एकूण 423 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा सुमारे १ हजार ४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता आज राज्य शासनाने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. केंद्राच्या दुष्काळ...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना परकी कर्ज घेऊन कर्जफेड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिवाळखोरीतील कंपन्यांसाठी निधी उभारणीसाठी परकी कर्जाची नियमावली शिथिल केली जाणार असून, या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे म्हटले आहे. देशभरातील हजारो कंपन्या...
फेब्रुवारी 08, 2019
देशातील बेरोजगारीच्या जटिल आव्हानाला सामोरे जायचे असेल तर उच्च शिक्षण व प्राथमिक शिक्षण अशा दोन्ही स्तरांवर मूलभूत गुणात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. पण त्यासाठी आपण तयार आहोत काय हा कळीचा मुद्दा आहे. कों बडे झाकण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी उजाडायचे काही थांबत नाही, या मराठी भाषेतील वाक्‍...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारतीय रेल्वेत...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
जानेवारी 06, 2019
नाशिक - नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला सकाळी दहाला, एसटी बॅंकेच्या पंचवटी शाखेतून पैसे काढले दुपारी तीनला आणि परत भरणा केला दुसऱ्या दिवशी सकाळी अकराला... एका मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या बॅंक खात्यावर दोन दिवस असे व्यवहार केले. हे कुणाला सांगितले तर विश्‍वास बसेल? पण हो हे सारे घडले आहे...
जानेवारी 04, 2019
पुणे - स्पर्धेच्या युगात नोकरदार पालकांना मुलांना देण्यासाठी वेळ नाही, तर दुसरीकडे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदानेही नाहीत. परिणामी, एकाकीपणा दूर करण्यासाठी मुले मोबाईलकडे आकर्षित होतात. त्यातच मोबाईलवरील गेम्सच्या आहारी जाऊन मुले अविवेकी विचार करतात. शेवटी मृत्यूला कवटाळतात. म्हणूनच मुलांना...
जानेवारी 02, 2019
सातारा जिल्ह्यातील निगडी येथील नीलेश प्रमोद बोरगे या बीई (मेकॅनिकल) पदवीधारक युवा शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे गुऱ्हाळघर उभारून दर्जेदार गूळनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून त्याचे वडील सेंद्रिय ऊसशेतीत आहेत. नीलेशने हीच परंपरा वाढवली. याच उसापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय...
जानेवारी 02, 2019
मुंबई - किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वैयक्‍तिक कर्जांची मागणी वाढल्याचे नोव्हेंबर महिन्यात दिसून आले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, नोव्हेंबरअखेरच्या तिमाहीत ७३ हजार ८०० कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली. ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पतपुरठ्यात ३.३ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तिमाहीत...
जानेवारी 02, 2019
धुळे - राज्याला दिशादर्शक ठरलेला येथील डिजिटल शाळेचा प्रकल्प आता अमेरिकेशी ‘कनेक्‍ट’ केला जात आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ५) पहिला संभाषण वर्ग सुरू होणार आहे. या प्रकल्पाची माहिती मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी (ता. ३१) दिल्यावर तेही प्रभावित झाले. त्यांच्या...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - मुलांच्या संगोपनासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी केली. महिला कर्मचाऱ्यांबरोबरच पत्नी हयात नसलेले कर्मचारी; तसेच पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली असलेल्या कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल....
डिसेंबर 28, 2018
खुल्या अर्थव्यवस्थेचा बोलबाला खूप असला तरी त्याच्या मुळाशी असलेले स्पर्धेचे अद्यापही अनेकांना वावडे असल्याचे दिसते. तंत्रज्ञानामुळे आणि त्यामुळे व्यवसायाच्या स्वरूपात जगभर घडत असलेल्या बदलांशी जुळवून घेत पुढे जाण्याऐवजी संरक्षित कवचात राहण्याची वृत्ती ठाण मांडून बसली आहे. आपल्याकडे हे चित्र आर्थिक...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - एसटी महामंडळाचे कामकाज राजभाषा मराठीत करण्याचा आदेश असताना, इंग्रजीत पत्रव्यवहार केल्याबद्दल भंडारा जिल्ह्यातील विभाग नियंत्रकाला 100 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरून मध्यवर्ती कार्यालयाला कळवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने सरकारी कामकाज...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण रोखण्यासाठी आणि वेतनासह इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स या संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी (ता. २६) हजारो बॅंक कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाल्याने सार्वजनिक...
डिसेंबर 26, 2018
मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने उद्या (ता. 26) एक दिवसाच्या संपाची हाक दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांच्या विलीनीकरणानंतर केंद्र...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - रोजगार निर्मितीला बसलेली खीळ, देशांतर्गत आर्थिक घडामोडी आणि बदलांनी ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बॅंकेच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात इंडियन कंझ्युमर कॉन्फिडन्स इण्डेक्‍समध्ये घट झाली आहे. अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने वाटचाल...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.  जीएसटी विभागाने गुन्हा दाखल करून मध्य प्रदेशातील ‘नॅशनल स्टील अँड ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवस्थापकीय...
डिसेंबर 15, 2018
सातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरायच्या आहेत. कागदपत्रे गाडीसोबत बाळगण्यासाठी वाहनधारकांना करावी लागत असलेली तारेवरची कसरत व ती...
डिसेंबर 13, 2018
सातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन महिन्यांत चर्चाच राहिली असून, ती...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल यांसारख्या अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी असलेल्या '...