एकूण 46 परिणाम
जानेवारी 24, 2020
पुणे : आपल्या प्रत्येक शाळेत पानिपत हा पराभवाचा इतिहास नाही, तर शौर्यचा आहे, हे मुलांवर बिंबवा. सदाशिवराव, विश्वासराव हा टिंगलटवाळीचा विषय नाही, ती शौर्यगाथाच आहे, अशी भावना दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ब्राह्मण...
जानेवारी 15, 2020
कोल्हापूर  : कोणतीही अद्ययावत साधने उपलब्ध नसताना भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी कलापूर कोल्हापुरातच तयार केला होता. सध्या एखाद्या सिनेमासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्याला बाहेरून घ्यावे लागते. त्यामुळे असे तंत्रज्ञानही कदाचित कोल्हापूरचाच एखादा तंत्रज्ञ लवकरात लवकर...
जानेवारी 12, 2020
पुणे : ''पानीपत चित्रपटाद्वारे पराभवातही शुरवीरता काय असते, हे पडद्यावर दाखवायचे ठरविले होते. पानीपतच्या रणसंग्रामामधील मराठ्यांचे शौर्य आणि अशी लढाई कधीही झालेली नाही, हे जगाला दाखविण्याची गरज होती. म्हणून हा चित्रपट केला,'' असे मत चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी...
जानेवारी 11, 2020
चित्रपट यशस्वी व्हायचा असेल तर विषय हटके असाच निवडावा लागतो. भारतात दरवर्षी दोनेक हजार चित्रपट बनविले जातात. आता एवढे हटके विषय आणणार कोठून आणि मांडलेला विषय हा यशस्वी होईलच, याची खात्री देता येत नाही. मग अशावेळी एखादा हाताशी असलेला तयार विषय फुलवून मांडणे, हाच मार्ग अनेक निर्माते-दिग्दर्शक...
डिसेंबर 29, 2019
'पानिपत'साठी मला तुमची मदत मिळतीये, पण तुम्ही पुढचे आठ महिने शूटिंग होईपर्यंत आमच्याबरोबर राहा. प्रत्येक महिन्याचे पाच लाख रुपये मानधन तुम्हाला देतो.' आशुतोष गोवारीकर मला म्हणाले. मी म्हटलं "शक्‍यच नाही, माझी व्याख्यानं-इतर कामं आहेत, पण तुम्ही माझ्या आवडीच्या विषयावर,...
डिसेंबर 15, 2019
लातूर : पानिपतच्या युद्धाला खऱ्या अर्थाने जिथून सुरवात झाली, अशा दैदिप्यमान इतिहासाची साक्ष असलेल्या उदगीरच्या भुईकोट किल्ल्याची सध्या दुरवस्था झाली आहे. किल्ल्यात अनेक ठिकाणी पडझड पहायला मिळत आहे. तरीसुद्धा राज्य सरकारच्या गड-किल्ले संवर्धन योजनेच्या यादीत या किल्ल्याचा समावेश नाही, अशी माहिती...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने 9 कोटी...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : इसवी सन १७६१ मध्ये अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवराव पेशवे यांच्यामध्ये पानिपतची घनघोर लढाई झाली. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीचा हा इतिहास आताच्या पिढीसमोर ठेवणे हे वाटते तितके सोपे काम नव्हते. कारण त्याकरिता प्रचंड संशोधन, खूप पेपरवर्क करावे लागणार होते. कारण पानिपतची लढाई ही भारताच्या...
डिसेंबर 06, 2019
पुणे - ‘पानिपत’ चित्रपटाचे दागिने पु. ना. गाडगीळ आणि सन्सने (पीएनजी) घडविलेले आहेत. चित्रपट व प्रदर्शनानिमित्त औंध येथील वेस्टन सेंटर वन मॉलमधील ‘पीएनजी’च्या दालनास ‘पानिपत’ चित्रपटाची टीम आशुतोष गोवारीकर, क्रिती सेनन, सुनीता गोवारीकर, अर्जुन कपूर यांनी नुकतीच...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : 'पानिपत' या हिंदी चित्रपटाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले. पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा अविष्कार होता, अशा प्रकारची पोस्ट फेसबुकवर देत त्यांनी चित्रपटाचे कौतुक...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर स्वतःचा हक्क सांगणे चुकीचे आहे, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्‍वास पाटील यांना ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या शुक्रवारी...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाला आज (ता. ०३) मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला. साहित्यिक विश्वास पाटील यांनी सिनेमावर त्यांच्या पानिपत कांदबरीतील पात्र आणि प्रसंग व मूळ कल्पना चोरल्याचा आरोप केला होता. मात्र, निर्माता आशुतोष गोवारीकर यांच्या वतीने या आरोपांचे...
डिसेंबर 03, 2019
पानिपतच्या तिसऱ्या युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांना 6 डिसेंबरला अनुभवयाला मिळणार आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इसवी सन 1761 मध्ये झालेलं हे युद्ध भारताच्या इतिहासातलं सर्वांत महत्त्वाचं युद्ध...
डिसेंबर 03, 2019
ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील चित्रपटाची निर्मिती तशी जोखमीची बाब असते कारण सद्यःस्थितीत अशा बव्हंशी चित्रपटांना कोणत्या ना कोणत्या वादाला सामोरे जावे लागते. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत.. या सगळ्यांनाच विशिष्ट वर्गाच्या नाराजीला प्रारंभी तोंड द्यावे लागले आहे. असे चित्रपट भव्य, महाखर्चिक असतात....
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : आगामी पानिपत या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपल्या साहित्याचे व संशोधनाचे चौर्यकर्म करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विख्यात साहित्यिक व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी उच्च न्यायालयात सूट दाखल केला आहे. विश्...
नोव्हेंबर 25, 2019
ऐतिहासिक चित्रपट आणि त्यावरून वाद हे ठरलेलं समीकरण आहे. दिग्दर्शक लिबर्टी घेऊन किंवा कलात्मक विचार करून त्या चित्रपटात बदल करतात व समाजतला एक कोणतातरी समूह त्यावर नाराज होतो व सुरू होतं धमक्यांचं सत्र. असंच काहीसं घडलंय आशुतोष गोवारीकरांसोबत. 'पानिपत : द ग्रेट बिट्रेयल' या चित्रपटाच्या...
नोव्हेंबर 21, 2019
गेले काही दिवस सगळीकडे 'पानिपत'ची चर्चा सुरू आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व आलंय. पानिपतमधील विविध भूमिकांचे पोस्टर्स आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकणार अशी चर्चा होत आहे. यातच पानिपतचे आणखी एक पोस्टर आज...
नोव्हेंबर 21, 2019
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपट "पानिपत' हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील काही कलाकारांचे लक्षवेधी लूक समोर आले. आता चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 'मर्द मराठा' गाण्याची! 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नुकतेच या...
नोव्हेंबर 16, 2019
पणजी (गोवा) : गोव्यात वेर्णाजवळ नौदलाचे प्रशिक्षणासाठीचे विमान कोसळले. नौदलाकडून वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी हे विमान वापरण्यात येत होते. दुर्घटनेनंतर दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. नौदलाचे मिग २९ के हे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे लढाऊ विमान वेर्णाजवळ कोसळले. विमानाला आग लागलेल्या अवस्थेत ते...
नोव्हेंबर 13, 2019
नाशिक : बहुचर्चित पानिपत चित्रपटाच्या रूपेरी पदरावर नाशिकच्या पैठणीचा मोर नाचला आहे. या चित्रपटातील नायिका क्रीती सेनन हिच्यासह सर्व महिलांनी परिधान केलेल्या पैठण्या नाशिकच्या सोनी पैठणीने पुरविल्या आहेत. येवला, पेशवाई आणि पैठणी असा सुंदर मिलाफ सोनी पैठणीने "पानिपत'च्या निमित्ताने पुन्हा एकदा...