एकूण 3241 परिणाम
मे 23, 2019
अमरावती : तब्बल 23 वर्षांनंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात महिलेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष (युवा स्वाभिमान) उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या किल्ल्यास खिंडार पाडत विजय संपादित केला. त्यांनी 37 हजार 295 मतांची आघाडी घेत विजय सुनिश्‍चित केला. पोस्टल...
मे 23, 2019
भिवंडी : भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी 1766 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कांग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी मागे टाकले आहे.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरस निर्माण करणाऱ्या निवडणुकीत आजी-माजी खासदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. दोघा उमेदवारांना पक्षातील अंतर्गत पदाधिकारी...
मे 22, 2019
औरंगाबाद : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील कलावंत उमेश जाधव याने 'जन्मभूमी ते कर्मभूमी' ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत त्याने आतापर्यंत सहा राज्यांत जाऊन...
मे 22, 2019
नाशिक - नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची मतमोजणी अंबड वेअर हाउसमध्ये 23 मेस होणार आहे. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या असुविधांची ओरड या वेळी होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वेळी विशेष काळजी घेतली आहे. त्यासाठी मतमोजणीस्थळी असलेल्या सुविधांवर...
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली....
मे 22, 2019
लोकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास अवघे 24 तास असताना मतदानयंत्राचा (ईव्हीएम) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे बिहार, पंजाब, हरियाना अशा काही राज्यांत "ईव्हीएम' एका ठिकाणांहून अन्यत्र हलवण्याचे काम खासगी गाड्यांमधून आणि सुरक्षेविना होत असल्याचे "व्हिडिओ' मंगळवारी व्हायरल झाले...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या...
मे 20, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखेंमुळे भाजपला ताकद मिळण्याची चर्चा आहे. थोरातांनादेखील आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या...
मे 20, 2019
पुणे - ‘कमवा आणि शिका’ योजनेतंर्गत विद्यार्थ्यांनी दररोज काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात मानधन जमा होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र, बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम लाटण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची...
मे 20, 2019
जळगाव - जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील एका तरुणाला "ओएलएक्‍स' या ऑनलाइन पोर्टलवर छायाचित्रे टाकलेली दुचाकी पसंत पडली. नव्वद हजार रुपये किमतीच्या गाडीचा 19 हजारांत सौदा ठरला, 5 हजार ऍडव्हॉन्स बॅंकेत जमा केले. गाडीची पॅकिंग होऊन चक्क भारतीय सेनेच्या ट्रकमध्ये लोड झाली, आता अधिक पैशांसाठी...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 18, 2019
पातूर (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून  त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मे 16, 2019
औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय...
मे 15, 2019
कारी (ता. धारूर) - २०१२ पासूनच्या दुष्काळानी वाढच किली, आता सावरावं कसं हेच कळत नाय, अशा शब्दांत बीड जिल्ह्यातील कारी (ता. धारूर) येथील ७५ वर्षांच्या मारोतराव मोरे यांनी दुष्काळाच्या दहाकतेविषयी सांगितले. गावात ग्रामस्थांना पाणी विकतच घ्यावं लागत आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीचा उपसा वाढला, नदी आटली,...
मे 15, 2019
नागपूर - ‘डॉ. सतीश गोगुलवार समिती’ आज नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पोहोचली. स्वतः डॉ. गोगुलवार आणि समितीतील दुसरे सदस्य डॉ. मनोहर मुदेश्‍वर यांनी रुग्णालयात फिरून तपासणी केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी ‘तपासणी शीट’मधील १५ मुद्द्यांवर चर्चा केली. तेव्हा...
मे 14, 2019
टाकळी हाजी - नथानी कुटुंबाच्या पुढाकारातून कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळ वस्तीवर राहणाऱ्या १५ आदिवासी कुटुंबांना रेलफोर कंपनीमार्फत स्लॅबची मोफत घरे बांधून देण्यात आली. दरम्यान, शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी समाज झोपड्या करून राहतात. कवठे येमाई येथे हिलाळ...