पाडताना व्यवस्थापनाला दुष्काळामुळे...
नोव्हेंबर 19, 2018
बंगळूर - साखर कारखान्यांच्या मालकांना मते देऊन आमदार, खासदार व मंत्री बनविता. आता कुमारस्वामी सरकार उसाची बाकी देत नसल्याची तक्रार करता. हे योग्य नाही, असे सांगून मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. बंगळूर कृषी विद्यापीठात कृषी मेळाव्याच्या सांगता...