एकूण 90 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
कल्याण : कल्याण-शिळफाटा रोडवरील 104 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक झाल्याने एक वर्षापूर्वी वाहतुकीसाठी बंद करून तो नंतर पाडण्यात आला. त्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असली, तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना तासन्‌ तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे...
ऑगस्ट 27, 2019
ठाणे : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणा एकाचे श्रेय नाही; तर मराठा समाजाने एकजुटीने आणि संघर्षाने आरक्षण मिळवले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठा समाजाच्या एकीमुळेच महाराष्ट्रात स्वराज्यची स्थापना झाली होती. आता पुन्हा एकदा सुराज्य येण्यासाठी मराठा...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील खडवली येथील जू गाव हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले. सदर माहिती मिळताच एनडीआरएफ आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने जु गावातील 59 ग्रामस्थांना तात्काळ कोलशेत बेस कॅम्प येथे सुरक्षितरित्या हलवण्यात आले. पूरपरिस्थितीतून सुखरूपपणे सुटका...
जुलै 30, 2019
ठाणे - जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे रविवारी (ता. २८) दिमाखदार समारंभात करण्यात आला. आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय आणि चाहते, मान्यवर पाहुणे आणि...
जुलै 29, 2019
ठाणे : बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरातील पूरग्रस्तांची सुटका केल्यानंतर आता या परिसरात डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, मलेरियासारखे आजार पसरू नयेत यासाठी आवश्‍यक त्या औषधांचे वाटप करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठिकठिकाणी आरोग्य...
जुलै 29, 2019
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा...
जुलै 28, 2019
मुंबई :-  २८ जुलै या जागतिक हिपेटायटिस दिनाचे औचित्य साधून हिपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून सर्व जिल्हा रुग्णालयात हिपेटायटिस तपासणी व उपचार सेवा देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय व्हायरल...
जुलै 28, 2019
मुंबई : उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वांगणी-बदलापूरदरम्यान महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या सोबतीने ठाणे महापालिकेच्या "ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने'ही (टीडीआरएफ) उल्लेखनीय कामगिरी बजावली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल...
जुलै 11, 2019
कल्याण : आज बेरोजगारी वाढत चालली आहे. देशात नोकऱ्या उपलब्ध आहेत, मात्र त्याला लायक अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे का? सध्या शिक्षण क्षेत्रात नवीन पॉलिसी येत असून त्यानुसार शिक्षण क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) कल्याणमधील एका...
जुलै 11, 2019
मुंबई : युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विद्यार्थी संघटनेला म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपकेंद्र उदघाटन कार्यक्रमात गोंधळ घातला. कल्याण मध्ये आज युवा सेने नेता आदित्य ठाकरे कुलगुरू सुहास...
जून 23, 2019
आषाढ महिना लागला, की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते वारीचे. पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोहळ्यामध्ये किती तरी वारकरी अतिशय समरसून सहभागी होतात. विठुमाउलीच्या भेटीची ओढ लागते, पावलं पडत जातात आणि मनात आनंदसरींचा वर्षाव होत राहतो. उत्साह कमी होत नाही, की त्यातलं भारलेपण कमी होत नाही. उद्या (२४) आणि...
जून 14, 2019
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी  गुरुनानक शाळेच्या भिंतीवरील बॅनर काढताना एमएसईबीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका लागून मृत्यूमुखी पडलेल्या प्रमोद पंडित या तरुणाच्या कुटुंबियांना आज एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी 4 लाख रूपयांचा धनादेश दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणिकर, शिवसेना...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 22, 2019
लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत. भिवंडी (पूर्व) आणि...
मे 10, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. ठाण्यात शिवसेना गड कायम राखणार ! नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत...
मे 06, 2019
औरंगाबाद - ज्या मुलांना पोटात नऊ महिने सांभाळले त्यांनीच तिला घरातून हाकलले. त्या माऊलीचे हे हाल पाहून शेजाऱ्यांनी तिला आसरा दिला. नाईलाजास्तव पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवून तिला मुलांविरुद्ध तक्रार द्यावी लागली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तीन मुलांसह एका सुनेविरुद्ध गुन्हा नोंद झाला.  तिने...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 22, 2019
आगरी कार्ड युती आणि आघाडीने वापरले आहे. उमेदवारी देतानापासून ती काळजी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. ‘मनसे’ने आपले बळ आघाडीमागे उभे केल्याने लढत आणखी रंगतदार होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. पाटील...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद : मिसारवाडीतील 13 वर्षीय मुलीची एका कुटूंबाला विक्री करुन तिचा बालविवाह लावून दिला होता. त्यानंतर त्या कुटूंबीयांनी पिडीतेला शेण खाऊ घालणे, गुप्त अंगावर सिगारेटचे चटके देणे असा अमानुष प्रकार पिडीतेसोबत केला होता. मुलीचा गुरु, मावशी, चुलत मामा आणि अन्य दोन दलालांनी आरोपी अग्रवाल...