एकूण 57 परिणाम
एप्रिल 19, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १९) मुख्य दिवस आहे. या निमित्ताने आज पहाटे श्री जोतिबा देवास प्रशासनाच्यावतीने महाभिषेक करण्यात आला.  यंदा सलग सुट्यांमुळे विक्रमी गर्दी होणार आहे. ही संख्या आठ ते दहा...
एप्रिल 18, 2019
औरंगाबाद - तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. उन्हापासून कसा बचाव करावा, काय करावे, काय करू नये, याबाबत माहिती देणारे एक हजार पोस्टर्स शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली आहेत.  यंदा शहरात...
एप्रिल 17, 2019
नागपूर - उपराजधानीचा पारा खाली आला आहे. मात्र, त्याआधी प्रचंड उकाडा असल्याने विविध खासगी रुग्णालयांत उष्माघाताच्या रुग्णसंख्येचे शतक पूर्ण झाले आहे. यावर उपचाराचा उतारा म्हणून महापालिकेने शहरातील तीन रुग्णालयांत 40 खाटांचे शीत वॉर्ड तयार केले आहे. मात्र, महापालिकेचे शीत वॉर्ड अद्याप रिकामेच आहेत. ...
एप्रिल 16, 2019
रत्नागिरी - हंगामातील कमी पावसाच्या नोंदीमुळे ऑक्‍टोबरमध्ये भूजल पातळीत घट झाली; मात्र नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने जानेवारीत पाणी पातळी वाढलेली होती. गेल्या तीन महिन्यांत थंडीपाठोपाठ वाढलेल्या उष्म्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मार्च २०१९ मधील पाहणीत यंदा भूजल पातळी ०.१२ टक्‍क्‍यांनी घट झाली...
एप्रिल 12, 2019
बीड - सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे जात आहेत. यामुळे जिल्ह्यात गरमीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जिल्ह्यातील उष्णतेच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाच्या वतीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना करण्यात आले आहे. यासह जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी...
एप्रिल 10, 2019
पुणे - पुणे जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे उष्माघातासारखे गंभीर आजार डोके वर काढण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे. ...
एप्रिल 02, 2019
सूर्याचे किरण चांगलेच तळपू लागले आहेत. तापमान वाढायला लागले आहे आणि हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आहे. आता अंगाची तल्खली सुरू होईल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच या उन्हाळ्याचा त्रास होत असतो. हा उन्हाळा आरोग्यदायी बनवता येईल. त्यासाठी आधीच काळजी घ्यायला सुरवात केली पाहिजे...
एप्रिल 02, 2019
नागपूर - प्रादेशिक हवामान विभागाने पुढील चार दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाच्या लाटेचा इशारा दिल्याने सूर्याचा प्रकोप आणखी वाढण्याची दाट शक्‍यता आहे.  उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा प्रभाव कमी झाल्यानंतर राजस्थानमधून उष्ण वारे वाहू लागल्याने सध्या विदर्भात लाटेसदृश वातावरण आहे. विदर्भातील सर्वच...
मार्च 31, 2019
जळगाव ः "हॉट सिटी' म्हणून जळगाव जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. त्यात कहर म्हणजे यंदा मार्चमध्येच तापमानाने चाळिशी पार केली आहे. आज जिल्ह्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यात आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानाची स्थिती पाहून जिल्हा...
मार्च 28, 2019
वाशी -  तापमानवाढीमुळे सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिक थंडगार पेयांना प्राधान्य देऊ लागल्याने घाऊक बाजारात फळांची मागणीही कमालीची वाढली आहे. फळांचा रस आरोग्यास चांगला असून तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात विविध...
जुलै 01, 2018
उष्णता "ताप'दायक असते. शरीराचं तापमान थोडं कमी झालं, तर कार्यक्षमता वाढते, उत्साह वाढतो. मात्र, एसीचा वापर करून खूप काळ अतिशीत वातावरणात राहणं मात्र शरीरासाठी हितकारक नसतं. खूप अतिशीत वातावरण ठेवल्यास त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. डोकेदुखीपासून त्वचाविषयक समस्यांपर्यंत अनेक विपरीत परिणाम...
मे 23, 2018
कराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत सध्या उष्णतेची लाट असून, गेल्या तीन दिवसांत 65 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तापमानात वाढ होत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  कराचीमध्ये सोमवारी (ता. 21) 44 अंश सेल्सिअस तापमान होते. सध्या रमजानचे उपवास सुरू...
मे 15, 2018
जळगाव : सालबर्डी (ता. मुक्‍ताईनगर) येथे मजुरी काम करताना वृद्धाचा, तर रावेर येथे तरुणाचा आज उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली.  सालबर्डी येथे सचिन कोळी यांच्या प्लॉटमध्ये काम करीत असताना निमखेडी खुर्द येथील पुंडलिक चांगो चौधरी (वय 60) यांना अचानक भोवळ आली व जमिनीवर पडले. या ठिकाणी जागीच त्यांचा...
मे 14, 2018
नवी सांगवी (पुणे) : उष्माघाताने अशक्त झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्र विनायक बडदे यांनी जीवदान दिल्याची घटना आज घडली. मागील आठ दिवसांपासून ऊन्हाचा पारा उच्चांक गाठत असताना मनुष्याबरोबर प्राण्यांनाही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे आजच्या या ताज्या घडनेवरून पुढे आले आहे.  पिंपळे निलख...
मे 14, 2018
मार्चमध्येच चाळिशी ओलांडलेले तापमान... एप्रिल- मे महिन्यातील उष्णतेचा कहर... आणि गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर गेलेला... त्यात लग्नसराईची धूम असल्याने नातलग, मित्रपरिवारातील लग्न चुकवू नये असा प्रघात.. मग, स्वत:सह कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता उन्हातान्हात दुचाकीवर फिरणे.....
मे 14, 2018
आष्टी (जि. बीड) - लग्नसमारंभासाठी आष्टी येथे चाललेल्या महिलेचा वाहनातच उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तालुक्‍यातील सांगवी आष्टी येथील बिजूबाई डाडर (वय 55) ही महिला आष्टी येथे लग्नसमारंभासाठी एका पिकअप वाहनामध्ये बसून जात असताना उन्हाच्या तीव्रतेचा त्यांना त्रास होऊ लागला....
मे 13, 2018
सोनपेठ - ताप मेंदूत गेल्यामुळे सहा महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १२) घडली. हा उष्माघाताचा प्रकार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. सोनपेठ येथील वसंत मारोती खेडकर यांची नात, गीता धनंजय डहाळे (रा. औरंगाबाद) यांची कन्या ऐश्वरी धनंजय डहाळे (वय सहा महिने) हिला दहा...
मे 11, 2018
जळगाव - जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर दोन दिवसांपासून वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, आज जळगावात तापमानाने ४६ अंशांपर्यंत मजल मारली. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक असून, राज्यातही सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या वाढत्या...
मे 10, 2018
जळगाव ः जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाल्यानंतर दोन दिवसांपासून वाऱ्यांमुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली होती. मात्र, गुरुवारी जळगावात तापमानाने 45 अंशांपर्यंत मजल मारली. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक असून, राज्यातही सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाल्याचे वृत्त आहे.  दरम्यान, या वाढत्या...
मे 09, 2018
जरंडी - सोयगाव तालुक्‍यातील जरंडी येथे लोहार काम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या व्यक्‍तीचा सोमवारी (ता. ७) दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला, सोयगाव तालुक्‍यातील उष्माघाताचा यंदाचा हा पहिला बळी आहे. जरंडी येथे लोहारकाम करणारे सुनील पंडित लोहार (वय ३९) हे रविवारी दिवसभर भात्याजवळ काम करीत होते....