एकूण 160 परिणाम
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
मे 08, 2019
मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
एप्रिल 24, 2019
मुंबई - कच्च्या तेलाच्या भाववाढीची धास्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २३) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. आजच्या सत्रात वित्त संस्था आणि ऑटो क्षेत्रातील समभागांमध्ये तुफान विक्री झाली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०.३० अंशांनी घसरून ३८ हजार ५६४.८८ अंशांवर बंद झाला....
एप्रिल 16, 2019
मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज (मंगळवार) पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात 39 हजार 277.96 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 787.05 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. जागतिक...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९२.४०...
मार्च 27, 2019
प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कौशल्य असतं. शिवाय काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उमेद असते. अर्थात यासाठी गरज असते ती आपल्या जिवलगांच्या साथीची. आयटी क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिस आणि पटनी कॉम्प्युटर्स सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम केल्यांनतर स्वतःचं काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती....
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - स्वप्न बघा... त्यासाठीच्या कष्टाचेही योग्य नियोजन करा आणि जे कराल ते सौजन्यानेच करा... कारण सौजन्याच्या मागेच लक्ष्मी असते... असा मूलमंत्र आज प्रसिद्ध उद्योजिका जयंती कठाळे यांनी दिला. दीड तासाच्या या निखळ संवादात त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त करताना खणखणीत आत्मविश्‍वास कसा असतो, याची...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : विविध शैक्षणिक शाखेच्या तब्बल एक हजार तरुणांना 40 बहुउद्देशीय कंपन्यांमध्ये "एपीजी लर्निंग'तर्फे "राइज जॉब फेअर फेब्रुवारी 2019' च्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना सरासरी 5 लाख ते साडेआठ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. पुणे स्थानकाजवळील ऑल इंडिया...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई - आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व परकी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ३४१ अंशांची झेप घेत ३६,२१३.३८ अंशांवर स्थिरावला. याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १०,८०० ची पातळी ओलांडली. तो ८८...
जानेवारी 31, 2019
मुंबई: अर्थसंकल्पाच्या तोंडावर भारतीय शेअर बाजाराने उसळी मारली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळी घेऊन 36,188.77 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 159.95 अंशांनी वाढून 10,811.75 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ न...
जानेवारी 31, 2019
हिंजवडी - जागतिक दर्जाच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील इन्फोसिस कंपनी परिसरातील शेकडो वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. घटनेला १५ दिवस उलटूनही एमआयडीसीकडून संबंधितांवर कारवाई केली नसल्याने हिंजवडी, माण परिसरातील पर्यावरणप्रेमींनी त्याचा निषेध केला.  कत्तल केलेल्या...
जानेवारी 11, 2019
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण...
जानेवारी 09, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली ‘इन्फोसिस’ पुन्हा एकदा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या ११ जानेवारीला होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरच्या ‘बायबॅक’ प्रस्तावावर विचार केला जाणार असल्याचे समजते. कंपनीकडून 1.6 अब्ज डॉलर मूल्यही शेअर पुन्हा विकत घेतले...
जानेवारी 08, 2019
बंगळूर - आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारखे (एआय) नवे तंत्रज्ञान आणि नव्या यंत्रांमुळे भविष्यात बेरोजगारी निर्माण होणार नाही, तर त्यामुळे अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आज केले.
जानेवारी 02, 2019
मुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल 11 जानेवारीला जाहीर होणार आहेत. इन्फोसिस तिसऱ्या तिमाही निकालांची घोषणा 11 जानेवारी 2019 ला संध्याकाळी 4:15 वाजता करणार असल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. तिमाही...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
डिसेंबर 21, 2018
मुंबई: अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीला प्राधान्य दिल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला. 'फेड'ने बुधवारी व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने...