एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 03, 2019
बंगळुरु : मला जनतेच्या हृदयात जागा हवी आहे. माझे ठरलंय मला राजकारणात राहायचे नाही. मी आता राजकारणातून दूर जाण्याचा विचार सुरु केला आहे, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले. राज्यात भाजपने 'ऑपरेशन लोटस' सुरु केले होते. त्यानुसार कुमारस्वामी...
जुलै 27, 2019
बंगळूर : कॉंग्रेसबरोबर चौदा महिने आघाडी करून सरकार स्थापन केलेल्या माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्याच आमदारांचा दबाव येत आहे. आज झालेल्या जेडीएस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा सल्ला दिला....
जुलै 26, 2019
बंगळुरु : कर्नाटकात कुमारस्वामी सरकारविरोधात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात पुन्हा भाजपचे 'कमळ' फुलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष  बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज (शुक्रवार) पार पडला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. ...
जुलै 24, 2019
बंगळूर : मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सभागृहात निरोपाचे भाषण करताना भाजपच्या धोरणावर जोरदार हल्ला केला. या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आपण लोकांना कोणता संदेश देऊ पाहत आहोत, असा सवाल करताना त्यांनी मी योगायोगाने राजकारणात आलो. मी राजकारणात येऊ नये, अशीच माझ्या पत्नीचीही...
जुलै 23, 2019
बंगळुरु : कर्नाटकात विश्वासदर्शक ठराव आज (मंगळवार) घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांची निवड केली जाणार आहे. कर्नाटक विधानसभेत आज सायंकाळी...
जुलै 23, 2019
बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज (मंगळवार) घेण्यात आला. हा विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याविरोधात आल्याने आता त्यांचे सरकार कोसळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  आमदार किती आहेत, याबाबतची...
जुलै 23, 2019
बंगळूर : कर्नाटकमधील सत्ता नाट्य आज (मंगळवार) संपुष्टात येण्याची चिन्हे असली तरी, गेल्या सोमवारपासून सुरु असलेले हे सत्तेचे नाट्य आजपर्यंत का लांबविण्यात आले याचा खुलासा झाला आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या ज्योतिषाने सांगितलेल्या सल्ल्यानुसार हा विश्वासदर्शक ठराव...
जुलै 23, 2019
बंगळूर : कर्नाटकात सत्तेचे नाट्य सुरु असताना सोमवारी रात्री सभागृहात चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याचे बनावट पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यावर बनावट सही होती. व्हायरल झालेल्या राजीनाम्याच्या पत्राचा मुद्दा सभागृहात मुख्यमंत्री कुमारस्वामी...
जुलै 18, 2019
बंगळूर : एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्याची मुभा दिलेली असतानाच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीप जारी करणे, हा विधिमंडळ पक्षाचा हक्क असल्याचे स्पष्ट करून राजीनामा दिलेल्या आमदारांसह सर्वच...
जुलै 12, 2019
अहमदाबाद : कर्नाटकातील सत्ताधारी एचडी कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून पैशांचा वापर केला जात आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) केला आहे.  अहमदाबाद येथील एका न्यायालयात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीसाठी राहुल गांधी आज येथे...
जुलै 12, 2019
बंगळुरू : कर्नाटकातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नव्या घडामोडी होत आहेत. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता कुमारस्वामी यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, आता कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक...
जुलै 10, 2019
मुंबई/ बंगळूर : कर्नाटकातील सत्तानाट्याचा दुसरा अंक आज बंगळूर आणि मुंबईत पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजधानीत ठाण मांडून बसलेल्या कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा काँग्रेसचे चाणक्‍य डी. के. शिवकुमार यांचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला. मुंबई...
जुलै 09, 2019
बंगळूर : कर्नाटकातील राजकीय संघर्षाला आणखी धार चढली असून, तेरा आमदारांच्या बंडांनंतर कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची (जेडीएस) आघाडी "डॅमेज कंट्रोल मोड'मध्ये गेली आहे. या दोन्ही पक्षांकडून बंडखोरांची मनधरणी सुरू असून, भाजपनेही आधी विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेऊ द्या, मग आम्ही सत्ता स्थापनेचे...
जुलै 07, 2019
बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ होत आहेत. काँग्रेसच्या 8 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) 3 आमदारांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आज त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होण्याची शक्यता आहे. गेल्या...
जून 22, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री म्हटलं की पोलिसांच्या गाड्यांचा ताफा, मोठी सुरक्षा यंत्रणा, राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी याला अपवाद ठरत आहेत. कारण त्यांनी चक्क सरकारी शाळेच्या वर्गातील फर्शीवर पांढरी चादर टाकून विश्रांती घेतली. साधी...
जून 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटक राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, असे आज (शुक्रवार) स्पष्ट संकेत दिले. तसेच आपण काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करण्यास सांगितले होते, असेही ते म्हणाले.  आंतरराष्ट्रीय...
जून 19, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस सरकारमधील वाद गेल्या काही दिवसांपासून समोर आला आहे. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ''राज्यात दररोज अडचणींचा सामना करतोय. मात्र, सरकार स्थिर...
जून 14, 2019
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (शुक्रवार) झाला. कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यपाल विजुभाई यांनी या दोघांना पद आणि...
मे 29, 2019
बंगळूर : कोणत्याही परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारचे पतन करण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु आघाडी पक्षांच्या मतभेदातून सरकारचे पतन झाल्यास जरूर सरकार स्थापन करू, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.  येडियुरप्पा म्हणाले, "...
मे 18, 2019
नवी दिल्ली : निवडणुकांचे निकाल आल्यानंतर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होईल. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) काँग्रेससोबत आघाडी आहे. तसेच आता पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आमचा पाठिंबा असेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले.  ...