एकूण 577 परिणाम
ऑक्टोबर 19, 2018
कात्रज - समाजाच्या हिताचा विचार करणारी माणसं एकत्र आली की मोठं काम उभं राहतं. कुस्ती क्षेत्रात ते घडतंय याचा आनंद आहे. देशाला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याची क्षमता असणारे मल्ल महाराष्ट्रात आहेत. केवळ त्यांना सामाजिक आधाराची गरज आहे. पैलवान फाऊंडेशन नेमकं तेच करण्याचा प्रयत्न करत आहे....
सप्टेंबर 26, 2018
बेळगाव - जकार्ता इंडोनिशिया १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकाविलेल्या मलप्रभा जाधव व उदयोन्मुख ज्युदोपटू गीता दंडाप्पागोळ यांची ज्युनियर कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. भोपाळमधील (मध्य प्रदेश) भारतीय खेल प्राधिकरणाच्या सभागृहात सुरू...
सप्टेंबर 21, 2018
न्याहळोद (जि. धुळे) : विश्‍वकरंडक नौका नयन ड्रॅगन बोट स्पर्धेत राज्याचे नाव गाजविणारी न्याहळोद (ता. जि. धुळे) येथील जिगरबाज नौकानयनपटू मनीषा माळीची आर्थिक परिस्थितीमुळे आगामी अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेतील सहभागाची संधी हुकणार होती. यासंदर्भात 'सकाळ'ने आज (शुक्रवार) लक्ष वेधल्यानंतर दोंडाईचास्थित...
सप्टेंबर 18, 2018
आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...
सप्टेंबर 13, 2018
पुणे : 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता तथा पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. 11 सप्टेंबरला त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात 'रिपोर्ट' करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.  सायगाव (ता. चाळीसगाव) येथील मल्ल 'ट्रिपल महाराष्ट्र केसरी' विजेता विजय...
सप्टेंबर 11, 2018
सावदा ः दिव्यांग असूनही ज्याच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्तीचे बळ असेल, तर स्वप्नांना साकार करण्यासाठी शारीरिक अपंगत्व आड येत नाही. हा वस्तुपाठ घालून दिलाय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला खानदेशचा सुपुत्र 25 वर्षीय संकेत भिरूड याने... या तरुणाने मनाली ते खारडुंगला लेह हे 550 किमी अंतराचा अत्यंत कठीण प्रवास...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकारले. आता ऑलिंपिक पदक जिंकणे हेच केवळ शिल्लक आहे. त्यावरच सर्व लक्ष केंद्रित केले आहे, असे राही सरनोबतने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली पहिली महिला नेमबाज, असा मान राहीने मिळवला आहे.  दुखापतीमुळे दीर्घ...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई- जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय कुमार; तसेच महिला संघाने निराशा केली. कुमार रॅपिड फायर प्रकारातही पदक दूरच राहिले. कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत वीस पदके जिंकली आहेत; तसेच दोन ऑलिंपिक...
सप्टेंबर 08, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना स्पर्धकाने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याचा निकष योग्य आहे. तो लक्षात घेतला तर अनेक खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट झाली. त्यातही लहान खेळाडू अधिक चमकले, ही या स्पर्धेची मोठी कमाई! जा कार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १५...
सप्टेंबर 07, 2018
न्यूयॉर्क - क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- २० क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे.  लारा म्हणाला, ‘‘दुसरा कसोटी...
सप्टेंबर 07, 2018
धुळे : एक हजार किलोमीटर सायकलिंगचा शहरातील त्रिमूर्तींनी विक्रम केला. विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, प्राचार्य जे. बी. पाटील, हवालदार दिलीप खोंडे यांनी ही कामगिरी केली. त्यांनी सुरत येथे आयोजित एक हजार किलोमीटरची सायकलिंग 'ब्रेव्हे' निर्धारित वेळेपेक्षा खूप आधीच पूर्ण करून खानदेशच्या...
सप्टेंबर 06, 2018
नवी दिल्ली - आशियाई पदकविजेत्या खेळाडूंची बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. त्या वेळी पदकविजेत्यांचे कौतुक करताना पंतप्रधानांनी, ‘आशियात चमकलात, आता ऑलिंपिक यशासाठी अधिक मेहनत घ्या’ असा सल्ला दिला.  पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात खेळाडू पंतप्रधानांच्या...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावर नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक सनत कौल यांनी कडक पावले उचलण्यास सुरवात केली असून, बरखास्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतेही आदेश काढण्याचे अधिकार नाहीत आणि या पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संवाद नको, अशा सूचनाच पदाधिकारी आणि संलग्न संघटनांना त्यांनी पत्राद्वारे...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता - आशियातील खेळाडूंच्या कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रविवारी शानदार सोहळ्यात समारोप करण्यात आला. आशियाई ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष अहमद सबा यांनी स्पर्धेचा समारोप झाल्याची घोषणा केली. उद्‌घाटन सोहळा जितका आकर्षक ठरला, तितकाच समारोप सोहळादेखील डोळ्यांचे...
सप्टेंबर 03, 2018
जाकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकलं. 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 ब्रॉंझ अशी 69 पदके मिळवून त्यांनी 2010 मध्ये ग्वांगझू येथे केलेल्या आपल्या आधीच्या (67 पदके) कामगिरीला मागे टाकले. त्याचबरोबर 1951 मध्ये भारतातच नवी दिल्ली येथे झालेल्या 15 सुवर्णपदकांच्या...
ऑगस्ट 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील काही क्रीडा संघटनांकडून निवड चाचणीसाठी खेळाडूंकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या प्रतिनिधींशिवायच निवड चाचणीचा सोपस्कार उरकला जात असल्याचे चित्र आहे. खेळाडूंकडून शुल्क किती आकारावे, याचे संघटनांवर बंधन नसल्याची माहिती पुढे आली आहे. ऑल...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकाची लयलूट सुरुच असून, खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी खुद्द क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड घेत आहेत. राठोड यांनी खेळाडूंना जेवण आणून दिल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका खेळाडूलाच खेळाडूच्या समस्यांची जाणीव होऊ शकते,...
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी पाहण्याचे स्वप्न भंगले....
ऑगस्ट 27, 2018
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला किमान पाच पदकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भारताला तीनच पदकांवर समाधान मानावे लागले. अनुभवी लिएंडर पेसने ऐनवेळी घेतलेली माघार आणि रामकुमारला आलेले अपयश यामुळे आम्ही पाच पदकांचे उद्दिष्ट गाठू शकलो नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले.  ते म्हणाले...
ऑगस्ट 25, 2018
तळेगाव रोही (जि. नाशिक) - जकार्तामधील आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग क्वाड्रापल गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करून देणाऱ्या संघातील रोइंगपटू "गोल्डमॅन' दत्तू भोकनळच्या चांदवड तालुक्‍यातील त्याच्या घरी अन्‌ गावात आज दिवाळी साजरी झाली. दत्तूचा समावेश असलेल्या संघाने सुवर्णयश मिळवल्याची माहिती...