एकूण 3277 परिणाम
डिसेंबर 13, 2018
आटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी गोगोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली गेली चार महिने आंदोलन सुरू आहे....
डिसेंबर 13, 2018
नागपूर  - राज्यात वर्षाला फक्त पाच टक्केच नोकर भरती होत असून शंभर पात्र युवकांमधून फक्त एका नशीबवान युवकालाच सरकारी नोकरी मिळते. राज्य मागासवर्गीय आयोगानेच आपल्या अहवालात याचा उल्लेख केला असल्याने आरक्षित आणि आरक्षणासाठी झटणाऱ्या समाजाला प्रत्यक्षात काहीच फायदा होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते....
डिसेंबर 13, 2018
पुणे - राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले असले तरी, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या राज्य लोकसेवा पूर्वपरीक्षेचे अर्ज भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अर्ज भरताना मराठा हा गट दिसत असला तरी, आर्थिक-सामाजिक मागास ही श्रेणी दिसत नसल्याची तक्रार या समाजातील तरुणांनी केली...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले शिक्षण आणि सरकारी नोकरीतील १६ टक्के आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे मुंबई उच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणार आहेत. विनामोबदला मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढण्याचे साळवे यांनी मान्य केल्याने सरकारला दिलासा...
डिसेंबर 13, 2018
उमरखेड (जि. यवतमाळ) : मराठा समाजाला 16 टक्‍के विशेष आरक्षण जाहीर झाल्यानंतर विदर्भातील पहिले मराठा जातीचे डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रमाणपत्र आज, बुधवारी सव्वासहा वाजता उमरखेड येथे प्रदान करण्यात आले. येथील उपविभागीय कार्यालयात स्वप्नील कनवाळे व बालाजी वानखेडे यांना उपविभागीय...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...
डिसेंबर 12, 2018
हिंगोली-  महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा जात प्रमाणपत्र देण्यास सुरवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे...
डिसेंबर 12, 2018
पुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढील काळात ‘महिला व्होट बॅंक’ मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर राहील, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि...
डिसेंबर 12, 2018
लातूर - मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी येथे झालेल्या ओबीसी जागर मेळाव्यात विविध ४६ संघटनांचे प्रतिनिधी एकवटले. या मेळाव्यात ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, यासाठी सर्वत्र...
डिसेंबर 11, 2018
लातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मूळ ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी (ता.१०) येथे...
डिसेंबर 11, 2018
उल्हासनगर - काल सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगर न्यायालयात वकिलांनी कामबंद आंदोलन केले. उल्हासनगर तालुका बार ऍडव्होकेट फाऊंडेशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड.धम्मपाल तिडके, उमेश केदार...
डिसेंबर 11, 2018
आटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.  धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर आणी गोपीचंद पडळकर आणि श्री.जानकर यांनी सरकारकडे निवेदन देऊन मागणी...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याबद्दल हजारो धमक्‍या मिळाल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या धमकीचाही त्यात समावेश आहे, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. धमक्‍यांबाबत पोलिसांत तक्रार (एनसी) दाखल केली असून, खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख केला...
डिसेंबर 11, 2018
तीर्थपुरी (ता. घनसावंगी) - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबईत न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी मुरमा (ता. घनसावंगी) येथील वैजिनाथ प्रभाकर मुकणे (वय 32) याला मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच मुरमा येथील ग्रामस्थ वैजिनाथ...
डिसेंबर 11, 2018
मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील सुनावणीनंतर याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. त्यासाठी मराठा युवकांनी संयम बाळगायला हवा. लोकशाही मार्गानेच मराठा आरक्षणाचा लढा सुरू ठेवायचा आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सोमवारी केले. उच्च...
डिसेंबर 11, 2018
सातारा - उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेमध्ये येथून दोन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर जिल्ह्यातूनही म्हणणे मांडले जाणार आहे. शासनाने नुकतेच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास घोषित करत एसईबीसी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - राज्य सेवा आयोगाकडून सरकारच्या या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरिता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली असून, यामध्ये महसूल विभागातील २३० पदांची महाभरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर यापैकी काही...
डिसेंबर 11, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या बिंदूनामावली (रोस्टर) पुन्हा एकदा त्रुटींच्या गर्तेत अडकली आहे. तब्बल २१ ते २२ वर्षे ही बिंदूनामावली बनविली गेली नसल्याने सध्या त्याची पूर्तता करताना शिक्षण विभागाला डोक्‍याला हात लावण्याची वेळ येत आहे. बिंदूनामावली पूर्ण...
डिसेंबर 11, 2018
पिंपरी/आळंदी - बंदी असूनही शहराच्या काही भागात गुंठेवारीनुसार सर्रासपणे जमीन विक्री सुरू आहे. विशेषतः वडमुखवाडी आणि दिघीतील जमिनींची नुकसानभरपाई मिळूनही अनेकांनी रेड झोनबाधित जमिनी बेकायदा विकल्या आहेत. सातबारा उताऱ्यावर रेड झोनचे शिक्के आहेत. तरीही मंडलाधिकारी आणि तलाठ्यांनी सातबाराच्या नोंदी...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाच्या परिसरात मारहाण करण्यात आली. उच्च न्यायालयातील सुनावणी संपवून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सदावर्ते बाहेर आले होते. त्या वेळी जालनाचे रहिवासी असलेल्या वैद्यनाथ पाटीलने त्यांच्यावर हा हल्ला...