एकूण 3004 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई : देशातील शिक्षणाचा स्तर घसरत असतानाच राज्यातील 40 विद्यापीठे बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यापीठांवर कारवाई करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण खात्याकडे तक्रार करूनही काहीही कारवाई होत नसल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली....
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - जेएनपीटी (उरण, जि. रायगड) च्या प्रवेशद्वारावर बसवण्यात येणाऱ्या नियोजित शिल्पकृतींमधून रामदास स्वामींचे शिल्प हटवावे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तरीही शिल्प बसवलेच तर, संभाजी ब्रिगेड शिल्प उखडून टाकेल, असा इशारा प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शुक्रवारी (ता. 15) दिला. ...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - मुंबईतील 1993 मधील साखळी बॉंबस्फोटप्रकरणी 24 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या तीन दोषींना 28 दिवसांची 'फर्लो' (तात्पुरती रजा) उच्च न्यायालयाने नुकतीच मंजूर केली. पोलिस उपमहानिरीक्षक (तुरुंग) स्वाती साठे यांनी 15 डिसेंबर 2018 रोजी रजेचे अर्ज नामंजूर केल्यावर या तिघांनी ...
फेब्रुवारी 16, 2019
नवी दिल्ली : फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने गुरुवारी (ता. 14) ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत आपल्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास त्याचे प्रत्यार्पण आणखी काही महिने रखडण्याची शक्‍यता आहे.  वेस्टमिनिस्टर न्यायालयाने...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला उल्लेख फरार उद्योगपती विजय मल्ल्या याच्या जिव्हारी लागला असून, त्याने याला आज ट्‌विटरद्वारे उत्तर दिले. कर्जफेडीबाबत मी दिलेली ऑफर स्वीकारावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅंकांना का देत नाहीत, असा सवाल मल्ल्याने केला आहे. ...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - राज्यातील विविध तुरुंगांमध्ये तुरुंगाधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची किती पदे रिक्त आहेत, याचा अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १४) राज्य सरकारला दिले. तुरुंगामधील सोई-सुविधांबाबत राधाकृष्णन समितीने दिलेल्या शिफारशींवर काय अंमलबजावणी केली, अशी...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे पुणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी हजर झाले आहेत. डॉ. तेलतुंबडे यांच्यावर बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला आहे. यापूर्वी त्यांना पोलिसांनी अटकही केली होती, मात्र जिल्हा...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि बलात्काराच्या प्रकरणात दोषीला विशेष न्यायालयाने ठोठावलेल्या २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. पीडिताला न्याय देण्याच्या दृष्टीने या गुन्हेगाराला दिलेली शिक्षा योग्यच आहे, असे उच्च न्यायालयाने...
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - मालेगावमध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी प्रसाद पुरोहित याला सोमवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अभियोग पक्षाने पुरावा म्हणून दाखल केलेल्या साक्षांकित प्रतींची मागणी करणारी त्याची याचिका न्यायालयाने नामंजूर केली. विशेष एनआयए...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - आदिवासींना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत असल्याचे ध्यानात घेऊन विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला यश मिळत आहे, अशी माहिती महाधिवक्‍त्यांनी नुकतीच उच्च न्यायालयात दिली. जात पडताळणी समित्यांमधील रिक्त पदे मे महिन्यापर्यंत भरण्यात येतील, असे आश्‍वासनही त्यांनी...
फेब्रुवारी 12, 2019
लष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या व्यवस्थेला संविधानाचा...
फेब्रुवारी 11, 2019
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खनन परवाने बंद असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महसूलने कडक मोहीम राबवली आहे. मात्र दुसरीकडे तेरेखोल नदीत गोव्यातील वाळू माफीया बेसुमार लूट करत आहेत. यामुळे तेरोखोलचे पात्र धोक्‍यात आले आहे. कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर येरवडा कारागृहातून बाहेर आलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याची मिरवणूक काढणाऱ्यांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना मिरवणूक काढणे, मोटार वाहन कायदा व जमावबंदी आदेशाचा भंग करणे या स्वरूपाचे हे गुन्हे आहेत....
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : शिक्षक भरतीवेळी होणारा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने पवित्र हेतूने भरतीसाठी पवित्र प्रणाली आणली. परंतु त्यालाच "ग्रहण' लागले आहे. राज्यातील हजारो जण भरती सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असताना रोस्टर पडताळणीच्या प्रक्रियेत त्याला विलंब होत आहे. शिवाय सरकारनेही नवा आदेश काढत एक पदासाठी...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : साखर आयुक्तालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी न देणाऱ्या कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी राज्य सहकारी साखर संघाने केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साखर आयुक्तालयाने कारखान्यांवर केलेल्या...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : ''कोणत्याही व्यवसायात भांडवल गुंतविताना अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार अंमलबजावणी व्हावी. तसे न झाल्यास अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालया पर्यंत जातात. अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यानंतर सरकारने तो स्वीकारला पाहिजे. परंतु, निकाल विरोधात...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई - राज्यातील आदिवासी भागांमधील बालमृत्यू रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आता तांत्रिक-मांत्रिकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना दवाखान्यात घेऊन येणाऱ्या तांत्रिक-मांत्रिकांना प्रतिरुग्ण २०० रुपयांचे अनुदान देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती महाधिवक्‍त्यांनी...
फेब्रुवारी 09, 2019
पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमानुसारच नियमित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे शहरातील एक लाखाहूनही अधिक असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या आदेशातही अधिकृत करण्यासाठीची रक्कम...