एकूण 92 परिणाम
जून 12, 2019
मुंबई - अनधिकृत बांधकामे लोकहिताच्या दृष्टीने धोकादायक असून त्यावर कायदेशीर वचक असायलाच हवा. ज्या महापालिका कारवाई करताना डोळेझाक करून अतिक्रमणांवर कृपादृष्टी ठेवतात, त्यांच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे. या वेळी भिवंडीमधील अनधिकृत बांधकामांच्या...
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 03, 2019
जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : विभागीय आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्य निवडले तरी सभापती निवड न्यायप्रविष्ठ असल्याने समिती अस्तित्वात येणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच समिती स्थापन होणार की नाही हे स्पष्ट होईल. बुधवारी (ता. 20) होणाऱ्या सभेत...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई - मुंबईबाहेरील रुग्णांवर महापालिका रुग्णालयांत उपचारांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान घ्यावे, अशी ठरावाची सूचना शिवसेनेने महासभेत मांडली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने अप्रत्यक्षपणे ‘मी मुंबईकर’ घोषणा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व...
डिसेंबर 10, 2018
धुळे : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. "एमआयएम'ने तूर्त चार जागांवर विजयी सलामी देत महापालिकेत प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपने "मिशन फोर्टी प्लस'चा दिलेला नारा यशाकडे वाटचाल करत असल्याने विजयाच्या समीप...
डिसेंबर 08, 2018
धुळे ः "आमचा नेता लय पॉवरफुल' या गीताने महिनाभर प्रचारात रंगत भरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना की लोकसंग्राम पक्षाचे नेते "पॉवरफुल' हे सोमवारी (ता. 10) निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या आघाडीसह चार पक्षांमधील काटा, अटीतटीच्या लढतींकडे सर्वांच्याच नजरा लागल्या...
डिसेंबर 04, 2018
जळगाव : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासह अन्य मुद्यांची तपासणी करण्यासाठी पोषण आहाराची केंद्रीय समिती जिल्हा दौऱ्यावर आहे. दहा सदस्यीय समितीने दोन ग्रुपमध्ये विभागणी करून वेगवेगळ्या तालुक्‍यातील शाळांना भेटी देवून तपासणी केली. विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी समितीतील सदस्यांनी...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे - मुठा उजवा कालवा फुटून बेघर झालेल्या दीडशे कुटुंबांना सावरण्यासाठी शहरातील आमदारांपासून मुख्यमंत्र्यांची यंत्रणा धावून आली. या लोकांसाठी मदतीचे आकडे जाहीर झाले आणि ही कुटुंबे पुन्हा आपला संसार उभारतील, अशी आशा वाढली; पण सरकारी यंत्रणेप्रमाणे राजकीय मंडळींची मदतही कुठे मुरली, याचा पत्ता...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर- पूरग्रस्त केरळला मदत करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला. त्यामुळे सप्टेंबरच्या मानधनातून ही रक्कम वळती करण्यात येणार आहे.  धक्कादायक  म्हणजे, मानधन जमा करण्याचे संमतिपत्र देण्याची मुदत 29 सप्टेंबर 3018 पर्यंत म्हणजे तब्बल हजार वर्षे मुदत...
सप्टेंबर 14, 2018
धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौऱ्यावर येऊन गेले आणि एका दगडात अनेक पक्षी टिपून गेले. त्यांनी भाषणात मांडलेल्या भूमिकेचा अन्वयार्थ काढण्यात अनेक राजकीय मंडळी अद्याप गुंतलेलीच आहे. यातील चर्चा शिरपूरचे भाग्यविधाते...
ऑगस्ट 11, 2018
जळगाव : "सकाळ' खानदेश आवृत्तीचा 14 वा वर्धापनदिन सोहळा उद्या (11 ऑगस्ट) साजरा होत असून, त्यानिमित्त महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.  वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव : भाजपने महापालिका निवडणुकीत "फिफ्टी प्लस' मिशन आखले होते. जळगावकरांनी त्याला भरभरून साथ दिली आहे. त्यामुळे आपण जळगावकरांचे ऋणी आहोत. आम्ही जलसंपदामंत्री यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांना भेटून पहिल्याच टप्प्यात रस्ते, गटारींसाठी शंभर कोटी आणणार आहोत, अशी ग्वाही आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार...
जुलै 30, 2018
जळगाव ः देशात ज्याप्रमाणे 60 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने पराभूत करून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपवर विश्‍वास टाकला, त्याचप्रमाणे जळगाव महापालिकेतही गेल्या 35 वर्षांपासून एकाच जणाकडे असलेल्या सत्तेत बदल घडवून भाजपवर विश्‍वास टाकावा. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने जळगावात पायाभूत...
जुलै 30, 2018
जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणूककाळात नेत्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतात. आता महापालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पायी रॅली काढून घाम गाळत आहेत.  जळगाव महापालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात...
जुलै 29, 2018
जळगाव ः शहरातील हॉंकर्स व फेरीवाले यांचा अनेक दिवसापासून प्रश्‍न प्रलंबित आहे. मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर हॉंकर्स चा प्रश्‍न आम्ही मार्गी लावू असे आश्‍वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हॉकर्स संघर्ष समितीच्या बैठकीत दिले. यावेळी समितीतर्फे भाजपला निवडणूक पांठीबा देण्याचे ठराव करण्यात आला. ...