एकूण 313 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव : "ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या "पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे सर्व "पॅक'चा अभ्यास करूनच ग्राहकांना "बजेट'नुसार चॅनल्सची निवड करावी लागेल.  "डीटीएच'प्रमाणे प्रत्येक केबलधारकाला...
फेब्रुवारी 18, 2019
कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होऊन पुढच्या २५ वर्षांत वीज बिलात नव्वद कोटींच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. पालिका शहरातील पथदिवे, सांडपाणी...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : या सरकारने बांधकाम क्षेत्रात रेरा कायद्यामुळे बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर निर्बंध आणले. मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य करण्यात आले, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात सांगितले सांगितले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी खर्च केले गेले....
जानेवारी 28, 2019
हर्णे - येथील बंदरातील मच्छीमारांनी एलईडी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. जोपर्यंत अवैध मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी उभे राहत नाही, तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेवून समुद्रात या एलईडी मासेमारी विरोधात मोठे आंदोलन करण्याचा पवित्रा येथील मच्छीमारांनी...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहरातील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम महापालिकेने एलईडी प्रकल्पाच्या कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्यासाठी अद्याप लेखी करार झालेला नाही व दरही ठरलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी करार अंतिम करून प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौरांनी...
डिसेंबर 30, 2018
जळगाव ः महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते हे "एलईडी'ने झळकणार आहे. एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई या कंपनीशी मनपाचा सात वर्षाचा करार झाला आहे. याबाबत सर्वेक्षण सुरू असून "एलईडी' पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करून कार्यालय सुरू करण्याचे पत्र कंपनीच्या...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - राज्यात दुष्काळाची स्थिती असताना सरकारने जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा घाट घातला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींची चित्रफीत तयार करून ती दूरचित्रवाहिन्यांवर दाखवण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा नाहक खर्च करण्यात येणार आहे. सरकारच्या या...
डिसेंबर 21, 2018
पिंपरी - कचरामुक्त शहरासाठी आखलेल्या आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजनेस महापालिका सर्वसाधारण सभेने बुधवारी मंजुरी दिली, त्यामुळे बक्षीसप्राप्त सोसायट्यांना गुणांकानुसार सामान्य करात पाच ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळणार आहे.  गेल्या महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली....
डिसेंबर 19, 2018
पुणे - देशात पायाभूत सुविधांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच हजारो तरुणांकडे नवनवीन कल्पना असून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सरकार करीत आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला तयार असून, भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क) पुनर्विकास आराखडा आणि सिद्धेश्‍वर तलाव परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने काही अटींवर मंजुरी दिल्याचे पत्र मिळाल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'ला सांगितले. केंद्रीय सांस्कृतिक...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - शहराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे, पिंपरी-चिंचवडसह केलेला सर्वंकष वाहतूक आराखडा यामुळे शहरात विकासकामे करण्यासाठी महापालिकेला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्यानुसार चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावते, मामुर्डी या...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे थकीत 135 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांत सप्टेंबरपर्यंतची बिले चुकता करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी - चिंचवड येथील अंकिता अशोक नगरकर आणि रत्ना पाटील या दोन मैत्रिणींनी वाहनांच्या आधुनिक इंडिकेटरचा शोध लावला आहे. वाहनाच्या छतावर बसविता येणाऱ्या या आधुनिक इंडिकेटरचे त्यांनी पेटंट नोंदविले आहे. अंकिताचे आतापर्यंतचे हे दहावे पेटंट आहे. आधुनिक इंडिकेटरचे फायदे सांगताना अंकिता म्हणाली, ‘‘प्रचलित...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - दामदुपटीच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी प्रथम सरकारी कंत्राट मिळाल्याचा देखावा करीत देशभर जाळे पसरविले. त्यानंतर दहा महिन्यांमध्ये दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली. आतापर्यंत ३.५७...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेले एमआयडीसीतील रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण वेगात सुरू झाले आहे. त्यामुळे रस्ते प्रशस्त होत असून, त्यांच्या सौंदर्यात भरही पडणार आहे.  शहरामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी गावांच्या क्षेत्रात एमआयडीसीचा विस्तार झालेला आहे. भोसरी ते निगडी टेल्को रस्ता...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
नोव्हेंबर 07, 2018
महाड : आपल्याकडे इच्छापूर्ती नागमणी असल्याची बतावणी करुन उच्चभ्रू व अंधश्रध्दाळू लोकांना लाखों रुपयाला हा नागमणी विकून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी महाड तालुक्यात केलेल्या या कारवाईत दोघांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. सुशांत नामदेव मोरे...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....