एकूण 200 परिणाम
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 09, 2019
रस्त्यानं जाताना अचानक तुमच्या मागं पिसाळलेला कुत्रा लागतो. तुम्ही जीव मुठीत धरून पळता. तुमचा वेग कुत्र्यापेक्षा जास्त असतो. शेवटी कुत्रा पाठलाग थांबवतो. तुम्ही तरीही पळत राहता. सुरक्षित ठिकाणी पोचल्यावर धापा टाकता. अचानक आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची शक्‍ती तुमच्या अंगात संचारली. तुम्ही स्वत:चा...
मे 06, 2019
सहकारनगर - पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी (९ जून) ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन : २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सकाळ’ आणि ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे ही स्पर्धा होणार आहे. ‘वृक्षाथॉन’बाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी शहरातून रविवारी सकाळी रॅली काढण्यात आली. या वेळी...
एप्रिल 30, 2019
पावस - येथील भाटीवाडी परिसरातील गौतमी खाडीकिनारी मृत माशांचा खच आढळून आला. खाडीतील पाण्यामध्ये रासायनिक द्रव्याचा मोठा तवंग दिसत होता. या द्रव्याचा परिणाम होऊन मासे मृत झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. ओहोटीमुळे खाडीतील पाणी कमी होऊन उष्म्यामुळे मासे मृत झाल्याचा मत्स्य व्यवसाय खात्याचा अंदाज आहे....
एप्रिल 26, 2019
नागपूर - मेडिकल स्विमिंग पूलमध्ये एका नवशिकाऊ युवा जलतरणपटूचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. नवीन छगनराव श्रीराव (वय २२) असे मृत जलतरणपटूचे नाव आहे. कंत्राटदाराचे दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍...
एप्रिल 20, 2019
पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात २२ एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो.   नि सर्गात ‘एकाकी’ अशी कोणतीही गोष्ट नसते. सृष्टीतील अनेक गोष्टी परस्परावलंबी असतात. ‘...
एप्रिल 12, 2019
उत्तूर - सध्या फिटनेस राखण्याकडे कल वाढला आहे. यासाठी डायट प्लॅनपासून वर्क आऊट करण्याकडे लोक वळले आहेत; मात्र यात सातत्य राखण्यात खूप कमी जणांना यश येते. व्यायाम हा जीवनशैलीचा भाग आहे. हे अद्याप आपल्याकडे रूळलेले दिसत नाही. याला अपवाद नक्कीच आहेत; पण अशांची संख्या खूप कमी आहे. उत्तूरमधील (ता. आजरा...
एप्रिल 09, 2019
पंचवीसेक वर्षे झाली कोल्हापुरातून मुंबईला येऊन. पण, आजही कोल्हापूर सोडताना पुढे पुढे ढकललेला एकेक दिवस आठवतो. मुंबईत आल्यानंतर काही काळ संघर्ष जरूर होता. मात्र, ती सुद्धा एक घडण्याची प्रक्रियाच होती. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी आणि सिनेमांतूनही आजवर भरपूर काही केले. पुढंही बरेच काही करायचे आहे....
एप्रिल 07, 2019
कात्रज(पुणे) : वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे वाढणारे प्रदूषण मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. पर्यावरणात मिसळणारा कार्बनडायॉक्‍साइड शोषून फुकटात शुद्ध ऑक्‍सिजन देणारी झाडे प्रत्यकाने लावून आपले आरोग्य जपले पाहिजे, हा संदेश देण्यासाठी डॉ. नीलेश गुजर यांनी पुढाकार घेतला आहे. 'न्या...
एप्रिल 06, 2019
त्या चमूतील ते सर्वांत कनिष्ठ डॉक्‍टर. शिकत असलेले. पण त्यांनी सहज म्हणून सुचवला उपाय आणि काका शुद्धीवर आले. अण्णा माझे चुलते. त्यांचा भुसार मालाचा व्यापार व लाकडाची वखार होती. भाड्याने सायकली देण्याचे दुकान अण्णांनी आजीसोबत सुरू केले. ते सुगीमध्ये खेड्यापाड्यातून धान्य विकत घेत. शहरातील आडतीवर...
मार्च 23, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाऊन विहिरीत तासन्‌ तास डुंबायचे, असा बाळगोपाळांचा एकेकाळी आवडता खेळ असायचा. परंतु, काळाच्या ओघात मामाचा गाव आणि विहीर दोन्ही मागे पडले. त्याची जागा निळ्याशार जलतरण तलावांनी घेतली आहे. त्यामुळे सुटी लागताच अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात आबालवृद्धांची...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज पिळवटून टाकत होते...
मार्च 18, 2019
प्रत्येक रुग्णागणिक वेगळा अनुभव डॉक्‍टर घेत असतो. पण एखाद्याचे प्राण वाचवता आले की त्याला लाखमोलाचा आनंद होतो. मांडवगणसारख्या ग्रामीण भागात काम करीत होतो. मांडवगणमधील प्रतिष्ठित असे एक काका कधीमधी गावात भेटायचे. बोलणे चालणे व्हायचे. काका पान खाऊ घालायचे अन्‌ मार्गस्थ व्हायचे. एके दिवशी सकाळपासून...
मार्च 14, 2019
पुणे - ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’ आणि ‘परांजपे स्कीम्स’च्या वतीने १५ ते १७ मार्चदरम्यान कर्वेनगर येथील पंडित फार्म येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदाच ‘सिम्पल एक्‍स्पो’ या खास प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यातून ज्येष्ठांचे जीवनमान उंचावण्याचा हेतू असून, ‘परांजपे अथश्री’ हे या प्रदर्शनाचे...
मार्च 14, 2019
पिंपरी - नाल्यातून थेट पवना नदीत मिसळल्या जाणाऱ्या पाण्याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला पाच लाखांची बॅंक गॅरंटी देण्याबाबत नोटीस दिली आहे. गेल्या महिन्यात थेरगावातील पवना नदी परिसरातील केजूबाई बंधारा भागात मासे मृत झाल्याचा प्रकार घडला होता....
मार्च 10, 2019
दिमित्री मेन्डेलिव्हनं तयार केलेल्या आवर्तसारणीला (पिरिऑडिक टेबल) मार्च महिन्यात दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. मूलतत्त्वांच्या गुणधर्मांमधलं हे आवर्तन मेन्डेलिव्हनं दाखवून दिलं. मूलतत्त्वं हे मूळ घटक आहेत ही संकल्पना आता मोडकळीस आली आहे; पण या मूलतत्त्वांच्या गुणधर्मांचं एक आवर्तन होतं,...
मार्च 10, 2019
विविध गोष्टी "सेन्स' करणारे सेन्सर्स आज अनेक क्षेत्रांत वापरले जातात. स्मोक डिटेक्‍टर, गॅस डिटेक्‍टरपासून कारच्या ड्रायव्हरला जागं ठेवण्यावर लक्ष ठेवणाऱ्या "अटेन्शन सेन्सर'पर्यंत किती तरी पर्याय आहेत. हे सेन्सर तयार कसे झाले, त्यांचं काम कसं चालतं आदी गोष्टींचा वेध. अनेक प्रकारचे सेन्सर्स आज...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 पुणे : जेव्हा भारतावर हल्ला होतो तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करावे ही प्रत्येकाची इच्छा असते. परंतु अनेकदा मार्ग सापडत नाही किंवा आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात गुंतून जातो. परंतु हीच इच्छा सुमेधा चिथडे यांनी कायम मनात तेवत ठेवली आहे. 1999 पासून त्या जवानांसाठी आणि त्यांच्या...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बॅंक फोडणाऱ्या उत्तर प्रदेशातील सात जणांच्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. मालवाहतुकीसाठी यायचे, त्या भागातील बॅंकांची रेकी करायची, गॅस कटरच्या साहाय्याने रात्रीत त्या बॅंका फोडायच्या व लाखोंचा ऐवज घेऊन ट्रकमधून पसार...
फेब्रुवारी 23, 2019
चंद्राच्या दूरच्या भागात चीनने अलीकडेच अवकाशयान उतरविले, तसेच तेथे शेतीचे काही प्रयोग करून नवा इतिहास घडविला. परग्रहावर मानवी वस्ती करावयाची असेल तर अशा प्रयोगांचे यशापयश अनन्यसाधारण आहे. चीनच्या या प्रयोगांमुळे सुरवात झाली असली, तरी याबाबतीत मोठा पल्ला गाठावयाचा आहे. पृ थ्वीपासून समारे ३ लाख ८०...